संपूर्ण देशात दारू विकली जाते अगदी देशी म्हणून परवाना मिळतो. .मग फार पूर्वी गुजरातच्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांना का म्हणून तेथील राज्यात दारूबंदी जाहीर करावीशी वाटली (म्हणजे ती राजकीय संतांची जन्म भूमी व क्रम भूमी )अरे पण ते राष्ट्र पिता म्हणजे सर्व देशच त्यांची कर्म भूमी मग काश्मीर प्रश्नासारखा ह्या राज्यात त्यावेळी वेगळा कायदा का म्हणून केला गेला .
गुजरात मध्ये तेथील जनता दारू पीत नाही का ? हात भट्टीने हत्याकांड काही वर्षात गुजरात मध्ये घडले तेव्हा माल्यांची वक्तव्ये का झोंबली .
गोव्याला दारू स्वस्त हा त्या राज्याचा पर्यटनाच्या दृष्टीने महत्व आहे .पण गुजराती माणूस का ह्या मधु शाळेपासून वंचित आहे .त्यांनी उर्वर्रीत देशाबंधावांपेक्षा वेगळा न्याय का ?
आज ड्राय डे सारखा हास्यापद प्रकार नाही . फक्त एक दिवस नाटक म्हणून दारू बंदी (महसूल बुडवून व रोजगार बुडवून ) काय मिळवले जाते.
जनतेला खुळचट कल्पनासाठी खोट्या आदर्शासाठी का वेठीला धरले जाते .
दारू शरीराला अपायकारक आहे व्यसन आहे व संसार उध्वस्त होतात हे काही लोकांच्या बाबतीत होते .पण हे जगभरात होते म्हणून जगभरात व उर्वरित भारतात कायमची दारूबंदी का केली जात नाही .
उगाच दाखल्या देवाला दंडवत म्हणून एका दिवसांची नौटंकी का ? बरे पिणारे ड्राय डे ला पितात . न पिणारे ड्राय डे ला काय एरवी पीत नाहीत .लोकशाहीत व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला का ?
दारू हे कोकेन चरस सारख्या मादक पदार्थांच्या वर्गवारीत येत नाही .व त्यावर सिगरेट सारखे हानिकारक असे हि लिहिले जात नाही .मात्र सिगरेट बारा महिने ओढू शकतात .दारू नाही हा भेद भाव का .
आज गुजरात मध्ये जर मोदी काय अजून कुठलाही पक्षाचा राज्यकर्ता दारूबंदी नियम मोडणे म्हणजे गांधी विरोधी व अगदी कट्टर पंथीय ठरेल म्हणून ह्या मुद्यावर तेथे व भारतात कोणीच काही बोलत नाही .
आज गुजरात मध्ये काळ्या बाजारात दारू मिळते (शासनाचा महसूल बुडतो ) आज उद्योग व पर्यटन ह्या मुळे भारतातून व जगभरातून लोक ह्या राज्यात येतात .तेव्हा त्यांची कुचंबना का बरे करून देशाचा महसूल बुडवायचा .आजकाल विकासाचा मंत्र चालतो जनतेला चू बनविण्याचे धंदे फार काळ चालत नाही .तेव्हा सर्व पक्षांनी पुढाकार घेऊन गुजरात मधील दारूबंदी सारख्या बिनबुडाच्या घोरण मोडीत काढावे
असे मला वाटते .एखाद्याची विचारसरणी पाळायची ती नीट पाळा. उगाच देखावा करण्यात व स्वताची राजकीय पोळी भाजून घेण्यास काय अर्थ आहे .
एखादा विदेशी पर्यत गोव्यात जातो मग ताजमहाल पाहतो /दिल्ली नि मुंबई पाहतो .
त्याला आमच्या सारखे (म्हजे कोणे एकेकाळी ) कॉकटेल फ्लेअर बारटेंडर जगभरातील मध्ये /कॉकटेल पाजून त्यांची रसनेची तृप्ती करतो .मात्र गुजरात मध्ये दारू बंदी का ? ह्या प्रश्नावर मात्र काय उत्तर द्यावे काळात नाही (सगळेच हा प्रश्न विचारतात असे नाही .मात्र विदेशी पत्रकार व ब्रिटीश जुने खोड हा प्रश हमखास विचारात पूर्वी .एखादा विदेशी पर्यटक सुध्धा सहज विचारी .)
