आज वाटले इतक्या लवकर रात सरली ... आभाळ निळावले
पण कुशीतून तुझ्या मोकळे होण्यास मन आळसावले ...
सांगत होते अगतिक मन अजून फिटली नाही हौस
झेलूदे चार हाताच्या ओंजळीत हा दवाचा पाउस
झटकून मोकळे केस उठून लगबगीने कुठे जासी ?
झालो आहे ह्या मोहरानात मी वनवासी ...
शोधात होत्या अनंत काळ तुला माझ्या चुरगळलेल्या नजरा ..
हातात उरला होता तुझ्या सुगंधाने घमघमणारा गजरा ...
समजावले मनाला .. चला भरायचे आहे पोट ...
पुन्हा एकदा ........ मी माझाच केला कडेलोट ...
प्रतिक्रिया
31 Dec 2010 - 11:53 am | चाणक्य
च्यायला. भारी
स्वाक्षरी-