ह्या नंतरची कथा काय असावी ?

अभिसरिका's picture
अभिसरिका in जनातलं, मनातलं
16 Jan 2011 - 10:18 pm

समस्त मिपाकरांनो,

धुवाधार पावसात अशीच सुचलेली ( अर्धवट, ) एका कथेची सुरवात.....जरा मदत कराल ?

दूर कुथेतरी.......गर्द हिरव्या रानात.......ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस.......उन्मत्त निसर्ग.......दूरवर लुकलुकणारे दिवे......अनोळखी वाटा......जांभळे डोंगर.....भारलेला आसमंत.....गच्च ओली मिठी......गरम श्वास......थरथरणारे देह.....ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी.....सेरभैर मन.......तो आणी ती......

कथा

प्रतिक्रिया

गणपा's picture

16 Jan 2011 - 10:24 pm | गणपा

???
हे काय आहे?

टारझन's picture

17 Jan 2011 - 11:20 am | टारझन

गच्च ओली मिठी......गरम श्वास......थरथरणारे देह.....ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी.....सेरभैर मन.......तो आणी ती......

नंतर तिने केलेला फोन ,
फोन वरचा आवाज .. "कब हुआ ये ... उम्म्म्ह्ह... टाईम ... " " क्यु रिस्क ले रहि है ? "
मग एका प्रोडक्ट ची जाहिरात.

नरेशकुमार's picture

17 Jan 2011 - 11:28 am | नरेशकुमार

ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी

यानंतर कोनतेही प्रोडक्ट काय कामाचे ?

कानडाऊ योगेशु's picture

16 Jan 2011 - 10:32 pm | कानडाऊ योगेशु

पुढे लिहायला कथेत उरले काय?

सफल होगी तेरी आराधना काहे को रोती हो?

मनावर ताबा उत्तम ताबा!

ह्या नंतर काय तेच तर विचार्ले आहे.......काय असावे ते प्रत्येकाच्या नजरेत वेगवेगळे असू शकते....

योगेश सुदाम शिन्दे's picture

16 Jan 2011 - 10:38 pm | योगेश सुदाम शिन्दे

हि फक्त सुरुवात आहे...

कहानी आपल्याला लिहायची आहे...

बाकि, आपल्याला ( मला )लिहिता येत नाहि...फक्त वाचायला जमते...( वाचाल तर वाचाल)...

अनिता's picture

16 Jan 2011 - 11:07 pm | अनिता

दूर कुथेतरी एका गर्द हिरव्या रानात होते एक ओथंबलेलं निळं आभाळ आणि बेधुंद कोसळणारा पाऊस वउन्मत्त निसर्ग ,शा॑त दूरवर लुकलुकणारे दिवे ,गूढ अनोळखी वाटा , निळे जांभळे डोंगर , म॑त्राने भारलेला आसमंत , त्याची गच्च ओली मिठी , माझा गरम श्वास , दोघा॑चे थरथरणारे देह ,त्याचा ह्ळुवार स्पर्श , केसा॑तुन निथळ्णारे पाणी , हळवे सेरभैर मन ,जपते एकच म्॑त्र - माझा तो आणी ती चा मी.

(रिकाम्या जागा भरून दिलेल्या आहेत.)

न॑तरची कथा
"अग, काही विसरलो का आपण"
"हो रे...विक्स ची ड्बी राहिली घरि...काकू म्हणाल्या होत्या, ह्या उरळीका॑चन च्या चिखलचिकित्साकेन्द्रा॑च्या उपचारा॑त मोकळ्या हवेत, थ॑डीत पावसाखाली उभे करतात, साधेदुखीसाठि..

:)

योगी९००'s picture

17 Jan 2011 - 2:06 am | योगी९००

क्या बात ..क्या बात ..क्या बात...!!!

अडगळ's picture

16 Jan 2011 - 11:00 pm | अडगळ

दूर कुथेतरी.......गर्द हिरव्या रानात.......ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस.......उन्मत्त निसर्ग.......दूरवर लुकलुकणारे दिवे......अनोळखी वाटा......जांभळे डोंगर.....भारलेला आसमंत.....गच्च ओली मिठी......गरम श्वास......थरथरणारे देह.....ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी.....सेरभैर मन.......तो आणी ती.....मौका सभी को मिलता है.