गुजरात दारूबंदी '' निव्वळ खुळचट पणा
गाभा:
प्रतिक्रिया
26 Jan 2011 - 12:36 am | सद्दाम हुसैन
बरोबर लिहिले आहे .. मस्त च .. बरे झाले मी गुजरात मधे नाही रहात
26 Jan 2011 - 1:02 am | चिंतामणी
बरोबर लिहिले आहेस.
(बाकी गोष्टींसाठी व्यनी बघ)
26 Jan 2011 - 1:06 am | नितिन थत्ते
>>जगभरातून लोक ह्या राज्यात येतात .तेव्हा त्यांची कुचंबना का बरे करून देशाचा महसूल बुडवायचा
तुम्ही गुजरात मध्ये गेलेला नाहीत असे दिसते.
बाहेरून गुजरात मध्ये येणार्याला अधिकृतपणे दारूचा परवाना काढता येतो. आणि त्या परवान्याच्या आधारे आठवड्याला १ फुल बॉटल दारू (व्हिस्की, रम, व्होडका आदि) किंवा १० बाटल्या बिअर मिळते. त्याची प्रक्रिया सोपी आहे. फक्त गुजरातबाहेरचे डोमिसाईल आणि अलिकडच्या काळात गुजरात मध्ये आल्याचा पुरावा (येण्याचे तिकीट वगैरे) दाखवावे लागते.
26 Jan 2011 - 2:43 am | विकास
बाहेरून गुजरात मध्ये येणार्याला अधिकृतपणे दारूचा परवाना काढता येतो.
ऐकीव माहीतीप्रमाणे, वास्तवीक किमान महाराष्ट्रातपण बाहेर (म्हणजे हॉटेल-रेस्टॉरंट्मधे वगैरे) मद्य पिण्यासाठी परवाना लागतो. म्हणूनच तर परमिटरूम असे लिहीलेले असते. पण ते बघितलेच जात नाही.
26 Jan 2011 - 1:46 am | निनाद मुक्काम प...
@बाहेरून गुजरात मध्ये येणार्याला अधिकृतपणे दारूचा परवाना काढता येतो.
गुजरात मध्ये जन्माला येणार्याने काय घोड मारलं आहे .ते कळेल का ?
हो विदेशी पर्यटक हेव्हा सर्व भारतात वारुणीचा आस्वाद घेतात व ह्या राज्यात आल्यावर आखतात घेतात असा परवाना घ्यायचा .त्यासाठी असे का ?
तर आदर्श व मुल्ये ह्यांचे एक लेक्चर द्यायचे .
बाकी इतर भारतीय येतील गुजरात मध्ये ते व्यापार व पर्यटन करतील का परवाने वेगळे काढतील (मुळात का काढावेत ? हाच प्रश्न आहे .फक्त ह्या राज्यात का ? )
26 Jan 2011 - 10:38 am | नावातकायआहे
डॉक्टरच सरटिफिकेट पन लागत दादा.
26 Jan 2011 - 8:53 pm | सुनील
तुमच्या नेहेमीच्या वाइन शॉपवाल्याला विचारा. दीड हजारात काम होईल. तुम्हाला काहीच करायला लागणार नाही.
26 Jan 2011 - 9:26 pm | नितिन थत्ते
>>डॉक्टरच सरटिफिकेट पन लागत दादा.
कुठे लागतं? गुजरातमध्ये?
मी तर बॉ ३१ तारखेला परवाना काढला होता तेव्हा नाही मागितलं.
27 Jan 2011 - 2:28 am | निनाद मुक्काम प...
संपूर्ण भारतात एक न्याय व ह्या राज्यात वेगळा न्याय
हे तुम्हाला पटते का ?
शरियत कायदा असलेल्या आखतात परवाना पध्धत आहे .गैर मुस्लीम लोकांसाठी .
