किती वर्षापासून तो वृक्ष उभा !
निष्पर्ण ! उघडा !!
पर्णहीन ! म्हातारा खंगलेला !!
निष्पर्ण वृक्षावर पक्षी येत नाही वस्तीला
नाही बांधत आपल्या पिल्लासाठी घरटे
वृक्ष आसुसलेला पक्ष्यासाठी !!
बांधारे घरटे माझ्या अंगणात
फुकट देतो .फक्त येऊन राहा .
बांधा घरटे.!
रात्रीची तेवढीच मला सोबत
भीती वाटतेरे मला एकटेपणाची
एके दिवशी माणसांची जमात मला नष्ट करतील
नि नेतील मला जाळायला
आपले टीचभर पोट भरण्यासाठी !!!
पण पक्षी येतात.
ऐन हिवाळ्यात!
ओळीने बसतात
सुंदर कोवळे उन पाठीवर घेतात
उबेसाठी बसतात
मस्त शेपट्या हलवीत शिळ घालतात
मेंथून मग्न होतात !
दुपार झाली की उडून जातात
ही पाखरे ....!!
रात्रीची वस्तीला नाही येत
वृक्ष बिचारा एकटा मुकाट
निष्पर्ण वृक्ष टकाटका आठवीत बसतो
आपल्या गतकाळाच्या वेंभावाला
मुकाटपणे आपल्या देहाची चिंधी बघत
कधीपण वनवा लागू शकतो
संपलेल्या भूतकाळाच्या
हिरव्या क्षणाच्या आठवणीला
म्हातारी माणसे अशीच असतात
त्या निष्पर्ण वृक्षासारखी
परदेशी गेलेल्या मुलाची वाट बघत
जुन्या आठवणीना कुरवाळीत
यारे या !!
आनंदाचा एक क्षण
राखून ठेवलाय तुमच्या साठी !!
निष्पर्ण वृक्षावर पक्षी घरटी नाही बांधत
नाही येत ती वस्तीला ....!!!!
प्रतिक्रिया
10 Jan 2011 - 9:12 pm | गणेशा
कविता खुपच भावस्पर्शी आहे.
कविता वाचताना त्या वृक्षाची तुलना मी वृद्ध माणसाशी केली होती.. वाचत येताना खुपच गहिवरले मन.
आणि शेवटी तुम्हीही तशीच तुलना केलेली पाहुन छान वाटले ..
मुकाटपणे आपल्या देहाची चिंधी बघत
कधीपण वनवा लागू शकतो
संपलेल्या भूतकाळाच्या
हिरव्या क्षणाच्या आठवणीला
सर्व कविता आवडली, वरील कडवे जास्तच टच करुन गेले
11 Jan 2011 - 1:00 am | डावखुरा
पण पक्षी येतात.
ऐन हिवाळ्यात!
ओळीने बसतात
सुंदर कोवळे उन पाठीवर घेतात
उबेसाठी बसतात
मस्त शेपट्या हलवीत शिळ घालतात
मेंथून मग्न होतात !
दुपार झाली की उडून जातात
या ओळींत मान्वी प्रवृत्ती मस्त कॅप्चर झालीय...भरभराटीच्या काळात सोबत देण्याची..
11 Jan 2011 - 6:37 am | नरेशकुमार
खरे आहे.
नुसते परदेशीच नाहि तर एकाच शहरात रहात असलेल्या आई वडिलांची परिस्थिति सुध्दा अशिच असु शकते.
11 Jan 2011 - 5:36 pm | अनुराग
खरे आहे.
नुसते परदेशीच नाहि तर एकाच शहरात रहात असलेल्या आई वडिलांची परिस्थिति सुध्दा अशिच असु शकते.