जय हिंद , जय महाराष्ट्र.

गवि's picture

16 Jan 2011 - 11:03 pm | गवि

दूर जंगलात मुसळधार पाऊस,अशामधे टर्कीफ़ाय अवस्था होते हो.पुढे निर्दिष्ट किंवा अपेक्षित गोष्टी तिथल्यातिथे करण्याचा मूड कोणाचा असेल?

कीतिही नाही म्हटले तरी मैत्रीणीला फोन करावासा वाटत आहे, ह्या कथेच्या नंतरची कथा काय असावी हे ठरवण्यासाठी.........

पंगा's picture

17 Jan 2011 - 5:25 am | पंगा

कोठल्यातरी मोबाईल कंपनीच्या जाहिरातीसाठी 'शीन' छान आहे.

'असल्या भयंकर ठिकाणी आणि प्रसंगीसुद्धा (मैत्रिणीला फोन करून विचारण्यासाठी) आमच्या कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळते.'

(शंका: कथासूत्रात 'तो आणि ती'बद्दल म्हटलेले आहे. 'ती' म्हणजे मैत्रीण असे गृहीत धरल्यास, समोरच असलेल्या मैत्रिणीला 'पुढे काय होणार?' (पक्षी: 'आता काय करू या?' ;-)) हे विचारायला मोबाईल हो कशाला लागतो?

निरसन: 'ती' समोर आहे, हा 'त्या'चा भास (खरे तर 'दिवास्वप्न') आहे. आणि, आमच्या नेटवर्कची क्लॅरिटी इतकी छान आहे, की फोनवरून बोलणारी 'ती'सुद्धा अगदी समोर उभी राहून बोलत असल्यासारखी वाटते. वगैरे वगैरे...)

पंगा's picture

17 Jan 2011 - 5:33 am | पंगा

दूर कुथेतरी.......गर्द हिरव्या रानात.......ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस.......उन्मत्त निसर्ग.......दूरवर लुकलुकणारे दिवे......अनोळखी वाटा......जांभळे डोंगर.....भारलेला आसमंत.....गच्च ओली मिठी......गरम श्वास......थरथरणारे देह.....ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी.....सेरभैर मन.......तो आणी ती......

- निळ्या आभाळात (पक्षी: दिवसाढवळ्या) दूरवर लुकलुकणारे दिवे असतात? आणि असले तरी दिसतात?

- मुळात ओथंबलेले (पक्षी: काळ्या ढगांनी भरलेले) आभाळ निळे असते? (बेधुंद पाऊस कोसळतोय म्हणजे आभाळ काळ्या ढगांनी भरलेले असणार ना?)

अशा क्षुल्लक दुरुस्त्यांची गरज आहे, असे वाटते. (एरवी 'शीन' चालून जावा.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jan 2011 - 5:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि आभाळ एवढं बदाबदा पाणी ओतत असताना दूरवर लुकलुकणारे दिवे दिसतील का?

बाकी, हे वर .... (शब्दांतः टिंब टिंब) च्या मधे लिहीलेले शब्द आहेत यांना कथा म्हणतात का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jan 2011 - 5:56 am | निनाद मुक्काम प...

जरासी सावधानी
जिंदगी भर आसनी

पंगा's picture

17 Jan 2011 - 6:00 am | पंगा

आभाळ एवढं बदाबदा पाणी ओतत असताना दूरवर लुकलुकणारे दिवे दिसतील का?

समजा अगदी आभाळ निळे नसून काळे आहे (पक्षी: दिवस नसून रात्र आहे). आभाळ एवढे बदाबदा पाणी ओतत असताना त्या दिव्यांना लुकलुकायला वीजपुरवठा राहील का? (निदान मी महाराष्ट्रात राहत असतानाचा 'मराविमं'चा माझा अनुभव लक्षात घेता साशंक आहे.)

कदाचित वीजपुरवठा 'मराविमं'चा नसून 'बेस्ट' किंवा 'बीएसईएस'चा असावा काय? कारण मुंबईतला वीजपुरवठा अशा प्रसंगीसुद्धा क्वचितच खंडित होतो, असे काहीसे ऐकून आहे. (खरेखोटे मुंबईकरच जाणोत.)

