या गरमीला काय करावे बॉ?

वेदश्री's picture
वेदश्री in काथ्याकूट
28 Apr 2008 - 12:41 pm
गाभा: 

इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही. ढीगभर काळजी घेत घरातच पडून राहूनदेखील जात्याच उष्ण प्रकृती असल्याने तोंडावर जर उठला आहे. दोन दिवसांनी घरी जायचे आहे. असे थोबाड घेऊन घरी गेले तर घाबरतील सगळे ( हापिसातही घाबरतातच आहेत पण बोलू शकत नाहीत तसे कोणी.. ) लवक्कर फरक पडेल असा काही उपाय आहे का कोणाकडे?

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

28 Apr 2008 - 12:44 pm | मनस्वी

गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव.
पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.

वेडझवा's picture

30 Apr 2008 - 11:39 am | वेडझवा

टक्क्ल करुन बघ डोक्यवर. मि उन्हाळ्यात नेहमि करितो. लगेच परिनाम येतो

--
असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 9:10 pm | तुमचा अभिषेक

स्पाईक कट .. मी करतो दर उन्हाळ्यात.. बाजूने आणि टाळूवरून मशीन फिरवून कापून घ्यायचे बारीक.. आणि पुढे थोडासा कोंबडा वर काढायचा.. गर्मी पासून आराम.. साबण, तेल कमी लागते.. केस विचंरायची झंझट नाही.. पुढे पावसाळा सुरू झाल्यावरही भिजलेल्या केसांनी सर्दी पकडायचा त्रास नको असल्यास हिच हेअरस्टाईल कंटीन्यू करू शकतो.. माझी यंदाची हेअर कटींग जरा लांबलीय, मात्र येत्या आठवड्यात मुहुर्त काढतोय..

टवाळ कार्टा's picture

26 Mar 2015 - 1:29 pm | टवाळ कार्टा

आपल्या सारख्या आयडीचे पायसुध्धा मिपाला लागलेले हे पाहून धन्य झालो =))

शान्तिप्रिय's picture

9 Mar 2018 - 10:34 am | शान्तिप्रिय

सम्पादक
हा आयडी नाकरला कसा नाहि?

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 12:53 pm | वेदश्री

>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव.

गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे.. :(

>पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.

हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !

आर्य's picture

28 Apr 2008 - 1:16 pm | आर्य

वेदश्री,
मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय,
आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात.

ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे.
किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल)
रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे.
जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर.
दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम.
हेच प्रवासा साठी ही लागु आहे.

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 1:31 pm | वेदश्री

>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय,
>आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात.

बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता..

>ऊन्हात भटकणे वर्ज.

हे केले आहे.

> फिरल्यास डोक्याला टप्पर हवे.

हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. :(

>किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल)

दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा..

>रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे.

दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय..

>जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर.

तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही..

>दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम.

फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही.

>हेच प्रवासा साठी ही लागु आहे.

प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 1:33 pm | धमाल मुलगा

वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे!

त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!!

कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो.

-(निमहक़ीम) ध मा ल.

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 1:37 pm | वेदश्री

>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!!

तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. :(

>कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी.

हे एक बरं झालं.

> त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो.

एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.

मनस्वी's picture

28 Apr 2008 - 1:43 pm | मनस्वी

तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..

का बरे?

आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..

म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 1:47 pm | वेदश्री

>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
>का बरे?
कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला? :(

>>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
>म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.
चांगली दिसत नाही ना पण..

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 1:51 pm | धमाल मुलगा

पण प्रॉब्लेम काय आहे?

एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!!

करुन बघच...कस्सलं गारगार वाटतं

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 1:57 pm | वेदश्री

>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!!

बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. :( पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !

धमाल मुलगा's picture

30 Apr 2008 - 10:38 am | धमाल मुलगा

:/

बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात.

बुट पायात घालतात ना?
मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात?

आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी....
मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला....

ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं....

ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला...
बोला कोणकोण येतंय?

