गणपतीला वाजली थंडी

५० फक्त's picture
५० फक्त in काथ्याकूट
22 Dec 2010 - 10:14 pm
गाभा: 

हो ह्या वर्षी म्ह़णजे गेल्या कित्येक दशकांत थंडी पडली नसल्यासारखी जाहिरात चालली आहे, या वर्षी पुण्यात थंडी पडल्याची. आज संध्याका़ळी स्टार माझा या चॅनेलवर बातम्यामध्ये या संदर्भात एक बातमी पाहिली.

पुणे येथील सारसबाग तेथे असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीला गेल्या दहा वर्षांपासुन थंडिच्या मोसमात, चक्क लोकरीचे स्वेटर व टोपी घालतात म्हणे. एक दोन नाही तर चांगले आठ दहा सेट आहेत तेथे. तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.

यामुळे देव व माणुस या मधलं अंतरच मिटुन जातं आहे असं वाटतं, माणसानं जरुर प्रयत्न करावा देव व्हायचा आणि व्हावं देखिल त्याला ना नाही, पण देवाला असं सामान्य माणसाच्या पातळीला आणुन बसवावं याचं वाईट वाटतं.

हा प्रकार पण अंधश्रद्धेचाच किंवा अतिश्रद्धेचा प्रकार वाटतो मला. या आणि अशा अजुन काही तथाकथित प्रथा तुम्हाला माहित आहेत काय ? असल्यास त्यांवर व त्यांच्या ब-या वाईट परिणामांवर इथे चर्चा व्हावी हा या धाग्याचा उद्देश.

हर्षद.

प्रतिक्रिया

बालकथा आवडली . प्रतिक्र्या वाचण्यास उस्तुक :)

-

अनामिक's picture

22 Dec 2010 - 10:19 pm | अनामिक

यावेळी बाप्पाचा स्वेटर घातलेला फोटू नाही टाकला!

अवांतरः इतिहासाची पुनरावृत्ती होणार काय? बोलो पांच का दस, पांच का दस....

रविवार पर्यंत थंडी राहिली तर जातो आणि परवानगी मि़ळाली फोटो काढायची तर घेउन येतो आणि लावतो इथे.

हर्षद.

विजुभाऊ's picture

23 Dec 2010 - 11:01 am | विजुभाऊ

ह्यो घ्या फुटू

1

कसला गोड दिसतोय बाप्पा ! वा !

गणपती बाप्पा मोरया !!

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार

खरच गोड दिसतोय :)

जय गजानन.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2010 - 12:07 pm | llपुण्याचे पेशवेll

एकदम गोग्गोड दिसतो आहे बाप्पा.
गणपती बाप्पा मोरया.

एकदम "चिंगु" दिसतोय....

अजून एक गोडू, गम्म्पती

विजुभाऊ's picture

23 Dec 2010 - 11:26 am | विजुभाऊ

स्पा भौ...
तुमच्या चित्रातल्या गंपती ला शुद्दा मफलर ( उपरणे) घातलय

स्मिता.'s picture

23 Dec 2010 - 4:51 pm | स्मिता.

अग्गं बाई... कसला गोग्गोड गम्पती आहे!!

यशोधरा's picture

23 Dec 2010 - 4:54 pm | यशोधरा

:)

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Dec 2010 - 10:24 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

मी तर पॉपकॉर्नची फ्याक्टरी विकत घेतोय. झाडं शोधा रे!!!

बाय द वे, हर्षदराव, बाप्पाचा स्वेटर हा मिपावरील एक ऐतिहासिक धागा होता. थोडी शोधाशोध करा.... ऐतिहासिक म्हणजे अगदी ऐतिहासिकच.... वाचाच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Dec 2010 - 10:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भांडवल हवंय का रे बिपिन फ्याक्टरीसाठी, माफक ३.१४% व्याजदर!

कुंदन's picture

23 Dec 2010 - 12:48 pm | कुंदन

बघा ह्यांचा हिरवा माज. २ आठवडे झाले नाहित तर ही अवस्था.

शक्यता नाकारता येत नाहि.

- किडिल

अविनाशकुलकर्णी's picture

22 Dec 2010 - 10:21 pm | अविनाशकुलकर्णी

अहो हे काहिच नाहि..दुपारी मंदीरे बंद असतात देवाची..देव झोपतो म्हणे दुपारी

हे सुद्धा देवाला माणसाच्या पात़ळीवर आणण्यासाठीच, आम्ही पण झोपतो दुपारी आमच्या घरी.

असुर's picture

22 Dec 2010 - 10:25 pm | असुर

काय हरकत आहे?

