लुब्रा स्वभाव

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
1 May 2008 - 12:16 pm

आमची प्रेरणा महेश यांची संदर प्रायोगिक कविता/गझल लुब्रे पडाव भरला बघून पेला मी हंगरून गेलोगोडीत पेग उष्टा मी लंगरून गेलो

शंका कुणा न आली की आत काय आहेग्लासास स्टिलच्या  या मी ड्रिंकरून गेलो!

काठीजरी करी या बघण्यात मग्न पोरीलुब्रा स्वभाव माझा, मी यंगरून गेलो

मज लागले कळाया सारे तिचे इशारेभलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो

कवटाळण्या मला ती आली उठून लगबग बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलोटीप : हे विडंबन सुमारे दोन दिवसांपूर्वी अर्धवट लिहिले होते, ते आज पूर्ण करावेसे वाटले / करता आले. विडंबनात इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!) ह्या विडंबनात केलेले दिसतील. क्षमस्व.

विडंबन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

1 May 2008 - 12:41 pm | मदनबाण

मज लागले कळाया सारे तिचे इशारे
भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो
>> व्वा मस्तच !!!!!

(एकदमच गांगरून गेलेला)
मदनबाण

चतुरंग's picture

1 May 2008 - 3:44 pm | चतुरंग

फारच छान!

आणि
हे विडंबन सुमारे दोन दिवसांपूर्वी अर्धवट लिहिले होते, ते आज पूर्ण करावेसे वाटले / करता आले. विडंबनात इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!) ह्या विडंबनात केलेले दिसतील. क्षमस्व.
हे तर एकदम ह. ह. पु. वा. :D
चतुरंग

तिमा's picture

1 May 2008 - 4:41 pm | तिमा

दिसता कविता, त्यावरी मी शिंकरुन गेलो.

केशवसुमार's picture

2 May 2008 - 8:43 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार

सत्या's picture

2 May 2008 - 11:46 am | सत्या

तुमचे विड॑बन एकून
मी हड्बडून गेलो......

अरुण मनोहर's picture

7 May 2008 - 1:40 pm | अरुण मनोहर

शंका कुणा न आली की आत काय आहे
ग्लासास स्टिलच्या या मी ड्रिंकरून गेलो!
<:P <:P
व्वा व्वा.. क्या बात हय. पिते रहो बेसुमार........
ह.घ्या.

मनस्वी's picture

7 May 2008 - 1:47 pm | मनस्वी

इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!)
- केशवसुमार, प्रयोग सफल!

पक्या's picture

7 May 2008 - 2:09 pm | पक्या

कवटाळण्या मला ती आली उठून लगबग
बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो

कसेबसे सावरले मज ; लागता कसलीशी चाहूल
समोर अर्धागिस पाहता मी थरथरून गेलो !!!

-- पक्या

ईश्वरी's picture

7 May 2008 - 2:49 pm | ईश्वरी

<):) कवटाळण्या मला ती आली उठून लगबग
बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो

कसेबसे सावरले मज ; लागता कसलीशी चाहूल
समोर अर्धागिस पाहता मी थरथरून गेलो !!!

-- पक्या

ओरिजिनल लेखनासाठी : के.के ..छान जमलयं

पक्या तेरा भी जवाब नही...प्रतिसाद सही दिलायस

ईश्वरी

ईश्वरी's picture

7 May 2008 - 2:58 pm | ईश्वरी

--ओरिजिनल लेखनासाठी : के.के ..छान जमलयं
ओह ..मला वाटले तुम्ही केशवकुमार..म्हणुन केके लिहिले..क्षमस्व.
नन्तर लक्षात आले ..केशवसुमार .
ईश्वरी