आपण मराठी बोलतो ?

शेखर काळे's picture
शेखर काळे in काथ्याकूट
23 Dec 2010 - 8:39 am
गाभा: 

आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो ? आपल्याला खरेच मराठीचा अभिमान वाटतो ?
मी कबुल करतो की मी महाराष्ट्रात, भारतात राहत नाही, पण तरीही मनःपुर्वक मराठी बोलतो, वाचतो आणि मराठी बोलतांना, वाचतांना आणि लिहितांना इंग्रजी शब्द टाळतो.
महाराष्ट्रात सुटीवर असतांना आपल्याला छान कार्यक्रम बघायला मिळतील या अपेक्षेने त्यादृष्टीने विचारणा केली असता, 'अरे आजकाल अ‍ॅडव्हान्समधे तिकिटे बाय केली नाहीस ना तर तुमच्यासारख्यांना तिथे क्राऊडमधे सफोकेट होईल', असे ऊत्तर मिळाले.
सुटिच्या पहिल्याच दिवशी मिळालेला शेरा - 'अरे वा, अजुन तुमचे मराठी अगदी फ्लुएन्ट आहे हां'. अरे !? हा आमचा मित्र आमच्याच बाकावर बसून मराठी शिकला ना ? आणि तसे म्हणून दाखविल्यास, 'अरे, आता पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते !' हे त्यावर ऊत्तर.
मराठी 'सा रे ग म' हा एक सर्वांच्या ओळखीचा, बर्‍याच जणांना आवडणारा दूरदर्शनवरील कार्यक्रम .. यात गाण्याचे कौतुक कसे करायचे तर - 'सुपर्ब, फँटास्टिक, माईंड ब्लोईंग' ???? अरे .. इतर मराठी संस्कॄतप्रचुर शब्द आता मेलेत का ?
आम्ही मुलांना मुद्दाम मराठी शिकवून आणतो .. आणि त्यांचे कौतुक कसे होते तर 'इतके लहान असून काय फाड फाड इंग्रजी बोलतात' .. आणि 'जाऊ दे रे .. कशाला त्यांना मराठी बोलायला लावतोस .. इथे आम्हीच मराठी बोलत नाही'.
मराठी पुस्तके विकत घ्यायला जाऊ म्हटले तर .. 'कशाला? आणि कुठे' .. त्याचेही बरोबर होते म्हणा. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर स्वतः मालकच पुस्तके विकण्याबाबत ऊत्साही नव्हता. त्याचा खप शालेय पुस्तके आणि मार्गदर्शिकांचा (म्हणजे गाईड्स हो .. हे मला अनुवादून सांगावे लागले).
मग मराठी बोलायचे कुठे आणि वाचायचे कुठे ?

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

23 Dec 2010 - 8:54 am | नगरीनिरंजन

परदेशात जाऊन राहणारी माणसे आपल्या जुन्या आठवणींच्या बाबतीत काळाच्या एकाच बिंदूवर स्थिर राहतात आणि इकडे मात्र भराभर बदल होत जातात हा सार्वत्रिक अनुभव आहे. मी स्वतः परदेशात जितके मराठी बोलतो (कार्यालयातसुद्धा) तितके भारतात आल्यावर बोलू शकत नाही. लोकांनाच मराठीची गरज आणि उपयुक्तता नाही तर असे होणे अपरिहार्य आहे. पण पुण्या-मुंबईसारखी मोठी शहरे आणि त्यातले उच्चभ्रू, उच्चमध्यमवर्गीय आणि त्यांचं अनुकरण करणारा निम्नमध्यमवर्ग वर्ग सोडला तर इतर 'मागासलेल्या' भागात मराठीच बोलली जाते हे नमूद करावेसे वाटते.
मराठी दुकानदार मराठी पुस्तकेच काय इतर काहीही विकण्यात उदासीनच असतात.
तुम्ही स्वतः मराठी बोलता आणि मुलांना शिकवले हे पुरेसे आहे. बाकीच्यांकडून काहीही अपेक्षा ठेवणे निरर्थक आहे.

