Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 12:41
  • Log in or register to post comments
  • 52143 views

प्रतिक्रिया

Submitted by मनस्वी on Mon, 04/28/2008 - 12:44

Permalink

गुलकंद

गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by वेडझवा on Wed, 04/30/2008 - 11:39

In reply to गुलकंद by मनस्वी

Permalink

टक्क्ल

टक्क्ल करुन बघ डोक्यवर. मि उन्हाळ्यात नेहमि करितो. लगेच परिनाम येतो -- असा कसा मी वेगळा वेगळा..मी वेडझवा!
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Sun, 04/27/2014 - 21:10

In reply to टक्क्ल by वेडझवा

Permalink

स्पाईक कट

स्पाईक कट .. मी करतो दर उन्हाळ्यात.. बाजूने आणि टाळूवरून मशीन फिरवून कापून घ्यायचे बारीक.. आणि पुढे थोडासा कोंबडा वर काढायचा.. गर्मी पासून आराम.. साबण, तेल कमी लागते.. केस विचंरायची झंझट नाही.. पुढे पावसाळा सुरू झाल्यावरही भिजलेल्या केसांनी सर्दी पकडायचा त्रास नको असल्यास हिच हेअरस्टाईल कंटीन्यू करू शकतो.. माझी यंदाची हेअर कटींग जरा लांबलीय, मात्र येत्या आठवड्यात मुहुर्त काढतोय..
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 03/26/2015 - 13:29

In reply to टक्क्ल by वेडझवा

Permalink

आपल्या सारख्या आयडीचे

आपल्या सारख्या आयडीचे पायसुध्धा मिपाला लागलेले हे पाहून धन्य झालो =))
  • Log in or register to post comments

Submitted by शान्तिप्रिय on Fri, 03/09/2018 - 10:34

In reply to आपल्या सारख्या आयडीचे by टवाळ कार्टा

Permalink

सम्पादक

सम्पादक हा आयडी नाकरला कसा नाहि?
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 12:53

Permalink

धन्यवाद मनस्वी

>गुलकंद खा आणि ओठांना कैलासजीवन लाव. गुलकंद आजच घेऊन टाकते विकत. कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे.. :( >पण १ दिवसात नाही फरक पडत, १ आठवडा तरी लागेल. हे झेंगट २-३ दिवसांतच उपटलं आहे. छ्या !
  • Log in or register to post comments

Submitted by आर्य on Mon, 04/28/2008 - 13:16

Permalink

वेदश्री, मल

वेदश्री, मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. ऊन्हात भटकणे वर्ज. फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. हेच प्रवासा साठी ही लागु आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 13:31

In reply to वेदश्री, मल by आर्य

Permalink

धन्यवाद आर्य

>मला कही ऊपाय आमच्या डॉक्टरांनी सांगीतले होते. खरोखरीच बराच उपयोग झालाय, >आणि काही औषधां पेक्षा ही सरळ २/३ दिवसात परीणाम बरे दिसतात. बरे होईल २-३ दिवसांत फरक दिसला तर. भाचरं आलीयत घरी.. त्यांच्याशी खेळायला मिळायचं राहायचं बाजुला आणि वर असं कर तसं करू नको ऐकत बसावं लागायचं नसता.. >ऊन्हात भटकणे वर्ज. हे केले आहे. > फिरल्यास डोक्याला टप्पर हवे. हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. :( >किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायला पाहिजे (फ्रिज / बर्फाचे नाही, माठाचे चालेल) दिवसभर रूमवर असते तेव्हा होते ( कारण गरमीच तितकी असते ) पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. दिवसभर एसीमध्ये बसून रात्री उकाड्यात जीव नुसता नकोसा होऊन जातो माझा.. >रात्री जेवल्या वर / झोपण्यापुर्वी थंड (-गार नाही) दुधा तुन गुलकंद घे. दूधातून गुलकंद ! वॉऽऽऽव.. आजच सुरू करते हा उपाय.. >जेवणात तेल / तुप कमी. दही, ताक प्रेफर कर. तूप नसते जेवणात पण तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. दही देतात त्या अधूनमधून पण ताक नाही. जवळपासच्या हाटेलातल्या ताकात काही राम नाही.. >दिवसातुन ऐकदा तरी फळं, ज्युस घ्यावं किंवा शहाळ्याच पाणी धेतल्यास ऊत्तम. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने. द्राक्षं घेतली होती.. मनुका खाव्या लागल्या ! शहाळ्याचं पाणी मिळेल बहुतेक.. ते आवडतेही. >हेच प्रवासा साठी ही लागु आहे. प्रवासात तर काही प्रश्न येत नाही... फक्त वपा खाताना तळलेल्या मिरच्या मिळाल्या की बस्स !
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 04/28/2008 - 13:33

