संध्याकाळ झाली आहे
नि ती येणार आहे
तो वाट बघतोय तिची
आतुरतेने ..चातकासारखी .!!
तिन्हीसांजा झाल्यात .....
चुकून- माकून मागे राहिलेली
पाखरांची भिरी घरी परततेय ....
आकाशी रंगाची साडी नि कपाळवरचा घाम
त्याला अजूनही आठवत असते
त्याचे कासावीस होणे
तिच्या नुसत्या आठवणीने
तिचा हलकासा वावर
तिची लगबग
तिने केलेला चहा
देवाजवळ लावलेला दिवा
सुख सुख निव्वळ .....
कसे असते हो ..?
पाखरे तर गेली उडून दूरदेशी
आपल्या पोटापाण्यासाठी
स्वताचे घरटे बनवून
पण
ती येणार आहे
तो वाट बघतो आहे तिची
ती गेलीय खूप दूर
जेथे जाण्याचे मार्ग असतात
पण येणारे मार्ग हरवून जातात
गच्च काळोखात ....!
तरीही त्याला वाटत असते
अगदी आतून ....
ती येणार आहे
निळी आकाशी साडी
नि प्रसन्न चेहरा
तो वाट बघतोय तिची
कधीची केव्हाची
संध्याकाळ झाली की तो वाट बघत बसतो
तिच्या येण्याची
ती येते आहे ,येणार आहे
तिची लागते त्याला चाहूल
तिच्या अस्तित्वाची त्याला होत असते जाणीव
कसे असतील खोटे हे भास
येईल ना ती ...
तो वाट बघतोय ...केव्हाची ..कधीची..!!!!
प्रतिक्रिया
23 Dec 2010 - 12:52 pm | पियुशा
किति मस्त लिहिता तुम्हि
23 Dec 2010 - 12:59 pm | नगरीनिरंजन
कविता आवडली. अगदी स्पर्शून गेली.
23 Dec 2010 - 1:45 pm | गणेशा
एकट्याच असणार्या माणसाचे कासाविस मन तंतोतंत उतरवले आहे तुम्ही ..
>> कसे असतील खोटे हे भास
>> येईल ना ती ... ?
हो हे भास खोटे नाहिच .. ती नक्की येणार ... त्याच्या अवतीभवतीच्या प्रत्येक हालचालींवर ..कृतींवर तीचेच राज्य असणार ..
कारण तीची आठवण ती ही सुंदर कोमल अजुनही तसीच नवी कोरी आहे त्याच्या मनात .. म्हणुन ती नक्की येणार
23 Dec 2010 - 1:56 pm | टारझन
>> कसे असतील खोटे हे भास
>> येईल ना ती ... ?
शक्यता नाकारता येत नाहि.
- काशिल
23 Dec 2010 - 3:08 pm | ज्ञानराम
कदाचित ती सूद्धा वाट पाहत असेल.. .. त्याची..!! ""
23 Dec 2010 - 3:08 pm | अवलिया
शक्यता नाकारता येत नाहि.
23 Dec 2010 - 4:06 pm | प्राजक्ता पवार
कविता आवडली.
23 Dec 2010 - 5:01 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
छान लिहिलंय ... ओघावती ...सरळ मनाला स्पर्षुन जाणारी भाषा!..
मस्त!