>>मराठी दुकानदार मराठी पुस्तकेच काय इतर काहीही विकण्यात उदासीनच असतात.

हा. हा. हा. खूप हसू आले. हशा आणि टाळ्या :-)

अवांतरः मराठी पुस्तके, साहित्य वगैरे खरेदीकरायचे असेल तर दुकांनापेक्षा 'मराठी पुस्तक प्रदर्शनात' जाउन खरेदी करावे. चांगला अनुभव येइल. भरपूर पुस्तके मनसोक्त पहाता येतात आणि मग हवी ती पुस्तके विकत घेता येतात. (आणि पुण्यासारख्या शहरात पुस्तक प्रदर्शने सारखी येत असतात. दर महिना २ महिन्यांनी. बाकी शहरांचे माहिती नाही.)

यशोधरा's picture

23 Dec 2010 - 1:35 pm | यशोधरा

>>मराठी दुकानदार मराठी पुस्तकेच काय इतर काहीही विकण्यात उदासीनच असतात. >>

नाही निरंजन, हे मत बरोबर वाटत नाही. पर्ल ह्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण मराठी पुस्तक प्रदर्शनांना जरुर भेट द्यावी. तिथे एखादे पुस्तक हवे असले आणि पटकन सापडत नसले तर तिथल्या लोकांना विचारले तर नक्की शोधून देतात हा माझा अनुभव आहे.

पुण्यातील रसिक, अनमोल, काँटीनेंटल व इतर काही प्रकाशनांचाही अतिशय चांगला अनुभव आहे. एखादे पुस्तक नसले व हवे असल्याचे त्यांना सांगून ठेवले व आपले काँटॅक्ट डीटेल्स त्यांच्यापाशी ठेवले, तर उलट फोन करुन पुस्तके आल्यावर नक्की कळवतात.

कधी असे करुन पाहिले आहे का?

नगरीनिरंजन's picture

23 Dec 2010 - 1:49 pm | नगरीनिरंजन

बरोबर आहे तुमचे आणि अशी प्रदर्शने चांगली असतात हे ही खरं, पण या चर्चाप्रस्तावकर्त्याप्रमाणे परदेशातून आलेल्या माणसाकडे प्रदर्शन लागेपर्यंत वाट पाहण्याचा वेळ नसतो आणि मराठी पुस्तक दुकानात सहज उपलब्ध नसलेले किंवा एखादे जुने पुस्तक मागितले तर ते शोधून देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. बहुतेक सगळे दुकानदार विविध अभ्यासक्रमांसाठीची संदर्भपुस्तके आणि स्वसुधारणा छापाची उपदेशपर पुस्तके विकण्यात जास्त रुची घेतात असा अनुभव आहे.
प्रकाशनाकडेच गेलो तर पुस्तक आणि सर्वप्रकारची मदत बहुतेकवेळी मिळते हे खरे पण तरी इतर सर्वसामान्य दुकानदारांच्या प्रवृत्तीवरची टिप्पणी निव्वळ खोडसाळपणा म्हणून केली नाही.

> दुकानात सहज उपलब्ध नसलेले >> तुम्हीच उत्तर देताय :) सहज उपलब्ध नसलेले पुस्तक लगेच कसे देता येईल? त्यासाठीच नाव नोंदवून ठेवायचे. :)
>> किंवा एखादे जुने पुस्तक मागितले तर ते शोधून देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. >> माझा तरी असा अनुभव नाही.
>>> बहुतेक सगळे दुकानदार विविध अभ्यासक्रमांसाठीची संदर्भपुस्तके आणि स्वसुधारणा छापाची उपदेशपर पुस्तके विकण्यात जास्त रुची घेतात असा अनुभव आहे. >> उदाहरणार्थ? तुम्ही पुस्तकांच्या दुकानाबाबतच बोलत आहात ना? कोणती अशी दुकाने आहेत जिथे फक्त विविध अभ्यासक्रमांसाठीची संदर्भपुस्तके आणि स्वसुधारणा छापाची उपदेशपर पुस्तकेच विकण्यात रुची घेतली जाते? तुम्ही चुकीच्या दुकानांतून जात असाल. पुण्यात असाल, तर फार लांब नकोच, रसिक, अनमोल वगैरे मधे जाऊन पहा. कदाचित तुमचे मत बदलेल.