सारसबागेच्या गणेशमंदिराचा एक स्वत:चा ट्रस्ट आहे. ते लोक गणपतीच्या मूर्तीवर कोणत्या प्रकारची वस्त्रे, दागिने असावेत याबद्दल ठरवतील की! यात चर्चा करण्यात काय हशील आहे?

आणि गणपतीला स्वेटर घातल्याने कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा पसरते आहे हे समजले नाही! याबाबत थोडे विस्ताराने लिहीणे शक्य आहे का?
--असुर

याला पुणेरी जाज्वल्य अभिमान म्हणावे का असुरभौ ?? ;)

अवलिया's picture

23 Dec 2010 - 1:34 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

सुध्या,
मिपावर सध्या जागतिक प्रश्नांवर किंवा त्रिलोकाला ग्रासून टाकणार्‍या विषयांवर चर्चा चालू असताना हे असले स्थानिक पातळीवरचे विषय आणून महत्वाच्या धाग्यांना बोर्डावरून हटवणे आहे का अशी एक शंका वाटून गेली =)) =))
(या शाश्वत प्रश्नावर नाना आणि टारझन यांचे मौलिक विचार जाणून घेण्यास उत्सुक)

बाकी मी एक अस्स्ल पुणेकर असल्याने जाज्वल्य अभिमान वगैरे बाय डिफॉल्ट आहेच! ;-)

--असुर

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार

(या शाश्वत प्रश्नावर नाना आणि टारझन यांचे मौलिक विचार जाणून घेण्यास उत्सुक)

अवलिया + टारझन = अवटार 3D ;)

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 5:03 pm | नरेशकुमार

पन राहिलेले 'झनलिया' कुठे जाणार ?

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार

पन राहिलेले 'झनलिया' कुठे जाणार ?

ते जातील रसायनशास्त्राचा अभ्यास करायला नाहितर कडबा वाटायला :)

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2010 - 6:18 pm | llपुण्याचे पेशवेll

किंवा लियाझन होतील. :)

अवलिया's picture

23 Dec 2010 - 6:20 pm | अवलिया

रसायनशास्त्र, कडबा... रोचक रोचक... विनायका ! विनायका !

शक्यता नाकारता येत नाहि.

- खजिल

याचे उत्तर सुध्दा शक्यता नाकारता येत नाहि. असेच असणार ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2010 - 6:27 pm | llपुण्याचे पेशवेll

शक्यता आहे....

अवलिया's picture

23 Dec 2010 - 6:29 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 6:29 pm | नरेशकुमार

'वेगळि प्रतिक्रिया सुचते आहे' याचि शक्यता नाकारता येत नाही. हे मात्र नक्की.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Dec 2010 - 10:35 pm | बिपिन कार्यकर्ते

हे घ्या रे....

http://www.misalpav.com/node/5414

जुना धागा... भरपूर दंगा झाला आहे. आता परत नको.

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 5:21 pm | नरेशकुमार

तुमि घातला, आमि का नाय घालायचा दन्गा ? का का

प्रशु's picture

22 Dec 2010 - 10:38 pm | प्रशु

हर्षद भाऊ,

हिंदु धर्मात षोडोषोपचार पुजा म्हणुन एक प्रकार आहे. त्यात सोळा प्रकारचे संस्कार मुर्तीवर केले जाता, (मुर्तीत प्राण आणणे, वेगवेगळे अभिषेक, वस्त्रे ई.) हे सर्व उपचार मुळ त्या शक्तीला मानवी साच्यात बसवुनच केले जातात आणी खरं तर सगुण उपासना हि त्यासाठीच असते, उगाच त्या वरुन श्रदधा अंधश्रद्धे हा वाद काय कामाचा..

आमच्या विभागात पाळीव कुत्र्यांना सुदधा गरम कपडे घालतात. मुळात मुंबई सारख्या ठीकाणी असे करुन प्राण्यांपासुन त्यांची निसर्गनिर्मित प्रतिकार शक्ती कमी करण्याचा जो प्रघात पडतोय तो गणपतीला गरम कपडे घालण्यापेक्शा जास्त वाईट आहे.

शेखर काळे's picture

23 Dec 2010 - 8:54 am | शेखर काळे

कमी झाल्यास आजारी पडेल ना तो !
मग काय .. गणपतीचे डॉक्टर .. गणपतीची औषधे ..
वा वा ..
आमचे येथे गणपतीची शुद्ध प्रक्रियेने तयार केलेली औषधे मिळतील .. आमची इतरत्र कोठेही शाखा नाही ..

