वास्तव बदललं तरी आठवणी पुसल्या जात नाहीत. कांदा उतरला म्हणतात. कवितेची वेळ जरी चुकली तरी वेदना अजून ताज्याच आहेत.
या कांद्याचं मूळ येथे आहे.
सख्या चला बागामधी , पेरु कांदे चला.
चिराल जेव्हा कांदा , आज राती ,
दारे लावुनि घ्यावी आधी.
तेलभरी किटली जी तिजोरीत होती ,
नका करु ती बदकन रिती ,
नाही बाप तुमचा राजा-सेनापति
(काड्या छत्रीला लावती)
लोड होईल मग , महिना अखेरीस मला ,
सख्या चला बागामधी , पेरु कांदे चला.
आणला होता कांदा जेव्हा घरी ,
पूड केली त्येची वाळवुनि,
जसा , लावि कुणी अंगारा भाळावरी ,
तशी करते मी फोडणी,
टाचा घासती , पोरं पडून उत्ताणी
(कांदेनवमीच्या नावानी)
आता राया चला पेरू , शिणगाराचा झरा,
सख्या चला बागामधी , पेरु कांदे चला.
प्रतिक्रिया
26 Jan 2011 - 9:57 am | राजेश घासकडवी
पेरिला कांदा मी दारी
मुळे का वळती शेजारी?
किंवा
कांदा मिळेना, कांदा दिसेना
अतिश्रीमंतांनाही तो परवडेना
किंवा
बाभळीच्या काट्यांनी, नीवडुंगी तारांनी
कुंपणाच्या भिंती खास आखल्या,
हात नका लावू माझ्या कांद्याला
किंवा
कांदा सले कुणाला, आक्रंदतात कोणी
मज दृश्य ते सलावे, हा दैवयोग आहे
किंवा
कांदा म्हणून कोणी, कांद्यास हाक मारी
ती हाक नाही वाटे, वाटे मला कुठारी
26 Jan 2011 - 10:39 am | नावातकायआहे
= )) = ))
26 Jan 2011 - 7:36 pm | ashvinibapat
26 Jan 2011 - 8:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा ... मस्त जमलंय.
26 Jan 2011 - 8:08 pm | पैसा
खूप आवडली कांद्याची लावणी!
27 Jan 2011 - 12:00 am | Nile
जमलंय, मात्र कांदे पेरु चला (रंग खेळु चला च्या) चालीवर जास्त चांगलं होईल का?
27 Jan 2011 - 11:12 am | शहराजाद
खूप आवडली.
27 Jan 2011 - 1:28 pm | गणेशा
कविता एकदम छान ..
आवडली ..
मुळ कविता मात्र आमच्याकडे ओपन झाली नाही. असो