आनंदयात्री's picture

30 Apr 2008 - 10:45 am | आनंदयात्री

चल जाउयात !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Apr 2009 - 12:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

एक किन्गफिशर स्ट्रॉग घे मला चकणा काय पन चालेल?

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

विजुभाऊ's picture

22 Feb 2014 - 2:21 am | विजुभाऊ

धम्या प्रश्न सुटला का रे?

शैलेन्द्र's picture

22 Feb 2014 - 6:18 am | शैलेन्द्र

उत्तर पण सुटलं, :)

मनस्वी's picture

28 Apr 2008 - 1:51 pm | मनस्वी

तळपायाला. कोणी तुला पायावर नक्षीदार मेंदी काढायला नाही सांगते.

निवेदिता-ताई's picture

22 Apr 2014 - 11:40 am | निवेदिता-ताई

रात्री तळपायाला तेल लाव, चांगले घासून घासून लाव्...खूप नको....त्यामुळे सगळी उष्णता बाहेर पडते... :)

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2014 - 12:42 am | धर्मराजमुटके

२००८ च्या प्रश्नावर २०१४ साली उत्तर देता होय ? उत्तर शोधायला पंचवार्षीक योजना राबवली की काय ? :)

आयुर्हित's picture

25 Apr 2014 - 2:25 pm | आयुर्हित

धन्यवाद निवेदिता-ताई,महत्वाचा सल्ला आहे आहे हा!

धर्मराजमुटकेजी,
पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली
- - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 एप्रिल 2014 - 03:00 AM IST

पंचवार्षीक योजने ऐवजी पंचेचाळीसवार्षिक करायला आपली काही हरकत नसावी!

परिकथेतील राजकुमार's picture

31 Mar 2013 - 10:54 am | परिकथेतील राजकुमार

सालाबादप्रमाणे, रसिक मिपाकरांच्या आग्रहाखातर हा लेख ह्या 'गरमीत' देखील वर आणला आहे.

प्यारे१'s picture

31 Mar 2013 - 2:14 pm | प्यारे१

गुजरातेत 'बसायची' व्यवस्था आहे का रे परा?

उपास's picture

1 Apr 2013 - 11:01 pm | उपास

पराशेठ,
अत्ता तर होळीची बोंब झाली आणि एकदम गरमी, चैत्रांगण/ वसंतोत्स्व काही आहे की नाही? कोकीळांच काय झालं ह्या गरमीत? आणि गरमी वाढलेय म्हणजे आंब्याचा काय अंदाज.. मोहोरलाय ना? ;)

विजुभाऊ's picture

28 Apr 2008 - 1:39 pm | विजुभाऊ

एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.
बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास.
उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता.
पोहणे हाही एक मस्त उपाय

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 1:44 pm | वेदश्री

>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास.

'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! )

>उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता.

बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले !

>पोहणे हाही एक मस्त उपाय
येत नाही त्यामुळे शक्य नाही.

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2008 - 2:03 pm | प्रभाकर पेठकर

कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे
हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे.
पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे.
तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते.
फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने
एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..

रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 2:19 pm | वेदश्री

>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
:,(
>ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.

माझी दुनिया's picture

30 Apr 2008 - 1:15 pm | माझी दुनिया

अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ? ~X(
आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय. #:S

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

केशवसुमार's picture

28 Apr 2008 - 8:10 pm | केशवसुमार

रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.
ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
(सहमत)केशवसुमार
स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?

नारदाचार्य's picture

28 Apr 2008 - 8:14 pm | नारदाचार्य

गाठ या दोघींची. ती वरदा. (वरदा वैद्य नव्हे, फक्त वरदा. नाही तर तुम्ही भलताच घोळ करायचे.)

स्वाती राजेश's picture

28 Apr 2008 - 2:11 pm | स्वाती राजेश

दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव.
सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे.
२-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील).

तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2008 - 2:23 pm | प्रभाकर पेठकर

अनुष्पोटी

मी अनुष्कापोटी वाचले. सॉरी.....