In reply to वेदश्री, मल by आर्य

Permalink

वैद्यराज

वैद्यराज आर्य ह्यांचे मताशी सहमत आहे! त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव आहे!!! कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. -(निमहक़ीम) ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 13:37

In reply to वैद्यराज by धमाल मुलगा

Permalink

धन्यवाद ध.मु.

>त्याशिवाय आणखी एक काळजी म्हणून, तळपायांस मेंदी लावणे. त्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते असा अस्मादिकांचा अनुभव >आहे!!! तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. :( >कैलासजीवन मुळ्ळीच चुरचुरत नाही. चिंता नसावी. हे एक बरं झालं. > त्याशिवाय, रात्री डोईला छान तेल चोपडून त्यावर एरंडाचे पान बांधावे..उत्तम गुण येतो. एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही पण तेल लावायचे करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Mon, 04/28/2008 - 13:43

In reply to धन्यवाद ध.मु. by वेदश्री

Permalink

तळपायाला

तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..
का बरे?
आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..
म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 13:47

In reply to तळपायाला by मनस्वी

Permalink

चांगली दिसत नाही..

>>तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. >का बरे? कमॉन मनस्वी.. पायाला मेंदी कधी लावतात हे मी वेगळ्याने सांगायची जरूर आहे का तुला? :( >>आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. >म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी. चांगली दिसत नाही ना पण..
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 04/28/2008 - 13:51

In reply to चांगली दिसत नाही.. by वेदश्री

Permalink

आयला...

पण प्रॉब्लेम काय आहे? एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!! करुन बघच...कस्सलं गारगार वाटतं
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 13:57

In reply to आयला... by धमाल मुलगा

Permalink

बुटाचा निराळा मामला आहे..

>एव्हढंच नसलं आवडत तर बुटं घालायची चार-दोन दिवस!!! बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. :( पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात. हातपाय सोलवटून निघतात नुसते. विजुभाऊंनी सांगितलेला पाण्यात मीठ टाकूनवाला उपाय करता येणार नाही. ये नाजूक पाव जमींपे मत रखो.. सारखी अवस्था होते !
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 04/30/2008 - 10:38

In reply to बुटाचा निराळा मामला आहे.. by वेदश्री

Permalink

हा काय प्रकार आहे?

:/
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात.
बुट पायात घालतात ना? मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात? आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी.... मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला.... ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं.... ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला... बोला कोणकोण येतंय?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 04/30/2008 - 10:45

In reply to हा काय प्रकार आहे? by धमाल मुलगा

Permalink

मी येतो रे

चल जाउयात !
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 04/16/2009 - 12:15

In reply to हा काय प्रकार आहे? by धमाल मुलगा

Permalink

चल धम्या मी आलोच

एक किन्गफिशर स्ट्रॉग घे मला चकणा काय पन चालेल? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 02/22/2014 - 02:21

In reply to हा काय प्रकार आहे? by धमाल मुलगा

Permalink

धम्या प्रश्न सुटला का रे?