पण म्हणजे हे ठिकाण बृहन्मुंबईत आहे काय? (कारण, अन्यथा जनरेटर लावून आख्ख्या गावातले दिवे कोणी लुकलुकत ठेवेल असे वाटत नाही.)

पण बृहन्मुंबईतसुद्धा असली (म्हणजे 'शीन'मध्ये दिल्यासारखी) ठिकाणे आहेत? साशंक आहे. (मुंबईतज्ज्ञांनी खुलासा करावा.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jan 2011 - 6:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्न नुस्ताच वीजपुरवठ्याचा नाही. प्रश्न व्हीजिबिलीटीचाही (मराठी शब्द?) आहे. आकाशातून बदाबदा पाणी गळत असताना दूरवरचे (निदान एखाद किमीला मराठीत दूरवरचे दिवे म्हणत असावेत) दिवे दिसतील का?

मी मुंबईतज्ञ नसल्यामुळे तुमच्या प्रश्नांना उत्तरं नाहीत. पण अलिकडच्या (कहींसुनीं बातें) माहितीनुसार झाडं पडून तारा तुटल्याशिवाय किंवा पाणी आत जाऊन ट्रान्सफॉर्मर उडल्याशिवाय वीजपुरवठा खंडीत होत नाही. अगदीच २६ जुलै झालं तर होतं, पण साधंच बदाबदा पाणी गळताना मुंबैकरांना वीजेचं सुख असतं.

नगरीनिरंजन's picture

17 Jan 2011 - 9:05 am | नगरीनिरंजन

व्हीजिबिलीटीचाही (मराठी शब्द?) = दृष्यमानतेचाही

नरेशकुमार's picture

17 Jan 2011 - 6:56 am | नरेशकुमार

अहो, कहानी लिहायला सांगितली आहे, कहानीचे पोस्टमार्टेम नाही करायला सांगीतले.

पन असो, मनोरंजनात्मक पोस्टमार्टेम

नरेशकुमार's picture

17 Jan 2011 - 6:58 am | नरेशकुमार

ह्या नंतरची कथा काय असावी ?

अगोदरची सांगीतली तर चालेल काय ?

कानडाऊ योगेशु's picture

17 Jan 2011 - 9:23 am | कानडाऊ योगेशु

अहो निनादभाऊ..
ते आसनी नाही आसानी आहे.
जिंदगीभर आसनी ने अर्थाचा अगदीच अनर्थ होतोय!

मृत्युन्जय's picture

17 Jan 2011 - 10:01 am | मृत्युन्जय

ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस

निळं आभाळ आणि पाउस? ते सुद्धा कोसळणारा? कुठल्या ग्रहावरची ष्टोरी हाय?

रामदास's picture

17 Jan 2011 - 11:26 am | रामदास

छुट्टा नय्यै ना ...

रणजित चितळे's picture

17 Jan 2011 - 1:41 pm | रणजित चितळे

मला जेफरी आर्चर ह्यांची आठवण आली. ते अशीच गोष्ट लिहितात कित्येकदा फरक एवढाच की साधारण गोष्ट ४, ५ पाने व अर्ध्या वर सोडून तीन पर्याय देतात (वाचणा-याच्या मानसिकतेवर सोडतात) किंवा पर्याय न देता शेवट वाचणा-यावर सोडतात.

तसेच काहिसे आपण केले आहे पण वाचणा-यावर बरेचसे सोडलेले आहे.

मी_ओंकार's picture

17 Jan 2011 - 1:48 pm | मी_ओंकार

तो आणि ती .. दोन साप.

- ओंकार.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jan 2011 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार

कथेपेक्षा चित्र काढा.

असो...

ह्यावर लिहिता येईल छानशी कथा पण मग ती मचाकवर द्यावी लागेल ;)

५० फक्त's picture

17 Jan 2011 - 3:17 pm | ५० फक्त

+१

बाकी काही बोलु शकत नाही.

यावरुन आठवले - the only non-vulgar book in the world is telephone dictionary.

चिगो's picture

17 Jan 2011 - 9:14 pm | चिगो

ह्यावर लिहिता येईल छानशी कथा पण मग ती मचाकवर द्यावी लागेल

तिकडं टाका, तिथं वाचू..
फक्त त्या क्लेरीकल मिष्टेक करेक्ट करा बुवा.. (बाकीच्यांनी दाखवल्या त्या. शुद्धलेखनाची आवड हो..)