भडकमकर मास्तर's picture

28 Apr 2008 - 5:27 pm | भडकमकर मास्तर

अगदी हेच म्हणतो... =)) =)) =))

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 2:27 pm | धमाल मुलगा

हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही...

फारच त्रास होत असेल तर...
थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या.
आता कोपर्‍यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात....
डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले.....
आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.

मनस्वी's picture

28 Apr 2008 - 2:38 pm | मनस्वी

>>बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले.....
आणी स्वतः फ्रिजमध्ये बसून प्यावे.. म्हणजे त्रिवेणी संगम!

आनंदयात्री's picture

28 Apr 2008 - 2:56 pm | आनंदयात्री

भारीच. पण धम्याचा उपायपण भारी :)

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 2:39 pm | वेदश्री

नो कॉमेंट्स

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2008 - 2:44 pm | प्रभाकर पेठकर

रे धमाल मुला,
तू रामदासस्वामींना विवाह सोहळ्याचे वर्णन करून सांगतो आहेस.

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 3:31 pm | धमाल मुलगा

च्यामारी...

=))

पोहणे हाही एक मस्त उपाय

आहा हा......!!!....काय उपाय सांगीतलात विजूभाऊ, कृष्णा काठ अठवला.

धोंडोपंत's picture

28 Apr 2008 - 2:57 pm | धोंडोपंत

एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे.

दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल.

तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर.

गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल.

आपला,
(धन्वंतरी) धोंडोपंत :D

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 3:15 pm | वेदश्री

>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे.
छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते.
>दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल.
वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही.
>तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर.
घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते.
>गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे.
हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची.
>शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल.
तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते? :-/

मनस्वी's picture

28 Apr 2008 - 3:41 pm | मनस्वी

वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही.

अरे बापरे!

विजुभाऊ's picture

28 Apr 2008 - 4:08 pm | विजुभाऊ

वेदश्रीधर्म?
हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
दशावतरी पहनारा इजुभौ आगरी

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 4:27 pm | वेदश्री

हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.

अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा ! :)

विजुभाऊ's picture

29 Apr 2008 - 12:03 pm | विजुभाऊ

:$ म्या कुटं म्हनलं की रामायन म्हून. आमच्या महाडात ज्यादा करुन दशावतारी त म्हाभारतच घेत्यात जी

भडकमकर मास्तर's picture

28 Apr 2008 - 5:37 pm | भडकमकर मास्तर

:S :S :S गरमी??/ :/ :/ :/ घाबरलोच...
मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :<

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 5:39 pm | धमाल मुलगा

=))

मास्तर, अहो काय हे? आयला !!!!

केशवसुमार's picture

28 Apr 2008 - 8:07 pm | केशवसुमार

काय मास्तर
सगळ ठिक आहेना.. गरमी??/ घाबरलोच...
हा हा हा हा..
(संशयी)केशवसुमार
स्वगत :- सध्या वेगळेच क्लास चालू आहेत वाटत!

डॉ.प्रसाद दाढे's picture

1 May 2008 - 9:03 am | डॉ.प्रसाद दाढे

मलाही तेच वाटले पहिल्या॑दा (करप्ट माई॑ड)
मिपा बा॑धवा॑नी सुचविलेले एकसे एक उपाय वाचून मात्र खूप दिवसा॑नी पोट धरून हसलो..
त्यातल्या त्यात धमालचाच उपाय चा॑गला आहे..( बडवायझर चा॑गली की कि॑गफिशर रे?? :)

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 12:17 pm | धमाल मुलगा

किंगफिशर जर वरिजनल नाही मिळाली आणि ती स्ट्राँग असेल तर फुकट छातीची जळजळ पदरी पडेल...