धम्या प्रश्न सुटला का रे?
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sat, 02/22/2014 - 06:18

In reply to धम्या प्रश्न सुटला का रे? by विजुभाऊ

Permalink

उत्तर पण सुटलं,

उत्तर पण सुटलं, :)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Mon, 04/28/2008 - 13:51

In reply to चांगली दिसत नाही.. by वेदश्री

Permalink

अगं बाई

तळपायाला. कोणी तुला पायावर नक्षीदार मेंदी काढायला नाही सांगते.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Tue, 04/22/2014 - 11:40

In reply to अगं बाई by मनस्वी

Permalink

रात्री तळपायाला तेल लाव,

रात्री तळपायाला तेल लाव, चांगले घासून घासून लाव्...खूप नको....त्यामुळे सगळी उष्णता बाहेर पडते... :)
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Fri, 04/25/2014 - 00:42

In reply to रात्री तळपायाला तेल लाव, by निवेदिता-ताई

Permalink

काय ताई तुमी बी ?

२००८ च्या प्रश्नावर २०१४ साली उत्तर देता होय ? उत्तर शोधायला पंचवार्षीक योजना राबवली की काय ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Fri, 04/25/2014 - 14:25

In reply to काय ताई तुमी बी ? by धर्मराजमुटके

Permalink

काय हरकत आहे?

धन्यवाद निवेदिता-ताई,महत्वाचा सल्ला आहे आहे हा! धर्मराजमुटकेजी, पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात सुमारे 34 किलोमीटर अंतराचा "एचसीएमटीआर'चा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या फक्त 23 टक्के भूसंपादन झाले आहे. हे भूसंपादन वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्तुळाकार मार्गाची कोंडी सुटली - - सकाळ वृत्तसेवा शुक्रवार, 25 एप्रिल 2014 - 03:00 AM IST पंचवार्षीक योजने ऐवजी पंचेचाळीसवार्षिक करायला आपली काही हरकत नसावी!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 03/31/2013 - 10:54

In reply to वैद्यराज by धमाल मुलगा

Permalink

..

सालाबादप्रमाणे, रसिक मिपाकरांच्या आग्रहाखातर हा लेख ह्या 'गरमीत' देखील वर आणला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 03/31/2013 - 14:14

In reply to .. by परिकथेतील राजकुमार

Permalink

गुजरातेत 'बसायची' व्यवस्था

गुजरातेत 'बसायची' व्यवस्था आहे का रे परा?
  • Log in or register to post comments

Submitted by उपास on Mon, 04/01/2013 - 23:01

In reply to .. by परिकथेतील राजकुमार

Permalink

आ?

पराशेठ, अत्ता तर होळीची बोंब झाली आणि एकदम गरमी, चैत्रांगण/ वसंतोत्स्व काही आहे की नाही? कोकीळांच काय झालं ह्या गरमीत? आणि गरमी वाढलेय म्हणजे आंब्याचा काय अंदाज.. मोहोरलाय ना? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 04/28/2008 - 13:39

Permalink

एका बादलीत

एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे. बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. पोहणे हाही एक मस्त उपाय
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 13:44

In reply to एका बादलीत by विजुभाऊ

Permalink

धन्यवाद विजुभाऊ

>एका बादलीत गार पाणी घेउन त्यात मीठ घालावे.बादलीत पाय बुडवुन ठेवावेत्.साधारण अर्धा तास. 'गार पाणी' मिळणे दुरापास्त आहे.. माठातले पाणी घेतले तर चालेल का? हा उपाय करायला छान पडेल. ( लगे हाथो पेडिक्युअरसुद्धा होऊन जाईल ! ) >उ.सू. बादलीत बर्फ टाकु नये . हायपो डर्मिया ची शक्यता. बर्फ नाहीये त्यामुळे हायपोडर्मियापासून आपोआप वाचले ! >पोहणे हाही एक मस्त उपाय येत नाही त्यामुळे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 04/28/2008 - 14:03

Permalink

रे देवा....

