थिजलेला पारा, निजलेला वारा,
गुलाबी पहाटे, भिजलेल्या तारा,
धरतीवर दाट, धुके पहुडले,
त्यात गुपित, नव्या वर्षाचे दडले,
उगवेल दिनकर, धुके विरेल,
उघडेल गुपित, जादू घडेल,
हीच जादू आपल्या, आयुष्यात घडावी,
आमच्या शुभेच्छांची लहर, त्या सोबत जडावी ||
हे मिपावरील माझे पहिले लेखन आहे, तेव्हा काही चुकले असल्यास माफी असावी.
ख्रिस्ती नूतन वर्षाच्या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक शुभेच्छा।
प्रतिक्रिया
1 Jan 2011 - 2:21 pm | पाषाणभेद
सर्व मराठी बोलणार्यांना, लिहीणार्यांना अन वाचणार्यांना विंग्रजी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
येथे चुकायची भिती बाळगू नका. मन मोकळे लिहा. कोन काय बोललं तर हायेच आपून.
:-)
1 Jan 2011 - 10:20 pm | भाववेडा
खूप खूप धन्यवाद... :)