कसे उदास नि बेचव वाटते हे आयुष्य
हे क्षण ..!
उत्साह संपून सारे गोठून जातात
आनंदाचे क्षण
नि ...
कशे आठवत राहतात
प्रेम तुटल्याचे क्षण
सरळ नकार
त्याच्या मर्दपणाची
बेदम हार ..!!
हातात हात घेऊन ते बसलेले ते निवांत क्षण
कुठे गहाळ होतात ...?
आणि
त्या आणा भाका प्रेमाच्या
क्षणभर मिठीत
विरघळून गेलेले
ते हळुवार क्षण
तो स्पर्श
ती बेहोष नजर
मोहित होऊन स्वताला विसरून गेलेले क्षण
कितीतरी काळ लोटला
हरवून गेला
आठवण आली की
भळभळते जखम ....
एक ओली
तिची आठवण ....
कालच ती स्वप्नात आली
जशीच्या तशी
नि मग तो विसरून गेला
ते उदासपण
क्षणभर.......
नि गोंजारत बसला
त्या जुन्या आठवणी
ते स्पर्श
त्या शपता ..
तो खणीत बसलाय
आठवणीची
भुसभुशीत
जमीन
कधीची ...!!
कदाचित अजूनही आठवणी सापडतील
नको ती ...
गाभुळलेली
आंबट चिंबट
नि ते ओले क्षण ...!!
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 11:45 am | गणेशा
कविता खुपच करुन आहे,
मन एकदम खिन्न झाले.
कोणत्याही प्रियकराची/पतीची, नंतरची अवस्था खुप मनातुन लिहिलेली आहे,
पुन्हा पुन्हा वाचली कविता, मन एकदम हरवुन गेले.
डोळ्यापुढे असा नायक उभा राहिला आणि वाईट वाटत राहिले. हे शब्द.. शब्द न राहता जिवंत चित्रच भासले जणु.
---
अवांतर : अशी कविता लिहितानाची अवस्था ही खुप वेगळी असते, कविता खुप छान झालीये म्हणुनचा आनंद असतोच .. आपल्या आयुष्यातल्या काही घतना काही अनुभव समर्थपणे शब्दात पेलतो आहोत आपण असे आपल्या मनाला वाटते आणि छान वाटतेच, पण त्याच वेळी कवितेतील करुन कहानी मनाचे बांध घट्ट धरुन ठेवते.. ती आठवण, तो काळ पुन्हा विचारांचे काहुर निर्माण करतो आणि नक्की आपण सुखी झालोत.. की आठवणीं मध्ये भावुक झालो हेच कळत नाही.
असेच अनुभव " आई.. " कवितेच्या वेळी घेतले होते.. माझ्या मित्राच्या ओळखीच्या लोकांचे अनुभव त्यात होते..तेंव्हा ही हीच परिस्थीती होती.
आपण असेच लिहित रहा.. वाचत आहे.आपल्या कवितेपैकी ही एक कविता ही मला खुप आवडली या संज्ञेत येत आहे.
28 Jan 2011 - 2:10 pm | कच्ची कैरी
या कवितेत काहीच मिसींग नाहीये फक्त कवितेतल्या तरुणाच्या प्रेयसीशिवाय
28 Jan 2011 - 2:52 pm | गणेशा
मस्त रिप्लाय ता.
तरी एकदा ही कविता अशी वाचुन पहा बरे :
कवितेतील नायक तरुण नसुन वृद्ध आहे.. त्याची अर्धांगीनी आता या जगात नाहिये .. आणि मग ही कविता वाचुन पहा अशी विनंती ..
कदाचीत मुळ कवी ला तरुण पणाचाच नायक लिहायचा असेल पण ही कविता जेंव्हा वेगळ्या पद्धतीने वाचुन बघितल्यावर खुप अवघड वाटते
28 Jan 2011 - 2:52 pm | पियुशा
छान छान छान च!
28 Jan 2011 - 2:57 pm | कच्ची कैरी
तुम्ही सांगितले त्याप्रमाणे मी वाचुन पाहिले पण मला कवितेतला नायक हा तरुणच असावा असे वाट्ते .यावर कवितेच्या कविंनीच 'प्रकाश' टाकावा .
28 Jan 2011 - 8:20 pm | मीली
ओघवती आणि छान आहे कविता.
कसे आठवत राहतात
प्रेम तुटल्याचे क्षण
सरळ नकार
त्याच्या मर्दपणाची
बेदम हार ..!!