कैलासजीवन चुरचुरणार तर नाही ना? ओठाला ( माझ्याच हो ! ) हात लावता ब्रह्महत्या होते आहे हाच एक झोल आहे. काही टप्पर घातले की जास्त उकाडा होतो.. डोक्यातही घाम येतो ! टोपी/रुमाल यांचा मला सख्त राग येतो त्यामुळे. पण हापिस असेलशा दिवसात ( एसी असतो ना ! ) नाही होत इतके पाणी पिणे. तेलाशिवाय तिखटाची मजा नाही. मेसवाल्या काकूही तेल जरा चढतीचंच घालतात पण जेवणाची चव एक्कदम खत्तरी असते. फळं घेतली होती परवा ( चिकू, द्राक्षं वगैरे ) तर रूममध्ये सुकून जातात गरमीने एरंडाचे पान तर इथे ऍरेंज करता यायचे नाही तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला.. आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते.. रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 14:19

In reply to रे देवा.... by प्रभाकर पेठकर

Permalink

>रे देवा...!

>रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. :,( >ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. कळतेय थोडेफार.. पण वळवावे कसे ते कळत नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by माझी दुनिया on Wed, 04/30/2008 - 13:15

In reply to >रे देवा...! by वेदश्री

Permalink

अगं वर

अगं वर लिहिलेले सगळे आवश्यक उपाय सोडून....हे नको...ते आवडत नाही....ह्याचा राग येतो करत बसलीस तर शरीरातली उष्णता कशी काय कमी होणार ? ~X( आत्ताशी चैत्रच चालू आहे...अजून वैषाख वणवा यायचाय. #:S माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Mon, 04/28/2008 - 20:10

In reply to रे देवा.... by प्रभाकर पेठकर

Permalink

सहमत..

रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस. ह्या रुग्णाला माफ कर तीला कळत नाहीए तिच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे ते. (सहमत)केशवसुमार स्वगत :- ऑफिसात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मागे कुठल्या तरी मुलीला पडला होता तिची हिच्याशी गाठ घालू द्यावी का?
  • Log in or register to post comments

Submitted by नारदाचार्य on Mon, 04/28/2008 - 20:14

In reply to सहमत.. by केशवसुमार

Permalink

द्या घालून...

गाठ या दोघींची. ती वरदा. (वरदा वैद्य नव्हे, फक्त वरदा. नाही तर तुम्ही भलताच घोळ करायचे.)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Mon, 04/28/2008 - 14:11

Permalink

रोज..

दररोज रात्री एका ग्लास मधे पाणी, १ च.धने, १ च,जिरे आणि १ च.खडीसाखर घालून ठेव. सकाळी ते पाणी गाळून अनुष्पोटी (काही खायच्या/प्यायच्या अगोदर) पिणे. २-३ दिवसात उष्णता कमी होते (शरीरातील). तुळ्शीचे बी पाण्यात भिजवून ठेऊन, खाल्ले तरी कमी होते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 04/28/2008 - 14:23

In reply to रोज.. by स्वाती राजेश

Permalink

छ्या:....

अनुष्पोटी मी अनुष्कापोटी वाचले. सॉरी.....
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 04/28/2008 - 17:27

In reply to छ्या:.... by प्रभाकर पेठकर

Permalink

हाहाहाहाहाहा

अगदी हेच म्हणतो... =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 04/28/2008 - 14:27

Permalink

एक उपाय आणखी...

हा उपाय बहुधा ताईवर्गातल्या कोणाही आवडणार नाही..माझ्यावर निषेधाच्या खलित्यांचा पाऊस पडेल...धि:कार वगैरे करतील, पण तरीही... फारच त्रास होत असेल तर... थोड्या काकड्या आणाव्या, त्यांचे काप करुन बर्फात, बर्फ नसल्यास माठात/ ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्या. आता कोपर्‍यावरच्या ठेल्यावरुन एकदम 'चिल्ड' बीअर आणावी. थंड झालेल्या काकड्या चखणा म्हणून वापराव्यात.... डबल धमाका..बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले..... आम्ही हा उपाय उन्हाळ्यावर हुकमी उपाय आहे असं जाणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Mon, 04/28/2008 - 14:38

In reply to एक उपाय आणखी... by धमाल मुलगा

Permalink

दोन्ही थंड केलेले.....