शक्यता नाकारता येत नाही ;)

अवलिया's picture

23 Dec 2010 - 1:59 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

यशोधरा's picture

23 Dec 2010 - 2:01 pm | यशोधरा

ह्याला माझे समर्थन आहे :D

अवलिया's picture

23 Dec 2010 - 2:02 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

नगरीनिरंजन's picture

23 Dec 2010 - 2:03 pm | नगरीनिरंजन

असे असेल तर फारच चांगले. पुढच्यावेळी अनुभव घेईन.
मत बदलायला आवडेलच आणि आनंदही होईल.

अवांतरः तुमचेपण पुस्तकांचे दुकान नाही ना? (ह.घ्या.) शक्यता नाकारता येत नाही. :-)

असते तर किती मज्जा आली असती :)
वाचायला सतत पुस्तकेच पुस्तके मिळाली असती ही एक मस्त शक्यता शक्य होती. नै का?

अवांतर : फुकटात मी पुस्तके नेऊ दिली नसती. :P

मेहता प्रकाशनाच्या येथे ही खुप छान अनुभव येतो , मला ते दुकान जास्त वाडते ..
(पत्ता : मेहता पब्लिसिंग हाउस, माडिवाले कॉलनी, सदाशिव पेठ, बाजिराव रोड टेलिफोन भवनासमोर)
कधी जायचे असेल तर सांगा मी सभासद असल्याने ३० % सवलत मिळते ..

तसेच

प्रकाशक सोडल्यास .. "पाथफाईंडर" हे दुकान खुप मोठे आणि व्यवस्थीत आहे.
(निलायम पुला जवळ, अशोका हॉटेल जवळ, पर्वती पायथा, पुणे.)

२-३ तास तर या दुकानातुन बाहेर येताच येत नाहि असा माझा अनुभव आहे ..

---
बाकी मराठी बद्दल मी बोलत नाही जाणकार बोलतीलच .

कधी घरी पण या पुण्यात आल्यावर .. छोटीशे घरघुती पुस्तकालय (शब्दयात्री) आहे घरात ... आवडतील सेलेक्टेड पुस्तके ..

आधीच्या एका लेखाला दिलेल्या कॉमेंटचा भाग:-भाषा आपोआप जपली गेली तर जगते. नियम, सक्ती,करुन फार काळ तग धरेल असे नाही.

लवचिक भाषा जगतात.

"बाहेर"च्यांना अजिबात प्रवेश न देणार्‍या. शब्दांची जराही मोडतोड न होऊ देणार्‍या कडक नियमवाल्या भाषा गडप होतात. किंवा फक्त म्यूझियम व्हॅल्यूच्या (ममिफाईड) बनतात. उदा संस्कृत.

जे शब्द सहज रुढ होताहेत ते गुलामगिरी, परभाषा वगैरे असे जुने संदर्भ न आणता सामील करुन घ्यावेत हे हिताचे.

मराठीचे तरी काय?:
अगदी पहिले सापडलेले मराठी वाक्यः

"चामुंडरायै सुत्ताले करवियले. श्री गंगरायै सुत्ताले करवियले"

नंतर बखरींमधे..

"जैसे भडबुन्जे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडाका जाहला.."

या भाषेपेक्षा तुम्ही आम्ही बोलतोय ती (या लेखाची पण) मराठी भाषा यांत लिपी सोडून काय साम्य आहे?
त्यावेळची मराठी संपली. पण आता वेगळे रुप जिवंत आहे. डायनॉसोर गेले मगरी टिकल्या.

क्लिंटन's picture

23 Dec 2010 - 9:17 am | क्लिंटन

आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो ?

मी महाराष्ट्रात राहात नाही तेव्हा पहिला प्रश्न माझ्यासाठी तरी गैरलागू. जेव्हा महाराष्ट्रात येतो किंवा कुठेही असताना मराठी लोकांशी बोलताना मराठीतूनच बोलतो.

आपल्याला खरेच मराठीचा अभिमान वाटतो ?