बडवायझर माईल्ड सध्या उत्तम मिळते....अजुनतरी तिची ड्युप्लिकेट आलेली नाही :)
बाकी फॉस्टर्स किंवा बॅरॉनही चालेल....छान आहेत...औषध चांगलं लागू पडेल :)

स्वाती राजेश's picture

28 Apr 2008 - 6:29 pm | स्वाती राजेश

महत्वाची सूचना:
वरील सर्व उपाय एकाचवेळी करू नयेत. नाहीतर?????????:)

केशवसुमार's picture

28 Apr 2008 - 8:14 pm | केशवसुमार

थंड होशील असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
केशवसुमार
स्वगत :- येव्हढे स्पष्ट बोलायची काय गरज आहे का?

असे विचारत बसावे लागेल!

वाटाड्या...'s picture

28 Apr 2008 - 7:05 pm | वाटाड्या...

मलाही असाच त्रास होता. आमच्या घरातच आहे म्हणा ना. २ जालीम उपाय मी केले आणी कायमची उष्णता विकाराची वाट लावली,

१. कोकम सरबत (बर्फ न घालता) - २ ग्लास नियमित,
२. सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल.

मुकुल

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2008 - 8:41 pm | प्रभाकर पेठकर

सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल.
माझाही असाच अनुभव आहे. पण जास्त प्रभावशाली परिणामासाठी मी दीड लिटर पाणी दांत घासायच्या आधी प्यायचो नंतर फक्त दात घासायचे, २ तास काहीही खायचे प्यायचे नाही असा उपाय केला होता. ३ आठवड्यात अनेक तक्रारी दूर झाल्या. तळपायाची, डोळ्यांची आग, किडणी शुद्धीकरण, तापमान नियमन, पोट साफ असे अनेक फयदे आहेत. (तेही फुकटात.)

नारदाचार्य's picture

28 Apr 2008 - 9:01 pm | नारदाचार्य

आरंभासाठी पाण्याचे प्रमाण ७५० मिली (ब्रॉडली स्पिकींग, एक खंबा) हेच योग्य. पुढं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवत १५०० मिली (दोन खंबे) करायचं असं ते सूत्र आहे. कंसाचा विचार करता हे पटावं.... :D

शरुबाबा's picture

28 Apr 2008 - 7:33 pm | शरुबाबा

भरपुर गरम चहा प्या कारण शेवटी जहर ही जहर को काटता हे

अण्णा हजारे's picture

28 Apr 2008 - 8:01 pm | अण्णा हजारे

वैद्य पाटणकर काढा ह्या वर अतिउत्तम!शरीरातील उष्णता,कडकी,अपचन या सारख्या विकारांवर ताबडतोब गुणकारी
दररोज ३ ते ४ चमचे रात्री जेवणानंतर व आठवडाअखेरीस किमान ६० मिली घेणे.
ता.क. झाडा जास्त झाल्यास मात्रा कमी घेणे.
आयुर्वेद प्रेमी,
अण्णा हजारे

रामदास's picture

28 Apr 2008 - 9:55 pm | रामदास

पीव्हीसी सोल असलेली चप्पल वापरणे बंद करावे.
दर तीस मिनिटांनी २०० मिलि पाणी प्यावे. अधुनमधुन पाण्यात किंचीत मिठ . नाहीतर पायात गोळे ,पेटके येतात.
चहा बंद. गोगल वापरणे मस्ट.कूल कूल पावडर वापरू नये.

अभिता's picture

29 Apr 2008 - 1:49 am | अभिता

डोळे येतात तेव्हा जी छोटी टयुब मिळ्ते ति डोळ्यात घालावी.नाहितर नेत्राजन घालावे.लवकर आराम मिळतो.

अभिता's picture

29 Apr 2008 - 1:51 am | अभिता

उश्णते वर उपाय आहे.

विजुभाऊ's picture

29 Apr 2008 - 2:39 pm | विजुभाऊ

काय उपाय आहे ते सांगा ना. की तो सर्वांदेखत सांगण्यासारखा नाही

वेदश्री's picture

29 Apr 2008 - 12:36 pm | वेदश्री

मिपाकरांनी उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

काल संध्याकाळी तापाने फणफणल्याने कुठलाच उपाय करता जमला नाही पण आजपासून सुरूवात करेन गुलकंद घेणे, मीठाच्या पाण्यात अर्धा तास पाय बुडवून बसणे असे सहजसुलभ उपाय अवलंबायला. भाचर्‍यांना आगाऊ सूचना देऊन ठेवली आहे की आत्या/मावशीला हॉरर रुपात बघायला तयार रहा म्हणून..

