अग्नि..

ज्ञानराम's picture
ज्ञानराम in जे न देखे रवी...
22 Dec 2010 - 6:02 pm

कालजात माझ्या अजून राग आहे ,
मेलेल्या नजरेला अजून जाग आहे,
कोण विझवेल माझि चिता हि माझि?
मी स्वतःच एक ज्वलंत आग आहे,

कोण येईल वाटेस आज त्याचिच वाट आहे,
स्वार्थाला पुसणारी, मी दर्याचि लाट आहे,
जा सांगा तूम्हि त्यांस, आज जपून घरी जा रे,
उफाळून आलेत आज, त्वेषाने लोट सारे..

थर थरते पंख नव्हे , हि गरुड झेप आहे,
धर्माचि अधर्माशी , आज गाठ आहे,
वासनांध डोळ्यांचि , घालवेन मी द्रुश्टी,
मीच आहे प्रूथ्वी, आणि मीच एक स्रूश्टी,

निखारे रक्तातले आज पेटले आहे,
डोळयांत त्यांचे ते़ज साठले आहे,
होतील सारे राख , ज्यांना हवा आहे स्पर्श,
मी स्त्रि असो वा प्रूथ्वी, हा माझाच रे संघर्श,

नाहि पड्णार आता नाहि , नाहि झूरणार आता,
शक्ति मीच आहे ,मीच आहे,माता
उधळून टाकेन तुझा डाव सारा,
तुझ्यासाठि नाही रे , मांडला हा पसारा,

जिव देणारी मी, जिव घेऊन राहिन,
उभ्या डोळ्याने सारे, तांडव पाहिन,
तुझ्या चूकांना आता , क्शमा नाहि वेड्या,
घाला घालीन तुझ्यावर,,घालीन म्रूत्यूच्या बेड्या,

अजुन वेळ आहे.. सावर रे तू आता,
घेऊन जा तूझि कर्म, मागे वळून न पाहता,
फाटेल तुझा घसा, माझ्या हातात गळ आहे.
रक्शावयास अब्रु माझि , माझ्या हातात बळ आहे.
रक्शावयास अब्रु माझि , माझ्या हातात बळ आहे........

रौद्ररसकविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

22 Dec 2010 - 7:20 pm | गणेशा

अतिशय उत्तम कविता ..

विशेषकरुन --

कालजात माझ्या अजून राग आहे ,
मेलेल्या नजरेला अजून जाग आहे,

कोण विझवेल चिता हि माझी?
मी स्वतःच एक ज्वलंत आग आहे,

कोण येईल वाटेस आज त्याचिच वाट आहे,
स्वार्थाला पुसणारी, मी दर्याचि लाट आहे,

जा सांगा तूम्हि त्यांस, आज जपून घरी जा रे,
उफाळून आलेत आज, त्वेषाने लोट सारे..

थर थरते पंख नव्हे , हि गरुड झेप आहे,
धर्माचि अधर्माशी , आज गाठ आहे,

-- हे खुप आवडले

पहिल्या चार लाईन तर गझल्स च्या स्वरुपाच होत्या .. त्यातर जबरीच ..

अशेच लिहित रहा .. वाचत आहे ...

ज्ञानराम's picture

23 Dec 2010 - 9:55 am | ज्ञानराम

धन्यवाद .. गणेशा..

प्रकाश१११'s picture

23 Dec 2010 - 5:04 pm | प्रकाश१११

कोण येईल वाटेस आज त्याचिच वाट आहे,
स्वार्थाला पुसणारी, मी दर्याचि लाट आहे,
खूप छान लिहिले आहे .खूप शुभेच्छा !!