अभिमान म्हणजे काय?मराठी भाषेचा अभिमान कशासाठी?मी मराठी घरात जन्माला यावे यासाठी प्रयत्न केल्याचे माझ्या तरी लक्षात नाही.मराठी भाषा मला जन्मत: काहीही न करता मिळाला.कदाचित तशीच मल्याळम, कन्नड, फ्रेंच,अरबी यापैकी एक भाषाही मिळू शकली असती.तेव्हा मराठी भाषेचा अभिमान वगैरे अजिबात नाही.पण जन्मापासून तीच भाषा बोलत असल्यामुळे आपुलकी मात्र नक्कीच वाटते आणि शक्यतो त्याच भाषेत संवाद साधायचा माझा प्रयत्न असतो.

मराठी भाषा मागे पडत आहे याचे कारण (मला वाटते) की मराठी लोक हे कट्टर "मराठी बाण्याचे" आहेत पण मराठी समाज अजूनही उद्योगधंदे,सत्तास्थाने यात पुढे नाही.या जगात पैसाच बोलतो हे एक कटू सत्य आहे.मराठी माणसाकडे पैसा कमी त्यामुळे तिथेही आपले लोक मार खातात. ज्या समाजाची भाषा ही ज्ञानाची, सत्ताकारणाची, अर्थकारणाची भाषा असते त्या भाषेचे वर्चस्व जास्त असते.लोक "पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते" हे आणि तत्सम गोष्टी इंग्रजी भाषेत म्हणतात याचे कारण त्या भाषेच्या ज्ञानाशिवाय बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या भराऱ्या मारणे फारच कठिण आहे हे वेगळे सांगायला नको.अर्थात याला काही अपवाद आहेतच-- मराठी आणि अन्य भाषांमधील साहित्य, भारतीय तत्वज्ञान वगैरे पण अशा क्षेत्रांचा आजच्या काळात पैसे कमवायला फारसा उपयोग होत नाही.

तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल.मग आपल्याला पडतात तसे प्रश्न पडणार नाहीत.

गवि's picture

23 Dec 2010 - 10:35 am | गवि

अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद..अभिनंदन.. बुल्जआय..

वडिल's picture

23 Dec 2010 - 10:46 am | वडिल

एक नंबर प्रतिक्रिया.
सहमत.

मराठि भाषा पुढिल २५ वर्षात जवळ जवळ नाहिशी होइल. फक्त ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात बोलली जाइल असे स्पष्ट संकेत आहेत. बहुतेक बंबइया हिन्दि हि महाराष्ट्रा ची बोली भाषा होईल.

भाऊ पाटील's picture

23 Dec 2010 - 2:06 pm | भाऊ पाटील

तुमचे सर्व क्षेत्रातील विद्वत्ता, ज्ञान, भविष्य वर्तवता येईल इतपत दूरदृष्टि, कुठल्याही विषयात लिलया संचार आणि अभ्यासू मते पाहता, मिपावर एक 'बाप'माणूस आला आहे ह्याची खात्री पटली.
_/\_ तुम्हाला (अगदी कोपरापासुन)

- सावत्र भाऊ

Pearl's picture

23 Dec 2010 - 12:35 pm | Pearl

>>मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल.

सहमत

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2010 - 12:43 pm | llपुण्याचे पेशवेll

इच्छाशक्ती किती चांगला शब्द आहे ना!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Dec 2010 - 12:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>मराठी माणसाकडे पैसा कमी त्यामुळे तिथेही आपले लोक मार खातात.
मान्य. १००% मान्य.

>>लोक "पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते" हे आणि तत्सम गोष्टी इंग्रजी भाषेत म्हणतात याचे कारण त्या भाषेच्या ज्ञानाशिवाय बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या भराऱ्या मारणे फारच कठिण आहे हे वेगळे सांगायला नको

पहिला मुद्दा :- इंग्रजीचा स्वीकार करणे म्हणजे मराठी (किंवा कुठलीही भाषा) अशुद्ध बोलणे नाही.
दुसरा मुद्दा :- इंग्रजी शिवाय भारतात प्रगती करणे कठीण आहे असे तुमचे म्हणणे असेल तर मान्य. मात्र जागतिक पातळीवर ते तितकेसे पटत नाही. जपान, जर्मनी, फ्रांस इ अनेक देशात इंग्रजीचा फारसा प्रसार नसतानाही त्यांने प्रगती केलीच ना.