बाकी लेखिका (?) आपले टोपणनाव सार्थकी लावण्यासाठी करत असलेले
प्रयत्न पाहून अमुच्या चित्तास संतोष जाहीला.. ;-)

आदिजोशी's picture

17 Jan 2011 - 2:37 pm | आदिजोशी

दूर कुथेतरी.......गर्द हिरव्या रानात.......ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस.......उन्मत्त निसर्ग.......दूरवर लुकलुकणारे दिवे......अनोळखी वाटा......जांभळे डोंगर.....भारलेला आसमंत.....गच्च ओली मिठी......गरम श्वास......थरथरणारे देह.....ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी.....सेरभैर मन.......तो आणी ती......

त्याने तिची मान मुरगाळली...... निथळणारे पाणी थोडे आत जाऊ दिले..... ओठावर ओठ टेकवले.... आणि त्या धुंद वातावरणात..... थरथरणार्‍या हाताने.... डोळे बंद करून.... काळीज जाळत आत जाणारा..... 'ओल्ड मंक'चा एक मोठ्ठा घोट घेतला

सुहास..'s picture

17 Jan 2011 - 2:56 pm | सुहास..

दूर कुथेतरी.......गर्द हिरव्या रानात.......ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस.......उन्मत्त निसर्ग.......दूरवर लुकलुकणारे दिवे......अनोळखी वाटा......जांभळे डोंगर.....भारलेला आसमंत.....गच्च ओली मिठी......गरम श्वास......थरथरणारे देह.....ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी.....सेरभैर मन.......तो आणी ती......मग म्हातारी म्हणाली.......चल रे भोपळ्या........टुणुक टुणुक्........मग सिहांने उंदराला पंज्यात पकडले........आणि शिकार्‍याने कबुतरावर नेम धरला.......बिरबर अकबराला म्हणाला........आणि सगळ्या माकडांनी आप-आपल्या टोप्या फेकल्या........मग सिंदबाद च जहाज त्या अक्राळ-विक्राळ तडाख्यातुन सुटल.......पण बगदादच्या चोराला मात्र काहीच दाद मिळेना....... आणि हिवाळा संपला तरी माकडाचे घर बांधायचे राहुन गेले.....मग माकडाने मगरीच्या पाठीवर टुणकन उडी मारली......आणि कासवाने शर्यत जिंकली म्हणुन ससा झोपायला गेला.....शिकार्‍याच्या पायाला मुंगी चावल्याने कबुतराने सिंहाला चोच मारली......बिरबल सिंदबादच्या जहाजातल्या टोप्या शोधायला गेला....माकडाने मगरीला टोपी घातली.....आणि बगदादच्या चोराने कासवावर नेम धरला.......

विजुभाऊ's picture

17 Jan 2011 - 4:48 pm | विजुभाऊ

ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस.......उन्मत्त निसर्ग.......दूरवर लुकलुकणारे दिवे......अनोळखी वाटा......जांभळे डोंगर
या ऐवजी
घट्ट गुदमरवणारी आभाळ.... बेधुंद कोसळणारा पाऊस ...उन्मत्त निसर्ग.. दूरवर श्वापदाप्रमणारे मधुनच चमकणारे दिवे....... काळ्पत शेवाळामुळे गिळगीळीत दिसणारे डोंगर..... पाठीत भरलेली उसण्...त्याने पाय उचलायचा प्रयत्न केला.... सोनेरी पहाट व्हावी आणि त्यामुळे डोळे दिपून जावे प्राकाशित अंधार व्हावा तसे काहीसे झाले...त्याने शेजारच्या झाडाला घट्ट मिठी मारली......त्या ओल्या मिठीने ते वठलेले झाड देखील शहारले..... वातावरणात एक प्रकारचा दमट दर्प भरून राहिला होता...झाडाच्या सालीचा तो गिळगिळीत स्पर्ष होताच त्याचे सर्वांग शहारले....कधीतरी तारुण्यात चुकून घडलेला तो ओला स्पर्श आथवला... अंगावरचा शहारा अधीकच गर्द झाला... त्याला स्वतःचाच उछ्वास गरम वाटू लागला...
कोसळणार्‍या पावसाचा जोर वाढू लागला.... अचानक त्याच्या बाजूने एक उग्र दर्प येवून गेला....वातावरणात कसलासा जडपणा जाणवायला लागला...त्याच्या पोटात भडभडून आले.... आतडी गोळा होऊन उलटीतून बाहेर येतील असे वाटू लागले.....मनाची अवस्था सैरभैर.......... त्याला तीची आठवण झाली........ कालच्या अ‍ॅक्सीडेन्ट मधे ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेलेले तिचे शरीर..... तिच्या गर्भाशयाबरोबर तिच्या अनेक पिढ्या तिथेच गारद झाल्या....काळोख आता त्याच्या अदॄष्य जिभानी केवळ सभोवतालच नाही तर त्याला सुद्धा गीळून टाकत होता.....कडाडकन कुठेतरी वीज चकाकली.....त्याला त्या उजेडात जे दिसले त्यानी तो सम्पूर्ण थरारला..... त्याच्या अंगातली थंडी कुठल्या कुठे पळाली...... गार बर्फाच्या सुरीने कोणीतरी आतडी कापत आहे असे काहिसे वाटू लागले.

