किम्म्त .. विचारांची ..

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
22 Dec 2010 - 10:11 pm

सिग्नलला रीक्षात बसललो असताना
समोर एक भिकारी आला
सुरकतलेला चेहरा अन थरलेला हात
करुन नजरेने त्याच्या मन कासावीस झाले

दिवसभराच्या घाईगर्दीत विचार कुठे करतो आपण
अश्यावेळेस मग हे विचार अगदी डोक्यावर नाचतात
विचार..? अन आपन मध्यमवर्गीय यापलीकडे म्हणा काय करु शकतो..?

देश प्रगतीपथावर चाललाय..
सेन्सेक्स वाढतोय..मग ही स्थीती का?
विचारले मग मी त्याच म्हतार्‍याला
का रे बाबा असा भीक मागतोस...?
तसा उसळला माझ्यावर
मी अवाक..परत विचार आला
परिस्थीती मानसास उद्धट बनविते

पुन्हा भावूकपणे मी विचारले तेंव्हा
नजरेतून भाव सरकण सरकले त्याच्या
एका सेकंदात त्यात दिसली
त्याच्या जीवनाची व्यथीत कहानी
पुढे.. पुढे ..?

सिग्नल सुटला होता आणि एक मध्यमवर्गीय माणुस
विचारांची एक रुपया किम्मत करुन पुढे निघून गेला होता ....

--- शब्दमेघ

कविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

23 Dec 2010 - 7:29 am | प्रकाश१११

सिग्नल सुटला होता आणि एक मध्यमवर्गीय माणुस
विचारांची एक रुपया किम्मत करुन पुढे निघून गेला होता ..!
किमत ....विचारांची !हे छान वाटले. कविता नवीन वाटतेय. लिहित रहा. माझ्या खूप शुभेच्छा .!!

अवलिया's picture

23 Dec 2010 - 2:53 pm | अवलिया

लिहित रहा..

ज्ञानराम's picture

23 Dec 2010 - 3:00 pm | ज्ञानराम

शब्दांना धार येत चालली आहे... आता थांबू नका...

प्रथमता धन्यवाद सर्वांचे ..

पकाश जी आणि ज्ञानराम जी :
ही कविता पण जुनीच आहे असे खंताने बोलत आहे.. नविन लिहायला जास्त मुड नाहि ..(मध्ये २ लिहिल्या होत्या मागच्या आठवद्यात तेव्हद्याच नविन )
आणि येथे लिखानापेक्षा आपल्या कविता अआणि इतर लेखकांचे अआणि कविंचे लेखन वाचायलाच जास्त आवडते असे मला वाटते ..

अवांतर : येथे मिपावर रिप्लायच फक्त देणार होतो कायम पण आपले ही काही तरी लिखान येथे द्यावे तेव्हद्याच चांगल्या ओळखी वाढतील या एकाच उद्देशाने येथे कविता देत आहे ..

आपल्या सारखे .. तसेच जिप्सी .. पैसा यांसारखे मित्र भेटल्याने आनंद आहे

पियुशा's picture

23 Dec 2010 - 4:11 pm | पियुशा

मस्त लिहिता पु.ले.शु.