>>बीअरपण थंड, काकडी पण थंड आणि हे दोन्ही थंड केलेले..... आणी स्वतः फ्रिजमध्ये बसून प्यावे.. म्हणजे त्रिवेणी संगम!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 04/28/2008 - 14:56

In reply to दोन्ही थंड केलेले..... by मनस्वी

Permalink

हे हे हे

भारीच. पण धम्याचा उपायपण भारी :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 14:39

In reply to एक उपाय आणखी... by धमाल मुलगा

Permalink

नो कॉमेंट्स

नो कॉमेंट्स
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 04/28/2008 - 14:44

In reply to एक उपाय आणखी... by धमाल मुलगा

Permalink

अरेरे...!

रे धमाल मुला, तू रामदासस्वामींना विवाह सोहळ्याचे वर्णन करून सांगतो आहेस.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 04/28/2008 - 15:31

In reply to अरेरे...! by प्रभाकर पेठकर

Permalink

च्यामारी...

च्यामारी... =))
  • Log in or register to post comments

Submitted by आर्य on Mon, 04/28/2008 - 14:38

Permalink

पोहणे हे सबल मात्र, तरण तारणाचा मंत्र !!

पोहणे हाही एक मस्त उपाय आहा हा......!!!....काय उपाय सांगीतलात विजूभाऊ, कृष्णा काठ अठवला.
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Mon, 04/28/2008 - 14:57

Permalink

तुळशीच्या बिया

एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. आपला, (धन्वंतरी) धोंडोपंत :D आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 15:15

In reply to तुळशीच्या बिया by धोंडोपंत

Permalink

धन्यवाद धोंडोपंत

>एक चमचा तुळशीचे बी वाटीत बुडेस्तोवर पाण्यात घालून दोन तासांनी किंवा त्याहून जास्त कालावधीनंतर त्यात थोडीशी साखर >आणि दूध घालून त्याची खीर करून दिवसातून तीन वेळा खाणे. छान. हे माझ्या आवडीचे होईलसे वाटते. >दोन दिवसात शरीरातील सर्व उष्णता दूर होईल. वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही. >तसेच त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्याबरोबर. घरून आणण्याच्या गोष्टीत आजच ऍड करून टाकते. >गाईचे तूप (कृष्णा गाईचे तूप-- मस्त आहे) झोपण्यापूर्वी तळपायाला चोळणे. हा उपाय छान असला तरी डेंजर दिसतो आहे. तळपायाला लावून वाया घालवायपेक्षा खाऊन मज्जा करावीशी वाटली तर वाट लागायची. >शांत झोप लागेल. डोळयांची आग जाईल. तुम्हाला कसं कळलं की माझ्या डोळ्यांची आग होत असेल आणि झोप शांत होत नसेल ते? :-/
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Mon, 04/28/2008 - 15:41

In reply to धन्यवाद धोंडोपंत by वेदश्री

Permalink

वेदश्रीधर्म

वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही.
अरे बापरे!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 04/28/2008 - 16:08

Permalink

वेदश्रीधर्म?

वेदश्रीधर्म? हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला. दशावतरी पहनारा इजुभौ आगरी
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 16:27

In reply to वेदश्रीधर्म? by विजुभाऊ

Permalink

अर्जुन्या नाय जी..

हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.
अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 04/29/2008 - 12:03

In reply to अर्जुन्या नाय जी.. by वेदश्री

Permalink

म्या कुटं

:$ म्या कुटं म्हनलं की रामायन म्हून. आमच्या महाडात ज्यादा करुन दशावतारी त म्हाभारतच घेत्यात जी
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 04/28/2008 - 17:37

Permalink

गरमी .....

:S :S :S गरमी??/ :/ :/ :/ घाबरलोच... मग लक्षात आले...गरमी हा शब्द उकाडा /उन्हाळा / उष्णतेचा त्रास इ.इ. म्हणून वापरलेला आहे ,.... हे समजून हायसे वाटले... . :<
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com