>>तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल.मग आपल्याला पडतात तसे प्रश्न पडणार नाहीत.
हे एकदम नेमक्या शब्दात मांडले आहेत. पण मूळ धागाकर्त्याचा मुद्दा लक्षात घेता, आधी मराठी माणसाने मराठी भाषेला मन दिला पाहिजे. आपणच तो दिला नाही तर दुसरे का म्हणून देतील?

भाषा लवचिक, इतर भाषेतील शब्दांना सामावून घेणारी असली पाहिजे या बद्दल इथे लिहिलेले मत वाचा.
http://www.misalpav.com/node/15065#comment-252013

क्लिंटन's picture

23 Dec 2010 - 12:59 pm | क्लिंटन

जपान, जर्मनी, फ्रांस इ अनेक देशात इंग्रजीचा फारसा प्रसार नसतानाही त्यांने प्रगती केलीच ना

बरोबर आहे.पण ती प्रगती त्यांनी कशी केली हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा.जपानी लोकांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये, जर्मनांनी मूलभूत आणि उपयोजित क्षेत्रात (भौतिकशास्त्रापासून ऑटोमोबाईलपर्यंत) मोठी झेप घेतली.ही सगळी क्षेत्रे त्यांनी एकतर स्वत: सुरू केली किंवा आधीच असलेल्या क्षेत्रात प्रचंड आणि अमूलाग्र बदल घडवून आणले असे म्हटले तरी चालेल. उदाहरणार्थ क्वांटम मेकॅनिक्स हे पूर्णपणे जर्मनांनी सुरू केलेले क्षेत्र आहे.त्यात मॅक्स प्लॅन्कपासून आईनस्टाईन,श्रोडिंजर,हायजेनबर्ग,आईन्स्टाईन अशा अनेक जर्मन शास्त्रज्ञांनी मोलाचा वाटा उचलला.दुसरा जर्मन लुडविग प्रॅंटलने boundary layer theory मांडली आणि तो aerospace engineering चा पाया ठरला.इतरांनी शोधून काढलेली इलेक्ट्रॉनिक्स चीप घेऊन जपान्यांनी त्यात प्रचंड भर टाकली आणि त्या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला.तसे दुर्दैवाने एकाही क्षेत्रात आपल्याकडे होत नाही.

तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे या देशांमध्ये मूलभूत संशोधन होत होते.तसे भारतात व्हायला लागले तरच इंग्रजी भाषेविषयीचा आपला मुद्दा मान्य.नाहीतर केवळ इतर भाषांमधील संज्ञांचे भाषांतर करून केवळ आपण आमच्या भाषेत शिकतो या अहंकार सुखावणाऱ्या समाधानापेक्षा फारसे काही पदरात पडणार नाही.तेव्हा मूलभूत ज्ञान आपल्याकडे निर्माण होत नाही तोपर्यंत भाषा हा दुय्यम मुद्दा आहे असे मला म्हणायचे आहे.

स्वप्नांची राणी's picture

23 Dec 2010 - 10:24 am | स्वप्नांची राणी

माइंड ब्लोइंग.....

टारझन's picture

23 Dec 2010 - 10:31 am | टारझन

ब्लोइंग ... ब्लोइंग ..

- राणीचं स्वप्न
आर्रतिच्यामारी... लाजलं का काय पाखरुं ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2010 - 10:44 am | निनाद मुक्काम प...