नंदा प्रधान's picture

30 Apr 2008 - 6:05 am | नंदा प्रधान

आत्या मावशी,
सकाळी सकाळी चार अंडी एक ग्लासात फोडून एका दमात गटकवुन टाकायची आणि मस्त पैकी १ मैल धावुन यायच. दाद खाज खुजली गर्मी सगळ एका झटक्यात साफ.
-(रॉकी फॅन) नंदा

विश्वजीत's picture

30 Apr 2008 - 12:06 am | विश्वजीत

हॉरर आत्यामावशी? आणि भाचर्‍या कोण?

...असे कोणीतरी म्हटले आहे.

थंडी वाजत असेल तर उजव्या नाकपुडीने.

व्यंकट

विजुभाऊ's picture

30 Apr 2008 - 7:59 pm | विजुभाऊ

दोन्ही नाकपुड्या बंद केल्या तर सर्वच त्रास एकदम संपतील

व्यंकट's picture

30 Apr 2008 - 10:12 pm | व्यंकट

हा हा हा.. खरं आहे... हातावर जाळी आहेत काय हो विजुभाऊ तुमच्या?

व्यंकट

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 12:11 pm | धमाल मुलगा

व्यंकटराव...

हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे! =))

विजुभाऊ...आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी??????

हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे
आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी??????
नाही हो अगदी जाळी असण्याइतका काही आमचा शुक्र बिघडलेला नाही.
पण माझ्या हातावरच्या जाळीचा इथे काय सम्बन्ध आला?
हातावर जाळी (शुक्र बिघडलेला) असल्यामुळे गरमी होउ शकते हे मला माहीत नाही.
एक खूपच अज्ञानी विजुभौ.

डॉ.प्रसाद दाढे's picture

1 May 2008 - 9:00 am | डॉ.प्रसाद दाढे

विजुभाऊ..लोळलो हसून हसून

वाचक's picture

30 Apr 2008 - 8:28 am | वाचक

पाहून वेदश्री म्हणेल 'गरमी (उकाडा, उकाडा) परवडला पण...'

अर्थात आम्हाला ध. मु. ह्याचीच सूचना सर्वात अधिक पसंत पडली हे वेगळे सांगणे न लगे :)

विश्वजीत's picture

30 Apr 2008 - 10:13 am | विश्वजीत

बियर म्हणजे परमानंदच.

मन's picture

30 Apr 2008 - 7:15 pm | मन

गरमीचा त्रास होत असल्यास
हिमालायात जावे पुत्री!
कायमचाच अंत होइल(त्रासाचा!).

तिथे जाउन गंगोत्री वर एका पायावर उभे राहुन नाम जप केल्यास
करणर्‍याला (उष्ण्ता,ताप इत्यादी असुरां पासुन) "कायमची मुक्ती" मिळते असे
श्रुती,वेद, उप निषदांत वर्र्णिले आहे.

तर बोला हरि अऊम तत्सत!

हरी भक्त परायण,
साठ्यांचे कार्टे.

अभिता's picture

30 Apr 2008 - 11:56 pm | अभिता

काय उपाय आहे ते सांगा ना. की तो सर्वांदेखत सांगण्यासारखा नाही
कसे बरोबर बोललात?
तसे मिपाकर हुशार!

