साहित्य :
निवटे
हिंग
हळद
मसाला
मिठ
तेल
निवट्या ह्या खाडीच्या किंवा समुद्राच्या चिखलात मिळतात. निवट्या खाडीच्या चिखलातही उडताना दिसतात. निवट्यांच्या वाट्याला कोर म्हणतात. २४ निवट्यांची एक कोर. निवट्यांमध्ये भरपुर कॅल्शियम असते असे म्हणतात. त्यांच्या डिझाईनमुळे काहिजणांना त्या आवडत नाहीत पण ते चुकी करतात कारण एकतर कॅल्शियम गमावतात आणि दुसरे म्हणजे ह्या खुप चविष्ट असतात.
पहा कसे फिशटँकमध्ये सोडण्यासारखे मासे आहेत. अगदी रंगिबिरंगी.
निवट्या बाजारात जिवंतच मिळतात. त्यांना पिशवित बांधुन आणावे लागते नाहीतर त्या उड्या मारतात. निवट्या मारण्यासाठी त्यावर मिठ टाकुन १५-२० मिनीटांनी त्या मरतात असे म्हणतात. पण माझ्याकडे आण्यल्यावर मिठाने २-३ तरी जिवंत राहतात. आणि मध्येच टणकन उडी मारतात. म्हणून मी सरळ फ्रिजरमध्ये टाकुन अर्धा पाऊण तासाने काढते. त्या मिठाने मारुन कापलेल्या निवट्यांतही जिव असतो. तव्यावरही ही निवटी मग उडी मारते.
निवट्यांवर काळी आणि मध्ये मध्ये आकाशी रंगाची खवले असतात. ही खवले काढून पोटाला चिर देउन पोटातील घाण काढावी, शेपुट काढावे व तिन पाण्यातुन निवटे स्वच्छ धुवुन घ्यावेत. मग त्यांना मिठ, मसाला, हळद, हिंग चोळून घ्यावे.
साफ करुन मिठ, मसाला लावलेले निवटे तव्याच्या प्रतिक्षेत आहेत.
आता गरम तव्यावर तेल सोडून निवटे मस्त शॅलोफ्राय करावेत. एकदम टेष्टी.
हे तळलेले निवटे. पोटात जाण्यास सज्ज आहेत.
ह्या तळूनच जास्त चांगल्या लागतात.
प्रतिक्रिया
19 Jan 2011 - 4:35 pm | स्पा
जागू ताई आजची पाक्रु थोडी क्रूर वाटली ;)
बाकी निवटे.. झकास दिसतायेत
19 Jan 2011 - 4:41 pm | जागु
हे दिसायला क्रुर असल तरी कोळी लोकांचा व्यवसाय व मांसाहारी लोकांचे अन्न आहे.
तसे पाहीले तर भाज्या चिरुनही आपण क्रुरपणाच करतो अस म्हणायला हरकत नाही. प्रत्येक भाजीत, कडधान्यात जिव असतो. ते तर आपण मोठ्या प्रमाणात मारतो. कडधान्याची बी जर तुम्ही रोवलित तर त्यापासुन रोप तयार होत. पन आपण त्याला शिजवतोच. त्यामुळे ह्या गोष्टी हलक्या घ्याव्यात.
19 Jan 2011 - 4:52 pm | स्पा
त्यामुळे ह्या गोष्टी हलक्या घ्याव्यात.
अर्थातच.. मी फक्त निरीक्षण नोंदवले :)
19 Jan 2011 - 4:51 pm | गवि
कोंबडी, बोकड, पापलेट सुरमई वगैरे आधीच मरून आलेले असतात.
हे डोळ्यासमोर मरतात / मारावे लागतात म्हणून क्रूर "वाटतं" फक्त.
परवाच डब्यात एकजण निवटे घेऊन आला होता..
पाकृ झकास. खूप ऑफबीट माश्यांचे प्रकार दाखवता तुम्ही..
19 Jan 2011 - 4:53 pm | गवि
काटे फार शार्प असतात वाटते. मला एक छोटासा पीस खायला मिळाला, त्यात खूप धारदार काटा होता. काटाच जास्त होता, खाद्यभाग कमी.
19 Jan 2011 - 10:20 pm | निनाद मुक्काम प...
सर्व सामन्यांची हीच तर व्यथा आहे .
दृष्टी आड सृष्टी सर्वांनाच पथ्यावर पडते .
आपण वनस्पती किंवा प्राणी खातो .कारण ते आपले अन्न आहे .
स्वताला जगवण्यासाठी दुसर्याला मारावे लागते हा निसर्गाचा नियम आहे .
जैविक साखळीतील आपण भक्षक आहोत नि ते भक्ष्य
19 Jan 2011 - 10:37 pm | प्राजु
बापरे!! जागु.. धन्य आहेस बाई!
20 Jan 2011 - 6:59 am | लवंगी
गावि गेलो की छान ताज्या मिळतात.. चव खूपच छान असते..
20 Jan 2011 - 10:33 am | सहज
हे निवटे म्हणजे अँचोव्ही चा एक प्रकार म्हणायचा का?
हे वाळवून वगैरे विकायला असतात का? नंतर भाज्यात घालायला?
20 Jan 2011 - 11:07 am | जागु
निनाद अगदी भक्षक आणि भक्ष बरोबर आहे.
प्राजु, लवंगी धन्स.
सहज कोणतेही मासे विपुल प्रमाणात मिळाले की वाळवतात. मी अजुन पाहील्या नाहीत वाळवलेल्या निवट्या पण वाळवायला हरकत नाही.
20 Jan 2011 - 2:40 pm | कच्ची कैरी
जागु तुस्सी ग्रेट हो !!!!!