चालू द्या ..

मुर्ख लोक आहेत राव! अहो आमचा गण्या आला आहे उत्तर ध्रुवा वरुन (संदर्भः वेद, गणपती वगैरें मिपावरील समृद्ध लिखाण वाचावे) त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी?

पिवळा डांबिस's picture

23 Dec 2010 - 4:29 am | पिवळा डांबिस

त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी?
आणि समजा वाजली आणि त्यातून काही सर्दीपडसं झालं तर डॉक्टरची बिलं काय हा नायल्या भरणार आहे का?
ती विश्वस्तांनाच भरायचीयेत हो!!!
;)

यशोधरा's picture

23 Dec 2010 - 1:00 pm | यशोधरा

LOL! त्याला बोलायचं - सॉरी - टंकायचं बिल भरायला लागत नाही, असं म्हणायचय का काका तुम्हांला?

रेवती's picture

23 Dec 2010 - 4:42 am | रेवती

मिपावर येउन गेला असा धागा....त्यावेळी वाद घालायची खुमखुमी होती ती आता वयोमानानं नाही राहिली.;)
एकच उत्सुकता लागून राहिलिये आणि ती म्हणजे यावर्षीच्या स्वेटरचा रंग आणि विणीचा टाका कोणता?

गांधीवादी's picture

23 Dec 2010 - 5:09 am | गांधीवादी

हे असे देवी देवतांच्या नावाने त्यांना स्वेटर चढविण्यापेक्षा रस्त्यावरील कुडकुडत बसलेल्या गरिबाला ते स्वेटर देऊन टाका.
मातीच्या गणपतीत जर खरोखरच देव असेल तर त्याला सुद्धा उबदार वाटेल.

नगरीनिरंजन's picture

23 Dec 2010 - 1:11 pm | नगरीनिरंजन

शुद्ध मूर्खपणा. गणपतीच्या मूर्तीसमोर मोदक ठेवल्यावर ती मूर्ती एकही मोदक खात नाही याची काळजी का नाही करत मग? तेव्हा मात्र तत्परतेने ते ताट उचलून गायब केले जाते. न जेवल्यामुळेच थंडी वाजते त्याला :)
बरं स्वेटर मूर्तीला नसून गणेशाला घातलं म्हणावं तर गणांचा जो ईश आहे, चंद्राचा मुखभंग करणारा आहे, व्यासांकडून ऐकून महाभारत एकटाकी लिहीणारा आहे, रावणाला धडा शिकविणारा आहे, रिद्धी सिद्धींचा नायक आहे आणि सर्व संकटांचा हारक आहे त्याला तुम्ही स्वेटर-टोपडं घालणार?

नावांतरः किळस येते असले प्रकार पाहून.

छोटा डॉन's picture

23 Dec 2010 - 9:50 am | छोटा डॉन

=)) =)) =))
हा हा हा !!!

खास काही नाही, जरा 'जुने संदर्भ' आठवले ( अरे हो, आमचे आंद्याशेठ कुठे आहेत ? ). ;)
ह्यावर्षी जरा थंडी जास्तच असल्याने आम्हीच स्वेटर घालुन बसलो आहोत, त्यामुळे इतरांच्या स्वेटरवर टिप्पणी करणे आमच्या तत्वात बसत नाही ;)

- डॉन्या गणपती

विजुभाऊ's picture

23 Dec 2010 - 10:57 am | विजुभाऊ

डॉण्या गंपत्ती. =)) =)) =))०

इसर्जनाची मिरवनूक कदी हाय?

अवांतरः स्मायल्या कदी यनार हितं? लोळून हसायचं समादान नुस्त चिन्नावर भाग्वावं लाग्तय

>>इसर्जनाची मिरवनूक कदी हाय?
बरेच जण टपुन बसलेत डॉण्याचा विसर्जनावर...... याची शक्यता नाकारता येत नाही ;)

गवि's picture

23 Dec 2010 - 10:47 am | गवि

गणपती, देव, माणूस, अंधश्रद्धा, अतिश्रद्धा, तथाकथित प्रथा, बरे वाईट परिणाम, चर्चा..

बापरे... आता ?

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 6:32 pm | नरेशकुमार

लपता का हो गवि, घाबरले का काय ?
आनि हलका हेलिअम घ्या

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 10:54 am | परिकथेतील राजकुमार

स्वतःच्या खिशातुन पैसे गेल्यासारखे काही लोक गळे का काढत आहेत ?

