बायको : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
10 Jan 2011 - 12:03 pm

बायको : नागपुरी तडका

थोडीशी पगली, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥१॥

सलवार घाल म्हनलं तं नववारी घालते
कपाळाच्या मंधामंधी गोल कुंकू लावते
टिकल्या-मिकल्या लावाच्या फ़ंदात पडत नाही
गळ्यामंधी गुंजीभर सोनं मिरवत नाही
थोडशी येडपट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥२॥

सिनेमा पाहू म्हनलं तं भागवतात जाते
माह्यासाठी मुठभर शिरनी घेऊन येते
मास-मच्छी-अंडीले हात लावत नाही
तरी बाप्प्पा तीले काही देव पावत नाही
थोडीशी भोळसट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥३॥

सार्‍यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते
कवाकवा पानी पिऊन तशीच झोपी जाते
सडासारवन, धूनंपानी, अभय सारं करते
पहाटपासून रातपावतर मरमर मरते
थोडीशी कष्टीक, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥४॥

गंगाधर मुटे
-------------------------------------------------
शीरनी = प्रसाद, सायको = Psycho
-------------------------------------------------

कविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Jan 2011 - 12:08 pm | अवलिया

सार्‍यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते
कवाकवा पानी पिऊन तशीच झोपी जाते
सडासारवन, धूनंपानी, अभय सारं करते
पहाटपासून रातपावतर मरमर मरते

पुढल्या जन्मी तुम्हाला रेडी टु कुक पाकिटं आणून खाउ घालणारी माडर्न बायको मिळावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

अवांतर - तडका छान !

रुपाली प्रा॑जळे's picture

10 Jan 2011 - 3:52 pm | रुपाली प्रा॑जळे

वा खुपच छान..
भोळ्सर कश्टाळु व चा॑गली बायको फक्त विदर्भातल्याच असतात.

वर्हाडी भाशेले मिसळपाव या वेब साईट वर मिरवल्यबद्दल मी अमरावतीकर लय आभार मान्ते..

पर्नल नेने मराठे's picture

10 Jan 2011 - 7:29 pm | पर्नल नेने मराठे

अय रुपाली....आम्ही सुढ्हा भोळ्सर कश्टाळु व चा॑गल्या बायका आहोत विदर्भातल्या नसलो नाही म्हणुन काय झाले.

श्रावण मोडक's picture

10 Jan 2011 - 4:38 pm | श्रावण मोडक

हे भाग्य कुठून येतं हे सांगा, इथल्या अनेकांना मार्गदर्शन होईल. :)
तडका आवडला.

नगरीनिरंजन's picture

10 Jan 2011 - 7:21 pm | नगरीनिरंजन

तडका नेहमीप्रमाणेच खुमासदार. बाकी वरील प्रमाणे.

गंगाधर मुटे's picture

10 Jan 2011 - 9:56 pm | गंगाधर मुटे

हे भाग्य कुठून येतं हे सांगा, इथल्या अनेकांना मार्गदर्शन होईल.

लई बीक्कट वाट आस्ते भाऊ. ;)

शुचि's picture

10 Jan 2011 - 8:40 pm | शुचि

आक्षी ग्वाड!!

कविता मस्त

सार्‍यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते
कवाकवा पानी पिऊन तशीच झोपी जाते
सडासारवन, धूनंपानी, अभय सारं करते
पहाटपासून रातपावतर मरमर मरते
थोडीशी कष्टीक, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....

गावाकडिल घराघरातल्या बायकांचे हे वर्णन हुबेहुब वाटले

नीलकांत's picture

10 Jan 2011 - 9:30 pm | नीलकांत

मले आवळला तडका. हे नशीब कुटी भेटते ते सांगा ;) लय लोकं हायंत अटी इच्छुक !

- नीलकांत

गंगाधर मुटे's picture

10 Jan 2011 - 9:49 pm | गंगाधर मुटे

हे नशीब कुटी भेटते ते सांगा.

