रेतीचा अख्खा ट्रक आला
कामगार फावड्याने रेती काढीत ढकलू लागले
बंगल्याच्या आवारात ....
काळा तजेलदार तरणा पोरगा
रेतीचे हात झटकित
मालकाजवळ आलां
पैश्यासाठी खोळंबून
मालक : पैशे द्या म्हणाला ...
मालक म्हणाला: पावती
नम्रपणे म्हणाला देतो जी पावती
पावती पुस्तक काढून बनवली पावती त्याने
सुंदर अक्षर बघून मालक आडवा तिडवा चाट ..!!
मउपणे मालक म्हणतो शिकलाय कारे
खाली मान घालीत पोरगा म्हणतो
शिकलोय कोलेजची पुरी वर्ष
मग ..?
गावाकडून आलो
पोटापाण्यासाठी
हिंडलो दारोदारी
कचेर्यात ,कंपन्यात
नौकरीसाठी
ओळख नाही
पाळख नाही
पत्ता नाही
नोकरी कोठे गरिबासाठी ...?
पोटासाठी शेवट रेतीची गाडी
शंभर रुपये दिवसाकाठी
पोटाला चिमटा घेऊन साठवतोय पैशे
भावाच्या शिक्षणासाठी...!!
नि हलकेच चालू लागला ट्रककडे .
स्वताच्या पोटाला चिमटा घेत
आजचा दिवस नि
उद्याचा काळोख तुडवण्यासाठी ........!
.
प्रतिक्रिया
23 Jan 2011 - 6:20 pm | नरेशकुमार
परिस्थिति अनं दुसरं काय ?
24 Jan 2011 - 10:09 am | पियुशा
परिस्थिति मानसाला बरच शिकवते
कविता भावलि:)
24 Jan 2011 - 11:08 am | महेश काळे
आतीशय सुन्दर...
धन्यवाद
24 Jan 2011 - 1:37 pm | गणेशा
निशब्द
24 Jan 2011 - 2:53 pm | कच्ची कैरी
फारच् हॄदय्स्पर्शी आहे कविता .
24 Jan 2011 - 3:51 pm | प्रकाश१११
खूप आभार प्रतिसाद दिल्याबद्दल. !
24 Jan 2011 - 3:55 pm | टारझन
काळीज पिळवटुन निघाले भावा.
24 Jan 2011 - 3:57 pm | RUPALI POYEKAR
गरजवंताला अ़क्कल नसते हो काय करणार बाकी कविता सुंदरच