गगनविहारी ह्यांच्याशी सहमत
परदेशात गेल्यावर आपल्या भाषेचा उमाळा अधिक प्रखरतेने येतो .त्यामुळे गटणे छाप मराठी बोलण्याकढे कला वाढतो .(स्वानुभव ) व भारतात आल्यावर आपल्या माणसांमध्ये किती बोलून नि किती नाही असे होणे साहजिक आहे .पण मराठी भाषा लवचिक असणे महत्वाचे आहे ,कारण भारतात युरोपियन देशांसारखी एक राष्ट्र एक भाषा हे सूत्र नाही आहे आपले उच्च शिक्षण हे इंग्रजीत होते .त्यामुळे ह्या भाषेचा सध्या च्या अनेक युरोपियन व चायनीज भाषेवर सुध्धा पगडा आहे .त्यामुळे कोणत्याही प्रकारे मराठी बोला .पण सर्वात महत्वाचे मराठी बोलतांना अभिमान बाळगावा हे महत्वाचे .बाकी जगाला कुशल कामगार हवे आहेत .ते फक्त भारत देश देउ शकतो .भारतिय विद्यार्थ्यांसाठी जगभरातील विद्यापीठे आपली कवाडे उलघडून आहेत .परिणामी अनिवासी मराठी भारतीय जगात प्रचंड होणार .व त्याची जगभरात मराठी म्हणून एक ओळख व्हावी .ह्या दृष्टीने एखादी संघटना अथवा संस्था हवी असे वाटते .तेव्हा खर्या अर्थाने जगभर आपली भाषा नुसती बोलली जाईल तर तिचे अस्तित्व टिकवले जाईन..

शेखर काळे's picture

23 Dec 2010 - 1:16 pm | शेखर काळे

परदेशात गेल्यावर आपल्या भाषेचा उमाळा अधिक प्रखरतेने येतो ...
हे जरा खटकले. कारण असे की मी आणि माझे काही नातलग, मित्र (भारतात स्थायिक असलेले [मुद्दाम सांगितले]) ठरवून, स्वयंप्रेरणेने मराठी पुस्तके, मासिके माझ्या लहानपणा पासून (मला कळायला लागले त्या-आधीपासून) वाचत आहोत आणि विकतही घेत आहोत. आणि 'गटणे छाप' मराठीही बोलत आहेत.
मी परदेशात असतो किंवा नसतो तरीही हे केलेच असते. हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो कारण इतर बरेच लोक करत आहेत. कदाचित त्यातील काही मिपा वरही असतील.
त्यात खाली मान घालण्यासारखे आहे असे मला वाटत नाही.

आपली भाषा बोलली जाईल तर तिचे अस्तित्व टिकवले जाईन.
हे मात्र खरे. पण असे पहा, आपण जर जास्तीत जास्त इतर भाषांतले शब्द वापरले, तर आपली भाषा बोलायचे कारणंच काय?

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार

अच्छा अच्छा आपण परदेशात असता काय ? :)

शक्यता नाकारता येत नाही.

- मावसा

मुलूखावेगळी's picture

23 Dec 2010 - 3:01 pm | मुलूखावेगळी

अवान्तर :
अशक्यप्राय गोष्टिन्ना शक्य करायचा प्रयत्न करु नका.

टारझन's picture

23 Dec 2010 - 3:41 pm | टारझन

शक्यता नाकारता येत नाहि.

- गळिल

मन१'s picture

23 Dec 2010 - 1:07 pm | मन१

"इतर मराठी संस्कॄतप्रचुर शब्द आता मेलेत का ?" हे वाक्य खटकलं.
हे खरं तर "...इतर मराठी शब्द आता मेलेत का ?" असं असतं तरी चाललं नसतं का?
ह्या विषयावर आजानुकर्ण ,विकास वगैरे मान्यवरांची मिपावरच पुर्वी जोरदार चर्चा,वादविवाद झालेत्.ते शोधावेत.

बाकी क्लिंटनशी सहमत.

आपलाच
(वाचक) मनोबा.

हे खरं तर "...इतर मराठी शब्द आता मेलेत का ?" असं असतं तरी चाललं नसतं का?

शक्यता नाकारता येत नाही.

- मनिल

शेखर काळे's picture

23 Dec 2010 - 1:19 pm | शेखर काळे

कौतुक करायला मोठे मोठे बोजड शब्दच वापरायचे तर मराठीत आहेत की ...

