सावध व्हावे हे जनताजन

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
24 Dec 2010 - 5:05 pm

सावध व्हावे हे जनताजन

मळभटं सारी द्यावी झटकून
सावध व्हावे हे जनताजन ....॥१॥

कुणी फ़ुकाने लाटती पापड
कुणी झोपला ओढुनी झापड
मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी
चिडीचिप झाला मूग गिळून ....॥२॥

आग लागुनी जळता तरूवर
म्हणती आहे मम घर दूरवर
सोकाविती मग कोल्हे-दांडगे
आणिक पिती रक्त पिळून ....॥३॥

किमान थोडा लगाम खेचा
नांगी धरुनी त्यांची ठेचा
झोपेचे हे सोंग फ़ेकूनी
अभय पहा तू डोळे उघडून ....॥४॥

गंगाधर मुटे
.................................................

वीररसकविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

24 Dec 2010 - 5:20 pm | प्रकाश१११

कुणी फ़ुकाने लाटती पापड
कुणी झोपला ओढुनी झापड
मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी
चिडीचिप झाला मूग गिळून ....॥२॥

छान नि मस्त लिहिलेत मुटेजी
आवडले.!1.

आग लागुनी जळता तरूवर
म्हणती आहे मम घर दूरवर
सोकाविती मग कोल्हे-दांडगे
आणिक पिती रक्त पिळून ....॥३॥

छान