लाखाचा असो वा कोटीचा, तुमचे आमचे सेम असते..........

अमोल देशमुख's picture
अमोल देशमुख in जे न देखे रवी...
31 Dec 2010 - 10:00 am

आदर्श म्हणॆ लवासाला
तु किती लाखाचा
तर टु-जी म्हणे सी.डब्ल्यु.जी ला
तु किती कोटीचा
एक घोटाळा म्हणे दुस-याला
काडीने खाल्ले काय अन
हाताने खाल्ले काय
शेण म्हणजे शेण असते
लाखाचा असो वा कोटीचा
तुमचे आमचे सेम असते

अनंत घोटाळ्यांनी गाजलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना खरव आनंद होतो आहे, २०१० हे वर्षच मुळी महाघोटाळ्यांचे वर्ष म्हणुन गणले जाते की काय इतके मोठे घोटाळे या सरत्या वर्षात झाले. कॉमनवेल्थ घोटाळा काय अव टु-जी स्पेक्ट्र्म घोटाळा काय यांनी मागील सर्व घोटाळ्यांचे विक्रम मोडीस काढले, भारताचा अर्थव्यवस्था खिळखीळी होती की काय अशी परीस्थीती या घोटाळ्यांनी निर्माण केली. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरी जावे लागले, दोन केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई झाली, एखाद्या क्रिकेट्पटुने खेळताना नवनवे उच्चांक प्रस्थापीत करावेत तसे नेत्यांनी नवनवीन घोटाळ्यांचे उच्चांक प्रस्थापीत केले.

सरत्या वर्षात महागाईने उच्चांक गाठला, पेट्रोलच्या भावात तब्बल सहा वेळा वाढ झाली, सामान्य माणसाचा जीव या महागाईत होरपळुन निघाला, कांद्याने सामान्य माणसाबरोबर सरकारच्या ही डोळ्यात पाणी आणले, सततच्या पावसाने शेतीमालावर खुप परिणाम झाला,

काही चांगले झाले असेलही परंतु २०१० ने जनतेला महागाई, भ्रष्टाचार आणि त्रास हेच जास्त प्रमाणात दिले.

विडंबन

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

31 Dec 2010 - 12:07 pm | प्रकाश१११

काडीने खाल्ले काय अन
हाताने खाल्ले काय
शेण म्हणजे शेण असते
छान .आवडले .!!

काडीने खाल्ले काय अन
हाताने खाल्ले काय
शेण म्हणजे शेण असते

ह्या ओळी आवडल्या !!

परिकथेतील राजकुमार's picture

31 Dec 2010 - 4:51 pm | परिकथेतील राजकुमार

काडीने खाल्ले काय अन
हाताने खाल्ले काय
शेण म्हणजे शेण असते
छान .आवडले .!!

अहो प्रकाशकाका जरा सुरक्षित अंतर राखत जा हो प्रतिसादात.

२०१० या वर्षी खूप महाघोटाळे झाले पेक्षा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात महाघोटाळे उघडकीला आले.

तेव्हा चांगलीच गोष्ट आहे. आनंद आहे.

बाकी हे घोटाळे अनादि काळापासून चालूच आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Dec 2010 - 3:17 pm | निनाद मुक्काम प...

घोटाळे उघडकीस आले हे खरे पण ते बाहेर आणण्यात सामान्य माणूस किंवा पत्रकार अथवा सध्या पोलीस किंवा सनदी अधिकार्याचा कितापर सहभाग होता .माझ्या मते राजकीय डावपेच व पूर्वीचा स्कोर सेटल करण्यासाठी हे घोटाळे बाहेर उघडकीस आणले .सामान्य जनता मुकावाचक हतबल असल्यासारखी तमाशा पाहत राहिली .

होय यार.. हे ही खरेच..

एकूण घोटाळे बाहेर आले..काही ना काही कारणाने..

तेही ठीकच.

प्रॉबेबल फ्यूचर स्कोर सेटलिंग आणि विरोधकांची काकदृष्टी हेही "मीडिया"किंवा "लोकक्षोभ" यांच्यासारखेच एका वेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारविरोधी जरब बसवणारे घटक आहेतच लोकशाहीतले. आणि ते अधिकाधिक इफेक्टिव्ह होत असतील तर उत्तमच..

अमोल केळकर's picture

31 Dec 2010 - 4:55 pm | अमोल केळकर

छान :)

अमोल