तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता
मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता
तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा
उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता
जरी बेताल मी आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा
तिने सौंदर्य वर्खाचाच - प्याला पाजला होता
तुझा मुखचंद्रमा पाहून- मुखडा गाइला होता
चेहरा रोजचा दु:खी - सुखाने माजला होता
असे स्वप्नात ही व्हावे ? तुला मी फूल देताना
घड्याळातून काटेरी -गजर ही वाजला होता
मला पाहून आताशा - म्हणे हा आरसा मजला
असा मयुरेश नाही पाहिला - जो आजला होता.
मयुरेश साने...दि...२९-डिसेंबर-१०
प्रतिक्रिया
2 Jan 2011 - 1:21 pm | विनायक बेलापुरे
मयुरेश
:) मजा आया.
तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता
मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता - बोलती बंद झालेली फार मस्त सांगितली तुम्ही. :)
सौंदर्याचा वर्ख पाजला होता तर अप्रतिम कल्पना.
तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा
उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता
हे वाचून संदीप (खरे) ची प्रेयसीवरची कविता आठवली. अश्शी नाजूक की चांदण्यात झोपलीस म्हणून काळी पडलीस. :)
2 Jan 2011 - 2:23 pm | पियुशा
मस्त मस्त लिहिलेय !
4 Jan 2011 - 6:55 am | मदनबाण
सुरेख... :)
14 Jul 2017 - 2:54 am | सत्यजित...
>>>तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता
मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता>>>व्वाह् व्वा...
>>>तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा
उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता>>>क्या बात!
14 Jul 2017 - 3:03 am | सत्यजित...
अवांतर—माझा एक शेर आठवला...
'काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू...
घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले!'