स्वताभोवतीच्या ह्या पिंजर्यात पक्ष्याने कुठे उडायचे...
त्याच त्याच भिंती चहुकडे नविन त्यात काय पहायचे ...
तितक्यात त्याला दिसला समोर आइना
पाहावे त्यात वाटले पण धाडस कही होइना
दिसेल आपलाच भेसूर चेहरा ह्या जाणिवेने काळजाचा ठोका चुकला आणि
जीवन्त पणाचा आभास जपत त्याने आपला एक पंख छाटला
आता नको ते उडणे, नको तो स्वच्छंद हट्ट
मिटून घेतले अंग अंग मिटून घेतले डोळे घट्ट
पसरला जीवघेणा काळोख, दाटला अंधार मिट्ट वाटले आला शेवट ...
भेदरून मी घाबरून मी मिटलो अर्धवट ... मी उरलो अर्धवट ...
प्रतिक्रिया
3 Jan 2011 - 8:12 pm | गणेशा
गुढ कविता .. आ॑वडली,
गुढते मध्ये नक्की काय सांगायचे आहे हे कळाले नाही.. पण नक्कीच कुठला तरी अर्थ यात नक्कीच असेन असे वाचताना वाचत गेलो ..
शब्दार्थापलीकडिल शब्द आवडले
4 Jan 2011 - 6:53 am | मदनबाण
छान...