हे कसे वाटतय दोस्ता...........

आत्मशून्य's picture

17 Jan 2011 - 5:21 pm | आत्मशून्य

असे वाटतेय.

मान गये विजुभाऊ..
खरच काटा आला अंगावर

वाचून छान नक्कीच वाटलं नाही पण तसं ते प्रत्येक लिखाणाबाबतीत वाटावं असं मुळीच नाही. उलट एकदम वेगळा अनपेक्षित रस आणलात.. शहारा आला.

तेवढा "गारद" हा शब्द इतर भाषेशी आणि एकूण रसाशी जुळला नाही.

अभिसरिका's picture

17 Jan 2011 - 9:17 pm | अभिसरिका

हा हा हा हा हा.....हू हू हू हू .....ही ही ही ही...अजूनही काही हसण्याचे प्रकार असतील तर ते ही.........! लेख लिहीण्याची आमची कुठ्ली हो लायकी ? आम्ही कुठ्लेहो लेखकू ? आम्ही नुसतेच वाचक. पण सह्ज म्हणून खरड्लेल्या चार ओळींवर आलेल्या प्रतिक्रिया वाचून करमणूक मात्र झाली. शिवाय ईतक्या संख्येने आलेल्या प्रतिक्रिया वाचून आजचा वाचक वर्ग किती सजग आहे ह्याची कल्पना आली. प्रतिक्रियामधून अनेक खवचट सल्लेही मिळाले....असो, असतो एकेकाचा स्वभाव ! तर सांगायचा मुद्दा हा आहे दोस्तांनो.......उगीच फाल्तू गोश्टींवर वेळ घालवण्यापेक्शा उत्तम लेखनावर प्रतिक्रिया द्या. तुमचा अमूल्य वेळ अशा लेखांवर वाया जाऊ नये म्हणून हया लेखावरील प्रतिक्रिया बंद करण्यात येत आहेत. क्रुपया सहकार्य करावे ही नम्र विनंती. सुद्य्नास अधिक सांगणे न लगे.....( नाही बुवा नीट वापरता येत इथे मराथी लिपी...)

स्पा's picture

17 Jan 2011 - 9:21 pm | स्पा

आता कसं एकदम बेस्ट बोललात....
हा विचार लेख टाकायचा आधी केला असतात तर बरं झालं असतं

-- सुखसारिका वटी

मग तुमच्या सारखे सजग वाचक कसे बरं माहित झाले असते ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jan 2011 - 12:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

जरा उशीराच वाचल हे ....

असे चालेल का?

दूर कुथेतरी.......गर्द हिरव्या रानात.......ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस.......उन्मत्त निसर्ग.......दूरवर लुकलुकणारे दिवे......अनोळखी वाटा......जांभळे डोंगर.....भारलेला आसमंत.....गच्च ओली मिठी......गरम श्वास......थरथरणारे देह.....ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी.....सेरभैर मन.......तो आणी ती......अचानक तो बेंबीच्या देठा पासुन जोरात ओरडतो........."आई शी झाली...."...