जेवढ्या प्रेमाने / आदराने एखादा मुलगा थंडीची चाहूल लागल्याबरोबर आपल्या आई वडिलांसाठी स्वेटर, मफलर वगैरे आणतो त्याच भावनेने आणि श्रद्धेने कोणी गजनानालाच आई वडिलांसारखे श्रद्धास्थान देऊन स्वेटर घालत असेल तर इतरांच्या पोटात दुखायचे कारण काय ?

इथे गोरगरिबांच्या नावाने गळे काढणारे कधी स्वतःचे जुने पाने स्वेटर तरी दान करतात का ?

देवाला मिळणारे प्रेम सुद्धा काही लोकांना बघवत नाही. काय म्हणावे आता ह्याला ?

असो....

तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक भांडण नाय करेल तर ऑफिसातला रिकामा वेळ कसा घालवेल ? :)

- ( डुल्या मारुती भक्त) जिलब्या टारझन

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2010 - 12:07 pm | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा .... सह्मत आहे रे टार्‍या.

-(गणेशमंदिरवाला)पेशवे

गांधीवादी's picture

23 Dec 2010 - 12:48 pm | गांधीवादी

ये पब्लिक है, ये सब जाणती है.

अर्धवटराव's picture

24 Dec 2010 - 1:11 am | अर्धवटराव

शक्यता नाकारताय का टारुशेठ??

अर्धवटराव

शक्यता नाकारता येत नाहि.

- अर्धिल

मी ऋचा's picture

23 Dec 2010 - 12:38 pm | मी ऋचा

१००% सहमत!

स्पा's picture

23 Dec 2010 - 11:06 am | स्पा

असेच म्हन्तो....
उगाच कशावरही का वाद घातला जातोय .....

आणि आपण इथे चर्चा करून... तिकडे काही फरक पडणार आहे का?
आधी दत्त आता गणपती.....

उद्या कृष्ण आणि राधेत खरच प्रेमप्रकरण चालू होते काय असा धागा निघेल.................

- लोकलकथेतील प्याशिंजरकुमार

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:15 am | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

अविनाशकुलकर्णी's picture

23 Dec 2010 - 11:34 am | अविनाशकुलकर्णी

घालायचा तर मान्टो कार्लोचा घालायचा...हल्ली बरीच डिझाईंन्स आली आहेत...हा प्रकाश डिपारट्मेन्ट मधला दिसतो आहे..
ता,क,..गुलाबी रंग मुलिंसाठी राखौन ठेवला आहे...

देवाला दागदागिने, उपरणी , धोतर , पितांबर , देवीला साड्या , खणाची ओटी हे जसे चालते मग स्वेटर घातला तर काय बिघडले? एकच एक बघण्यापेक्षा देवाची अशी विविध रुपे छान दिसतात. नवरात्रात तर प्रत्येक दिवशी देवीला वेगळी साडी नेसवतात.

घ्या. पक्याभौ ने नवा विषय पुरवला आहे. चर्चेला.

पुन्हा होउन जाउ द्यात "गरीब" "नेसत्या वस्त्रानीशी राहणारे" ईत्यादी ईत्यादी

देव हाच आपण मनुष्यांनी घातलेला एक स्वेटर आहे.

...........

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 3:14 pm | परिकथेतील राजकुमार

देव हाच आपण मनुष्यांनी घातलेला एक स्वेटर आहे.

जगात हे सत्य फक्त सलमानला कळले आहे.

मुलूखावेगळी's picture

23 Dec 2010 - 5:14 pm | मुलूखावेगळी

नाही,अजुन ही काही जणीना कळलेय
राखी, वगेरे ना
कारण त्या पण फक्त मफलर च वापरतात.

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 6:34 pm | नरेशकुमार

अन, प्यॅन्ट म्हनुन काय घातलयं मनुक्श्याने.

अप्पा जोगळेकर's picture

23 Dec 2010 - 3:29 pm | अप्पा जोगळेकर

तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.
जौंदे हो. आम्च्या इथल्या देवळात डिओ पण मारतात.

या आणि अशा अजुन काही तथाकथित प्रथा तुम्हाला माहित आहेत काय ?
निरुद्योगी धागे काढणं ही एक अघोरी प्रथा मला माहित आहे.

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 6:24 pm | नरेशकुमार

दन्गा घालुन घालुन सगळे दमुन घरि गेलेले दिसतायेत.

याचि, शक्यता आहे हे मला माहित आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2010 - 1:42 am | निनाद मुक्काम प...

अरे त्या श्रीरामाला एकदाचे घर द्या बांधून आधी
नवीन विषय
नवीन चर्चा
मग महाचर्चा