मी दिसतो तुज फ़क्त निळा सोगा घातलेला
आणि शुभ्र अंगरखा पांघरलेला.. ?
वेडे.. अन माझी भेट ..? कश्यासाठी .. ?
अग डोकाव आपल्या आत.. अंतरात..
दिसेल तेथेही मीच, तुझे शरीराचे जळमट घातलेला...
कश्यास हवे आहे तुला अंगारा
ते हि त्या तरल ढगांचा ...
ढग ..(हसून).. अग ठग आहेत ते
क्षणात येथे ..क्षणात तेथे
त्यांपासुन का शक्ती हवी आहे तुला ?
वेडे तू जगतेच आहे ..
फ़क्त जग सर्वांसाठी..
शोध मलाही दुसर्यांच्या मनात..
हो आणि म्हनु नको तेथे
का पांघरलेत शरीराची जळमटे...
रागवलीस ..? बर सांगतो मी
मी आहे असाच निद्रिस्त सर्व मानवात..
ओळख माझी अशीच .. तुम्ही शोधा मज..
वाट अध्यात्माची तुम्हीच पारखा
जानवेल तुम्हाला खरा परमार्थ..
आणि नशीब .. ? नशीब शोधायचे नसते
ते कमवायचे असते स्व हिमतीने..
जा जग .......
--- शब्दमेघ
प्रतिक्रिया
23 Dec 2010 - 7:33 am | प्रकाश१११
वेडे तू जगतेच आहे ..
फ़क्त जग सर्वांसाठी..
शोध मलाही दुसर्यांच्या मनात..
हो आणि म्हनु नको तेथे
का पांघरलेत शरीराची जळमटे.
हे छान लिहिले आहेस.तरल कविता !!