हे नशीब नशीबात असावे लागते. ;)

गंगाधर मुटे's picture

10 Jan 2011 - 9:46 pm | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ग्रामीण स्त्रीचे प्रतिनिधीक दर्शन जरी या कवितेतून घडले, तरी ही कविता यशस्वी झाली समजायची.
आणि या पिढीसोबतच ही संस्कृती लयास जाण्याची दाट शक्यता आहे.

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 6:56 am | नरेशकुमार

अक्षरशः माझ्याच बायकोचे वर्णन आहे असे वाटले.

मस्त तडका

पर्नल नेने मराठे's picture

11 Jan 2011 - 12:12 pm | पर्नल नेने मराठे

नकुचा .अचरटपणा. सुरुच आहे का अजुन :|

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 12:19 pm | नरेशकुमार

अहो पर्नल दिदि,
का असे आप्ल्याला अचरटपणा वाटत आहे समजेल का ?

एक चुक झाली मानसाच्या हातुन तर काय कायमचा कलंकच लावु नका माझ्या माथी. चुक झाली तर माफ करा ना मोठ्या मनाने, सोडुन द्या ना. आता काय बोलु यावर.

मोहन's picture

11 Jan 2011 - 1:07 pm | मोहन

आता तुमी कायले आपल्या बाईले मिसल पावात आनता जी. थी आपल्या घराकड बरी हाय ना.

गंगाधर मुटे's picture

11 Jan 2011 - 3:24 pm | गंगाधर मुटे

कवितेत वर्णन केली तशीच माझी बायकोही असेल, हे अजिबात आवश्यक नाही. ;)

पण कवितेत वर्णन झालेले रूप हे समस्त भारतीय स्त्रीयांच्या अंगभूत गुणांचे एक रूप आहे हे नक्की.
कदाचीत वरील सर्वच गुण एकाच स्त्रीत सापडेल असे नसेल, पण भारतीय स्त्रीत्व यातच सामावले आहे हे नक्कीच.

नववारी,सहावारी,सलवार कमीज, कुंकू,टीकली ही काळानुरूप बदलती रूपे आहेत. त्यात विशेष काही नाही.

परंतू कवितेत वर्णन केली तशीच माझी बायको असेल असे जरी गृहित धरले तरी मला त्यात कमीपणा वाटण्यासारखे काहीच नाही, उलटपक्षी अभिमानच वाटेल.

जेथे दुसर्‍याच्या ताटातील हिसकून खाणे, हीच सभ्यता ठरत असेल तेथे स्वतःच्या ताटातील इतरांना खाऊ घालणारी व्यक्ती वेडी,पगली आणि सायकोच म्हणावी लागेल. नाही का? आणि भारतीय स्त्रित्वात हा गूण ठासून भरला आहे :)

जेथे दुसर्‍याच्या ताटातील हिसकून खाणे, हीच सभ्यता ठरत असेल तेथे स्वतःच्या ताटातील इतरांना खाऊ घालणारी व्यक्ती वेडी,पगली आणि सायकोच म्हणावी लागेल. नाही का? आणि भारतीय स्त्रित्वात हा गूण ठासून भरला आहे

क्या बात है ! जबरा !!

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 3:30 pm | नरेशकुमार

खरे तर मला मधि पडन्याचे काहि कारन नाही,
पन तरिसुध्दा राहवुन गेले नाही.

आता तुमी कायले आपल्या बाईले मिसल पावात आनता जी.

काय होते मधि आनले तर, इथे असन्ख्य भगिनि येतात, तिथे कोनि आपल्या बायकोचे वर्नन केले तरी काय फरक पडतो.

थी आपल्या घराकड बरी हाय ना.

भगिनिंनो, याचे उत्तर तुम्हिच द्या.

मदनबाण's picture

12 Jan 2011 - 6:30 am | मदनबाण

छान... :)