प्रत्येक दिवस नूतन आहे...

ज्ञानराम's picture
ज्ञानराम in कलादालन
31 Dec 2010 - 4:47 pm

आज सिंहावलोकन करावं , भूतकाळाचं प्रतिबिंब पहावं
पदरची घालून माती , आठवणींच रोप लावाव..

सांगा किती प्रयत्न केले , आणि किती निसटल्या संधी ?
किती जगलो झूरत झूरत , आणि जगलो किती स्वच्छंदी

किती दिले घाव शब्दांचे , किती भरल्या जखमा नंतर,
किती वाटा चूकल्या धावताना , आणि चाललो किती अतंर

किती बहरला गुलमोहोर प्रेमाचा , आणि किती निवडूंग झालो
कितीदा पेटून उठलो हक्काने , आणि कितीदा लाचार झालो

सारं इथेच सूटत जाईल , वेळ आणखी संपत जाईल
पूसट होतील पाऊलखूणा , शेवटी फक्त आठवण राहील

दिवस येईल नव्याने , पण तो ही नंतर सरुन जाईल,
नविन इथे काहिच नाहि, आठव फक्त स्मरुन राहिल

उगाच नको गोंधळ शब्दाचा , सारं काही नितळ आहे,
जरी सरल्या असंख्य रात्री , प्रत्येक दिवस नूतन आहे...

कविता

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

31 Dec 2010 - 4:58 pm | अमोल केळकर

चांगली कविता.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!

अमोल केळकर

विजुभाऊ's picture

31 Dec 2010 - 6:15 pm | विजुभाऊ

साध्या सोप्या रचनेची गम्मत काही निराळीच असते.
छान

प्रत्येक ओळ आणि ओळ सुंदर आहे ..

मनापासुन आवडली कविता

अप्रतिम सुंदर कविता. फारच पटली.

विलासराव's picture

4 Jan 2011 - 10:29 am | विलासराव

अप्रतिम अशी कविता.
फार्फार आवडली.