मासे २०) निवटे
साहित्य :
निवटे
हिंग
हळद
मसाला
मिठ
तेल
निवट्या ह्या खाडीच्या किंवा समुद्राच्या चिखलात मिळतात. निवट्या खाडीच्या चिखलातही उडताना दिसतात. निवट्यांच्या वाट्याला कोर म्हणतात. २४ निवट्यांची एक कोर. निवट्यांमध्ये भरपुर कॅल्शियम असते असे म्हणतात. त्यांच्या डिझाईनमुळे काहिजणांना त्या आवडत नाहीत पण ते चुकी करतात कारण एकतर कॅल्शियम गमावतात आणि दुसरे म्हणजे ह्या खुप चविष्ट असतात.
पहा कसे फिशटँकमध्ये सोडण्यासारखे मासे आहेत. अगदी रंगिबिरंगी.
निवट्या बाजारात जिवंतच मिळतात. त्यांना पिशवित बांधुन आणावे लागते नाहीतर त्या उड्या मारतात. निवट्या मारण्यासाठी त्यावर मिठ टाकुन १५-२० मिनीटांनी त्या मरतात असे म्हणतात. पण माझ्याकडे आण्यल्यावर मिठाने २-३ तरी जिवंत राहतात. आणि मध्येच टणकन उडी मारतात. म्हणून मी सरळ फ्रिजरमध्ये टाकुन अर्धा पाऊण तासाने काढते. त्या मिठाने मारुन कापलेल्या निवट्यांतही जिव असतो. तव्यावरही ही निवटी मग उडी मारते.
निवट्यांवर काळी आणि मध्ये मध्ये आकाशी रंगाची खवले असतात. ही खवले काढून पोटाला चिर देउन पोटातील घाण काढावी, शेपुट काढावे व तिन पाण्यातुन निवटे स्वच्छ धुवुन घ्यावेत. मग त्यांना मिठ, मसाला, हळद, हिंग चोळून घ्यावे.
साफ करुन मिठ, मसाला लावलेले निवटे तव्याच्या प्रतिक्षेत आहेत.
आता गरम तव्यावर तेल सोडून निवटे मस्त शॅलोफ्राय करावेत. एकदम टेष्टी.
हे तळलेले निवटे. पोटात जाण्यास सज्ज आहेत.
ह्या तळूनच जास्त चांगल्या लागतात.
वाचन
15445
प्रतिक्रिया
0