एका झाडाचा मृत्यू ..[?]

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
25 Jan 2011 - 7:51 am

हे प्रचंड पिंपळ झाड
खूप जुने पुराने
माझ्या लहानपणापासून
जसेच्या तसे
तरणे बांड
सतत फुलत आपल्याच नादात
हरवून स्वप्नात
पाखराना आपल्या मांडीवर
खांद्यावर जोजावत
कित्येक पाखरांच्या पिढ्या
त्याच्या खांद्यावर जगल्या ,वाढल्या,
हरवून गेल्या

दरवर्षी त्याला पालवी फुटते
तारुण्याची झळाळी
सोनसळ भूषवित आपल्याच तोर्यात
आत्ममग्न ..!!
तो उभा आहे मठात

जुन्या वाड्यात
त्याचा भोवती बांधून कट्टा
किती पोरे म्हातारी झाली
माणसे बदलली
पिढ्या बदलल्या
हां आपल्या दिमाखात उभा

परवाच वाडा पाडून टोवर बांधायचे ठरवलेय
पिंपळाच्या मुसक्या बांधून ठेवल्यात
दोरखंडाने
शुभमुहूर्त बघून
त्याला फासावर द्यावयाचे नक्की झालेय
पिंपळाची पाने कधीपण सळसळू लागलीत
आपल्या मृत्यूची वाट बघत
अस्वस्थ ..कासावीस .... !!
घाबरून चीडीचीप्प...

तरी काल अलगद कोवळी पालवी फुटू
लागलीय
ईवली ईवली तांबूस रंगाची
लव त्याच्या फांदि-फांदिला
त्यानां कोठे एवढी समज
नि उद्याची चिंता
ती आपल्याच नादात
हरवून स्वप्नात ....!!

करुणकविता

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

25 Jan 2011 - 11:33 am | निवेदिता-ताई

तरी काल अलगद कोवळी पालवी फुटू
लागलीय
ईवली ईवली तांबूस रंगाची
लव त्याच्या फांदि-फांदिला
त्यानां कोठे एवढी समज
नि उद्याची चिंता
ती आपल्याच नादात
हरवून स्वप्नात ....!!

मस्त..............!!!!!!
खरच हो माणूस आपल्या स्वार्थासाठी अशी दिमाखात उभी असलेली झाडे

जमीनदोस्त करतो आहे.

पियुशा's picture

25 Jan 2011 - 12:29 pm | पियुशा

खुप च छान लिहिलि आहे कविता

मनाला स्पर्शुन जाते :)

तरी काल अलगद कोवळी पालवी फुटू
लागलीय
ईवली ईवली तांबूस रंगाची
लव त्याच्या फांदि-फांदिला
त्यानां कोठे एवढी समज
नि उद्याची चिंता
ती आपल्याच नादात
हरवून स्वप्नात ....!!

ते पिंपळझाड जिवंत मित्राप्रमाणेच भासले, आणि ह्या कडव्यातुन त्याची जीवनाची ओढ समजुन येते आहे.
मनस्पर्षी कविता.

असेच गावाकडचे घराच्या बाजुला असलेल्या पिंपळाच्या झाडाची आठवण झाली .

धन्यवाद

वरच सार कव्य वाचताना झाल्या नाहीत एव्हढ्या वेदना त्या नव पालवीच्या उल्लेखान झाल्या प्रकाश.

पिंपळाच्या मुसक्या बांधून ठेवल्यात
दोरखंडाने
शुभमुहूर्त बघून
त्याला फासावर द्यावयाचे नक्की झालेय
पिंपळाची पाने कधीपण सळसळू लागलीत
आपल्या मृत्यूची वाट बघत
अस्वस्थ ..कासावीस .... !!
घाबरून चीडीचीप्प...

चेतनगुणोक्ती सुंदर झालीये. शेवट खूप अंगावर येतो!