पुतळे कापा, पुतळे हलवा
फुंकून फुंकून निखारे फुलवा
एस्ट्या पेटवा, ट्रक जाळा
सामांन्यांच्या तोंडात बोळा
भैया पळवा, भैया मरवा
खळ्ळ-खटॅकची हौस पुरवा
कागद नाचवा, नोटा दाखवा
आदर्शांचे इमले चढवा
कांदे लपवा, टोमॅटो पळवा
रोजरोज नवे खेळ लावा
बारा मतींची ताकद लावा
मतीमंदांची प्रजा वाढवा ||
प्रतिक्रिया
30 Dec 2010 - 9:34 pm | प्राजु
हाहाहा!! काय करणार... ?? काय उपाय आहे यावर?