धमाल मुलगा's picture

15 Apr 2009 - 11:17 pm | धमाल मुलगा

काय मंडळी,
ह्या उन्हाळ्यात होताहेत का कुणाला गरमीचे त्रास?????
;)

वर सांगितलेले उपाय एकापाठोपाठ एक असे वापरुन पहा :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

दिपाली पाटिल's picture

16 Apr 2009 - 12:50 am | दिपाली पाटिल

वेदश्री , तु की नाही ओलं कापड ठेव डोक्या वर घरी असताना आणि दिवसा तून ३-४ वेळा गार पाण्या ने तोंड धूत जा, कधि कधि काकडी खा , पन्हं, शहाळ्याचं पाणी पित जा... यामुळे थोडं बरं वाटू शकतं...:)

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 Apr 2009 - 6:39 am | डॉ.प्रसाद दाढे

ह्या वेळचा उन्हाळा (किंवा गरमी.. हवे ते घ्यावे) फारच आहे, काही 'वेगळे'
उपाय केले पाहिजेत की नेहमीचेच?

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2009 - 10:55 am | परिकथेतील राजकुमार

मिपाकर हे असामान्य असल्याने त्यांचे उपाय सुद्धा असामान्य असावेत ;)
येथे एकट्याने , दुकट्याने, सामुहीक करावयाचे उपाय असे वर्गीकरण करता येईल काय ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

चिरोटा's picture

16 Apr 2009 - 3:36 pm | चिरोटा

१)फळे जास्त खाणे.पालेभाज्यांचा मारा करावा.पोटात चिकटा होईल असे पदार्थ फुकट मिळाले तरी खावू नयेत्.उ.दा.बिस्किटे,वेफर्स्,केक.
२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या)
३)घरी आल्यावर आवळा सरबत्,कोकम सरबत(साधे पाणी वापरून) पिणे.
४)दुपारी ताक्,दही(फ्रीजमधले शक्यतो टाळा) जेवणात असु द्या.
५)चिकन मसाला,बटर चिकन्,नान,मटण थाळी ह्यांचा सध्या विचार सोडा.
६)न्याहारीला गूळ पोहे,दडपे पोहे,इडली.शक्यतो त़ळलेले पदार्थ टाळा.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

गब्रिएल's picture

1 Apr 2013 - 1:42 am | गब्रिएल

२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) हे कळ्ळ :) पण

भेन्डि कशि खायची ते नाय सांगितल. कच्ची का शिज्वून ?

सँडी's picture

16 Apr 2009 - 8:29 pm | सँडी

लग्न करा.

थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा. नविन घरी मस्त एसीत रहा.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

विजुभाऊ's picture

21 Aug 2009 - 2:38 pm | विजुभाऊ

हा घ्या खफ झालेला एक धागा

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

JAGOMOHANPYARE's picture

24 Sep 2009 - 2:54 pm | JAGOMOHANPYARE

आता पावसाळ्यातल्या त्रासावर एक लिहा..........

शाहिर's picture

7 May 2012 - 5:43 pm | शाहिर

पराभौ चे अभीन्म्दान

शाहिर's picture

7 May 2012 - 5:43 pm | शाहिर

पराभौ चे अभीन्म्दान

=)) =))

लैच गरमागरम धागा!!! पराशेठचे हाबार्स या धाग्याबद्दल.

अभ्या..'s picture

1 Apr 2013 - 1:22 am | अभ्या..

हे वेदश्री मनस्वीं यांना पण डूआयडी म्हणत होतार का रे?
सगळ्यानी लैच प्रामाणिकपणे सल्ले दिलेत आणि या आयडी सध्या तरी कधी दिसत नाहीत म्हणून म्हणले. ;)

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2013 - 4:03 pm | पिलीयन रायडर

आता फक्त कुणीतरी १० महिन्याच्या बाळाला ह्यातलं काय काय करता येईल ते पण सांगा...!!

अभ्या..'s picture

1 Apr 2013 - 6:21 pm | अभ्या..

ह्यातलं काय पण करु नक्का. सगुणा बागेत कायमचं राहायला जायचं. शिंपल. ;)
काय बिशाद आहे असल्या वनराईत, बांबूच्या घरात नदीशेजारी असताना उष्णतेचा त्रास व्हायची.
(ह. घ्या हो पिलीअन तै)

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2013 - 6:25 pm | पिलीयन रायडर

जाईन ना मी.. पण माझं पोरगं संध्याकाळी नदीवर नेल्यापासुन चक्रम सारखं वागायला लाग्लय ना!! सारखं बाहेर गार वार्‍यातच ने म्हणुन राह्लय..