अवलिया's picture

23 Dec 2010 - 1:25 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाही

आत्मशून्य's picture

23 Dec 2010 - 5:45 pm | आत्मशून्य

.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 1:27 pm | परिकथेतील राजकुमार

कौतुक करायला मोठे मोठे बोजड शब्दच वापरायचे तर मराठीत आहेत की ...

उदाहरणे देता येतील काय ?

परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ?

परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ?

शक्यता नाकारता येत नाही .

- परिल

छोटा डॉन's picture

23 Dec 2010 - 2:11 pm | छोटा डॉन

>>परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ?

तसे असेल तर "ह्या माय मराठीच्या उद्धारासाठी झटणार्‍या परदेशस्थ मराठी माणसाला माझे समर्थन आहे' असे सांगतो

- छोटा डॉन

आत्मशून्य's picture

23 Dec 2010 - 7:06 pm | आत्मशून्य

..........................

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2010 - 9:49 pm | निनाद मुक्काम प...

मुळात मराठी भाषा पूर्ण महारष्ट्रात समान आहे का ? मालवणी /अहिराणी /घाटावरची / शहरातली / आगरी ./आणि अजून किती तरी (परवा वैभव मंगले खुपते तिथे गुप्ते मध्ये म्हणाला कोकणात माझी भाषा मालवणी नाही .तर संगम्रेश्वर ला वेगळी मराठी भाषा बोलली जाते .जी त्याने अभिनयाने महारष्ट्रात पसरवली .
सगळेच मराठी बांधव कानेटकरांच्या नाटकातील पत्रासारखे बोलतील अशी आशा कशी काय बाळगू शकतो आपण .
जग जसे जागतीकरणामुळे जवळ येत आहे तसे संपर्क भाषा म्हणून इंग्रजीचा वापरा जसा अपरिहार्य आहे .तसा तिचे बोलीभाषेत येणे सुध्धा साहजिकच आहे .
सावरकरांनी मराठी भाषेत अनेक मराठी शब्द बहाल केले जसे महापौर आणि अनेक तसे जर ताज्या दमाचे मराठी शब्द जर आता होत नसतील व सगळ्यात महत्वाचे जनसामान्य लोकांमध्ये प्रचलित होत नाहीत तर मग कशी काय आपण हि अपेक्षा मराठी जनतेकडून करावी .(बाकी मराठीचा एवढाच जर तुम्हाला पुळका असेल तर मग उच्च शिक्षणासाठी मराठी हा विषय घेऊन त्यात करियर केले असते .तर तुम्हाला आपल्या बांधवांमध्ये
भाषिक प्रबोधन करता आले असते .)
उगाच भारतात सुट्टीसाठी यायचे नि येथली लोक आपली भाषा पर्यायाने अस्मिता विसरत चालली आहेत व आम्ही परदेशात मायमराठीचा झेंडा उंचावत आहोत. असा भ्रम निर्माण करणे मला तरी पटत नाही .
बाकी माझी फुलराणी हे नाटक तू नळीवर आहे .त्यातून काही बोध झाला तर ठीक आहे .
विधार्भात नागपूर मध्ये किंवा मध्य प्रदेश मधील मराठीत हिंदी शब्द तर सोलापूर मध्ये कानडी शब्द सर्र्रास आढळतात .त्यामुळे त्यांची मायमराठी अशी अशुध्द का ? असा तुम्हाला प्रश्न पडणे पण साहजिकच आहे .म्हणा