म्हणून मग दारूची तस्करी होते
.(थोडक्यात काय आपल्याकडे कायद्यातून पळवाटा नक्की काढता येतात .त्या करताना सहजच गैरव्यवहार व भष्टाचार होतो .
त्यान सरकारी तिजोरीत काहीच भर पडत नाही .)
27 Jan 2011 - 2:23 am | निनाद मुक्काम प...
दारूच्या जाहिरातीवर बंदी मी समजू शकतो .युके मध्ये जंक फूड चे सम्राट मेक डोनाल्ड च्या जाहिरातीवर बंदी घालण्यासाठी प्रिन्स चाल्स ने आव्हान केल्यावर त्यांच्या सरकारने बंदी घातली कारण लहान मुलांमध्ये लठ्ठ पणा
वाढत चालला होता .कर वाचवायचा असेल तर दारू व सिगारेट ह्या गोष्टी पासून सुरवात होते .हेही मान्य .मात्र नव वर्षाच्या आगमनानिमित्त संपूर्ण देशातील शहरात संध्याकाळी राजरोस माधुशालेचे पाईक दिसून येतात व गुजरात मध्ये मात्र हुक किंवा क्रूक मार्गाने तेथील जनतेला पैसा दाबून चोरी चुपके ह्या गोष्टी कराव्या लागतात .ह्यात मग गावी भट्ट्या लागतात .नि त्यातून विषारी दारूचे कांड होते .महारष्ट्रात अश्याच भत्यांचे एकेकाळी पेव होते .मात्र सरकारने देशी सुरु केल्यापासून त्याला आळा बसला .
आज गुजरात राज्याचा अमिताभ राजदूत आहे .पण त्याला त्या राज्यात कुठल्याही कार्यक्रमात आपली आवडती कविता मधुशाला म्हणता येणार नाही .त्याच्या वडलांनी विचारांती करून हि कविता लिहिली होती .
27 Jan 2011 - 2:35 am | विकास
गुजरात मध्ये मात्र हुक किंवा क्रूक मार्गाने तेथील जनतेला पैसा दाबून चोरी चुपके ह्या गोष्टी कराव्या लागतात .ह्यात मग गावी भट्ट्या लागतात .
तार्कीक कारण असे वाटते: गांधीजींचे राज्य म्हणून तेथे दारूबंदी केली गेली. आता जो कोणी राजकारणी हा नियम काढून टाकायला जाणार त्याला टिकेचा भडीमार सहन करावा लागेल ना? (एक प्रश्न: गुजरात निर्मिती होईपर्यंत तेथे काय नियम होता?) .
27 Jan 2011 - 3:56 am | निनाद मुक्काम प...
सहमत
मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार
मोडी सरकारने ह्या विषयी नुसता प्रस्ताव ठेवू दे समस्त विरोधक /प्रसार माध्यमे .ह्या विषयाला गांधी द्वेष म्हणून राळ उठवतील .
माझ्या मते सर्वपक्षीय बैठक हवी अश्या संवेदनशील विषयावर
27 Jan 2011 - 7:44 am | नितिन थत्ते
जुन्या मुंबई राज्यातच ही बंदी लागू झाली होती. आणि ती कदाचित स्वातंत्र्याबरोबरच आली असावी. (गोवा हे पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्धीस येण्यात या दारुबंदीचा मोठाच सहभाग असावा. "कशास जाता गोव्याला? दमन आणखी वापीला!" असे झेंडूच्या फुलांमध्ये वाचल्याचे स्मरते. मुंबई राज्यात दारुबंदी आणि गोवा पोर्तुगिजांकडे असल्याने दारुबंदी नाही).
नंतर दोन राज्ये झाल्यावरही दारुबंदी चालू राहिली. महाराष्ट्राने ती मागे घेतली. गुजरातमध्ये चालूच राहिली.
27 Jan 2011 - 3:02 am | सुनील
आज अनेकांना आश्चर्य वाटेल पण १९१९ ते १९३३ ह्या काळात अमेरिकेतदेखिल दारूबंदी राबवली गेली होती!