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Apr 2013 - 7:17 pm | श्री गावसेना प्रमुख

तुमच धा मय्न्याच पोर्ग एव्हढ्यात बोलाया बी लागल,

पिलीयन रायडर's picture

2 Apr 2013 - 12:03 pm | पिलीयन रायडर

पोरगं १० सेकंदाच होतं तेव्हा पासुन त्याला काय हवयं हे न बोलता पण कळतं हो मला... फुकट कळा नाही सोसल्या..!! आणि तुम्ही जर "म्हणुन राहलय" ह्या शब्दावर कोटी करत असाल तर.. हॅ हॅ हॅ... खुश?

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2013 - 5:33 pm | अत्रुप्त आत्मा

या गरमीला काय करावे बॉ? http://www.sherv.net/cm/emoticons/olympics/high-dive-smiley-emoticon.gif

जलप्रिय आत्मा:)

ब़जरबट्टू's picture

22 Apr 2014 - 9:58 am | ब़जरबट्टू

ह्यो अजरामर घागा वर ओढतोय... :)

होऊ दे गुलकंद... =))

रात्री झोपताना अर्धा चमचा कैलासजीवन खाणे. २-३ दिवसात उत्तम रिझल्ट मिळेल....

कैलासजीवन खायला बेचव पण किंचितसा कापराचा वास येईल.. त्यामुळे फार चर्चा न करता अर्धा पाऊण चमचा गिळून टाकणे.

आयुर्हित's picture

23 Apr 2014 - 9:15 pm | आयुर्हित

औषधाविना उपचार करून खात्रीशीर रित्या पूर्ण आराम नक्कीच मिळेल.
फक्त एक व्य नि करा.

प्रथम येणाऱ्या केस स्टडीज या धाग्यावर टाकल्या जातील.

पोटे's picture

24 Apr 2014 - 11:29 am | पोटे

शीर्षक बदला आधी.

गरमी या नावाचा एक गुप्तरोग आहे.

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2014 - 6:04 pm | टवाळ कार्टा

१०० :)

प्यारे१'s picture

25 Apr 2014 - 6:36 pm | प्यारे१

इसे कहते हय हर धागे का अपना अपना भाग (और भोग)

६ वर्षांनी शंभरी गाठली!

कपिलमुनी's picture

14 May 2016 - 2:41 pm | कपिलमुनी

सालाबाद प्रमाणे धागा (उशिराने) वर काढत आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 May 2016 - 10:44 pm | घाशीराम कोतवाल १.२

एव्हड़ा जूना धागा बघुन चक्रावलो म्हटल पर्या परत आला का काय ?

धमाल धागा आहे राव :)

आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक !

वाचून कसं गार गार वाटलं.

सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

धमाल धागा आहे राव :)

आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक !

वाचून कसं गार गार वाटलं.

सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.

इतका जुना धागा वर काढला कशाला?
गरमी २०१८ नवीन काढा.

दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर.

त्या प्रथेचा पाईक होऊ पाहणारा चामुंडराय.

>>> गरमी २०१८ नवीन काढा.

होऊन जाऊदे कंजूस सर एक गरमा गरम गिरमी ... सवारी ... जिलबी --> गरमी २०१८.

सतिश गावडे's picture

9 Mar 2018 - 8:26 am | सतिश गावडे

इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही.

इथे म्हणजे कुठे ते न लिहील्याने उपाय सुचवू शकत नाही.

माहितगार's picture

9 Mar 2018 - 10:21 am | माहितगार

उष्मा सुसह्य होण्यात मदत व्हावी म्हणून पच्ची पलसू नावाच्या चिंचेच्या गार साराची पाकृ आम्ही अलिकडे मिपावर दिली आहे.

सिरुसेरि's picture

9 Mar 2018 - 10:47 am | सिरुसेरि

गिरमी हि दिवसभर वाढतच चालली आहे .