शेखर काळे यांचा लेख आणि क्लिंटन यांचे त्यावरील भाष्य दोन्हीही आपल्या-आपल्या जागी "ठिक्क" (fit) बसतात.
सध्या परदेशी वास्तव्य असलेल्या मला असा अनुभव बर्‍याचदा येतो. आमचे एक मित्र दर गुढी पाडव्याला मराठी लोकांना जेवायला बोलवत असत. तो इथे एक पायंडाच पडला होता. त्या दिवशी फक्त मराठीतच बोलायचे असा नियमही केला जायचा. आणि चुकून इंग्लिश, हिंदी किंवा इथल्या बहासा इंडोनेशियात बोलल्यास शिक्षा असायची! (म्हणजे चुटका सांगणे, एकादा नाच करणे, एकादे गाणे म्हणणे वगैरे)
घाम फुटायचा असे म्हटल्यास फारसे चुकणार नाहीं. कितीही आठवण ठेवून बोलायचे म्हटले तरी एकादा शब्द तरी जायचाच तोंडातून.
पण 'मिपा'चा सभासद झाल्यापासून मात्र परिस्थिती सुधारली. त्यात Nuclear Deception चे रूपांतर केल्यापासून तर मराठी भाषेवरील माझे प्रभुत्व झपाट्याने वाढले. आज घरी बोलतानासुद्धा मराठी शब्द जास्त सहजतेने तोंडात येतात. कधी-कधी सौ.सुद्धा अचंबित होते! तेंव्हा 'मिपा'ला योग्य ते श्रेय दिलेच पाहिजे.
आपण न लाजता मराठी बोलले पाहिजे. जपानी लोकांनी कांहींही नव्याने शोधले नाहीं. इंग्रजीच्या नावाने तर आनंदी आनंदच! पण त्यांना त्याचे वैषम्य वाटत नाहीं. बाहेर कित्येक संमेलनांत (conferences) ते अनुभवावर आधारित असा आपला एकादा लेख प्रस्तुत करतात तेंव्हां त्यांची तारांबळ उडते. पण ते जे आकडे समोर ठेवतात ते पाहून वाईट इतकेच वाटते कीं त्यांना त्यांच्या या उपक्रमाबद्दल फारसे खोलात जाऊन विचारता येत नाहीं.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे. करुणानिधी किंवा बंगाली मंत्री जसे आपल्या भाषेला सन्मान देतात तसा आपल्या पृथ्वीराजांनी दिला पाहिजे. यात क्रांती होऊ शकते पण मनोबल आणि इच्छाशक्ती हवी!
शेखरभाऊ, सुंदर लिहिता. असेच लि़खाण चालू ठेवा. सध्या कुठल्या देशात आपले वास्तव्य आहे? इथे किंवा 'व्यनि'वर किंवा kbkale@yahoo.com वर कळवा.
जय महाराष्ट्र!

तसेच मराठीत टाइप करायची जी सवय लागते ती आपल्याला पून्हा मराठी शिकवते असे वाटते, जसे आपण लहान असताना शिक्षकांनी मराठी भाषा आणी त्याच्या शूध्दलेखनाची शीस्त लावली. तसेच इतर मराठी सोबत्यंमूळे एकूणच मराठीचा सराव वाढतो ऐकणे,बोलणे,लीहिणे, (इतरांचे लेखन) वाचणे, यामूळे वीचारपण मराठीतच करणे यात एकूणच सूस्पश्टता वाढते. जे आपल्याला नोकरी करताना, शिक्षण घेताना मराठीतर भाषेच्या उपलब्धतेने/ अती वापराने शक्यच होत नाही.

दैत्य's picture

23 Dec 2010 - 8:08 pm | दैत्य

मराठि भाषा पुढिल २५ वर्षात जवळ जवळ नाहिशी होइल. फक्त ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात बोलली जाइल असे स्पष्ट संकेत आहेत. बहुतेक बंबइया हिन्दि हि महाराष्ट्रा ची बोली भाषा होईल.

अरे भाऊ...असं नको नं म्हणू , भीती वाटते ना !

जरा बघा, ते वडील आहेत. बाबा वाक्यं प्रमाणम्|;)
सावत्र भाऊसाहेबांनी उपप्रतिसाद दिलाय.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Dec 2010 - 10:06 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

माझ्या जिभेचं वळण जरा जास्त्च इंग्रजाळलेलं होतं... अजुनही आहे.पण मिपावर आल्यापासुन काही जाण्कार मिपाकरांनी कान उघडणी केल्यापासुन मी स्वतः त्यात प्रकर्षानं बदल करतिये.
हो की नाही परा?
:)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2010 - 10:19 pm | निनाद मुक्काम प...

आता तू लिहिले पाहिजे कि
मी बदलत आहे .
गटणे मराठीत
माझ्यात परिवर्तन होत आहे .