पुढार्‍या,तू मंञी होणार !

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
30 Jan 2011 - 8:25 pm

(चाल: विठ्ठला, तू वेडा कुंभार -)

‘भ्रष्टाचारा ’वरती करसी भाषणबाजी फार
पुढार्‍या,तू मंञी होणार !

माती,वाळू,सिमेंट,चूना
तूच पुरवसी खडी विटांना
इमारती त्या उभारतांना
तुझ्या ’आदर्शां ’च्या गणतीला
नसे अंत ना पार !

सभासभांचे रूप आगळे
प्रत्येकीचे जथे वेगळे
तुझ्याविना ते काढती गळे
हाती कुणाच्या दिसती नोटा
कुणी पिऊन हुश्शार !

तूच भेसळीतून जोडसी
घोटाळ्यांतुन एकी तोडसी
कुरघोडयांतुन पक्ष फोडसी
देसी पेटया- लाच पुरवसी
पक्ष पुढे बेजार !!

मुक्तक

प्रतिक्रिया

गुंडोपंत's picture

31 Jan 2011 - 6:17 am | गुंडोपंत

या विषयावर भरपूरच कविता झाल्याने फार प्रतिसाद नसावेत असे दिसते.
विडंबन बरे आहे.

गणेशा's picture

1 Feb 2011 - 2:09 pm | गणेशा

छान