पुढे, दारूच्या दुष्परिणामांपेक्षा दारुबंदीचे दुष्परिणाम अधिक घातक आहेत असे आढळ्यामुळे ती मागे घेण्यात आली.
27 Jan 2011 - 3:53 am | निनाद मुक्काम प...
माझ्या मते महाराष्ट्रात ह्या कारणास्तव बंदी मागे घेण्यात आली .जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकावा .
27 Jan 2011 - 8:35 am | ५० फक्त
दारुबंदीच्या दुष्परिणांमासाठी शंकर पाटलांची ' धिंड' अॅका किंवा वाचा, मग कळेल महाराष्ट्रारात दारुबंदी का उठवली ते.
27 Jan 2011 - 10:39 am | विजुभाऊ
दारू शरीराला अपायकारक आहे व्यसन आहे व संसार उध्वस्त होतात हे काही लोकांच्या बाबतीत होते .पण हे जगभरात होते म्हणून जगभरात व उर्वरित भारतात कायमची दारूबंदी का केली जात नाही .
तिथे दारुबन्दी आहे. त्यामुळे काहे प्रमाणत तरी लोक या व्यसनापासून दूर आहेत. रोजगार म्हणून मिळालेली रक्कम थेट घरात पोहोचते कच्च्याबच्च्यांच्या पोटात दोन घास सुखाचे जातात.
बर्याच देशांत शरीया स्टेट मध्ये दारुबन्दी आहे. आखाती देशात बर्याच ठीकाणी कडक दारुबन्दी आहे.
गुजरात मध्ये दारुबन्दी ठेवली तर तुम्हाला ते का खटकावे? ज्याला हवी तो दारू कशीही मिळवू शकतो. पण जर दारुबन्दी असेल्/दारु सहज उपलब्ध नसेल तर निदान दारूच्या आहारी जाण्याचे प्रमाण कमी होते. तरुणाना या व्यसनाची सहज उपलब्धता कमी होते.
गुजरात मध्ये दारुपिणे हा गुन्हा नाही पण साठवणूक करणे हा गुन्हा आहे. विक्री हा गुन्हा आहे.
बरेचदा लोक घरात बसून दारू पितात. त्यामुळे दारु पिऊन ड्राव्हयिंग आनि त्यामुळे अपघात कमी आहेत.
दारु पेक्षा भयानक असलेल्या तंबाखु मुळे महसूल मिळतो म्हणून तंबाखुच्या आणि तदनुषंगीक उत्पादनावर सरकार बंदी घालत नाही. पण त्याचे दुष्परीणाम प्रत्यक्षात कृषीमन्त्र्यानाच भोगावे लागले तेंव्हा कुठे गुटख्यावर बंदी आली. लहान शाळकरी मुलाना सुद्धा गुटख्याचे व्यसन लागतहोते.
कोणतेही व्यसन हे वाईटच पण त्याचा पुरस्कार करणे हे त्याहून वाईट
27 Jan 2011 - 11:10 am | जिन्क्स
तेव्हा त्यांची कुचंबना का बरे करून देशाचा महसूल बुडवायचा ...
दारू प्यायला न मिळाल्यामुळे लोकान्ची कुचंबना होते.. हे ऐकुन धन्य झालो
27 Jan 2011 - 11:49 am | परिकथेतील राजकुमार
अरे दारु हा काय चर्चा करायचा विषय आहे का?
27 Jan 2011 - 11:53 am | गवि
दारु हा चर्चा करतानचा विषय आहे.. ;)
27 Jan 2011 - 11:40 pm | चिगो
मी माझी अक्कल पाजळतो.. निनादचा मुद्दा अगदी योग्य आहे. फक्त गुजरातमध्ये जन्माला आला म्हणून दारु पिण्याची चोरी व्हावी माणसाला !? हे राम !! बाय द वे, गुजरातप्रमाणे नागालँड मध्येही दारुबंदी आहे. (तिथे ते लोक आपली आपणच बनवतात, ही गोष्ट वेगळी ;-)) त्यामुळे आसाम-नागलँड बॉर्डरवर दारुच्या दुकानांची रांग आहे...
गारो लोकांची (हे मेघालयात असतात बरं) राईस बियर प्यायलेला, आणि ती आवडलेला :-)
चिगो
28 Jan 2011 - 3:07 am | रेवती
ज्यांना परवडतं ते दारू कशीही मिळवतीलच. त्यासाठी पैसेही मोजतील.
खरा फायदा गरीब घरच्या लोकांना होणार.
हवे तेवढे पैसे न देता आल्याने काही घरे जरी या व्यसनापासून लांब राहिली तरी बरे म्हणायला हवे.
मला तरी दारूबंदीमध्ये काही गैर वाटले नाही.
28 Jan 2011 - 3:35 am | निनाद मुक्काम प...
@हवे तेवढे पैसे न देता आल्याने काही घरे जरी या व्यसनापासून लांब राहिली तरी बरे म्हणायला हवे.
त्यांच्यासाठी मग हात भट्टी लागते .
पहिल्या धारेची पिणारे बहुसंख्य गरीब असतात .ज्यांना हि परवडत नाही .मग कधीतरी विषबाधा सारखे मोठे प्रकरण होते .म्हणून सरकारमान्य देशी दारूची दुकाने निघाली .
कॉफी संत्रा मोसंबी अश्या कितीतरी चवीत उपल्ब्ध्ध . आदिवासी पाड्यात मोहाची नि जांभळाची तर अप्रतिम
त्या अडाणी लोकांनी हि मद्यार्क बनविण्याची कला जपली आहे अजून
( हॉटेल मानेज मेंट च्या वेळी इंटर शिप करताना हॉटेलात एकदा गोर्याला स्थानिक ओठांतिक असे काहीतरी चाखायचे होते व प्यायचे होते .
त्याला ताज च्या पाठचा बडे मियाचा कबाब खिलवला व त्याला चक्क देशी पाजली ( आम्ही त्या बदल्यास त्यांची सिंगल मोल्ट चाखली .सांस्कृतिक आदानप्रदान ह्या सदराखाली )
लंडन ला कितीतरी देशी दुकानात पंजाबी देशी दारू (पव्वा ) मिळतो .
मी जेव्हा भारतात होतो .तेव्हा एका जगप्रसिद्ध बार टेंडर जो सध्या एका विदेशी मद्याचा राजदूत आहे .तो भारतात आला होता .तेव्हा त्याने सांगितले .कि तुमच्या गोव्याची फेणीत जरा सुधारणा केली व व्यवस्थित मार्केटिंग केले तर ब्राझील च्या टकीला ( स्थानिक मद्य ) हे जगभर ब्राझील ची ओळख म्हणून प्रसिध्द आहे त्याला सुध्धा मागे टाकेल .ह्या संबंधी त्याने स्वतः त्यांच्या कंपनी मार्फत स्थानिक नेते .फेणी उत्पादक ह्यांच्याशी संपर्क केला .पण सरकारी धोरण आडवे आले .भारत एका मद्याने ओळखला जावा व सरकारी दरबारी अनास्था व सगळ्यात महत्वाचे लाल फितीचा कारभार ह्याने हि योजना बारगळली .
परकीय चलन व महसूल/ रोजगार बुडाला .
देशात परदेशी मद्यावर प्रचंड कर आहे .तरी श्रीमंत .उच्च मध्यमवर्गीय ती पितात . सगळ्यात महत्वाचे बकार्डी व टीचर सारखे परकीय ब्रांड देशात अर्क आणून येथील पाण्यात जातात .
परकीय कंपनीला फुकटचा नफा .
मात्र स्वदेशी मद्यामध्ये मल्या सोडला तर अजून कोणी नाही .त्यामुळे मल्या ह्याला स्पर्धा नसल्याने किंमती तो म्हणेन ती पूर्व दिशा
बर बियर च्या दर्जात काही सुधारणा करेन तर शप्पथ
जर्मनीची साधी बियर सुद्धा फिशरच्या तोंडात मारेल .
त्यांच्या हवाई सेवेसारखी बियर सुद्धा पंच तारांकित का नाही करत माल्या देव जाणे.