व्यथा वार्धक्याची
नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हाला
अर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला
दुखणे खुपणे चालू असते त्याची कटकट सगळ्यांना
असुनी अडचण सदा वाटते घरच्या सर्वही लोकांना
गरजे पुरते जवळी येतील ठाऊक आहे आम्हाला
प्रेमाचा तिथ शब्दही नसतो वा मायेचा ओलावा
आम्ही भुकेले प्रेमासाठी नातवंडे ती भूक पुरविती
अंधारातील प्रकाश तारे उजळविति जीवन गगनाला
अनिल आपटे
प्रतिक्रिया
21 Dec 2010 - 4:11 pm | गणेशा
व्यथा खुप प्रस्नचिन्ह निर्मान करते आहे.
साधी ..सोपी कविता तरीही मनात विचारांचे वादळ उठवणारी
21 Dec 2010 - 4:48 pm | प्रकाश१११
नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हाला
अर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला
छान कविता .मीपण अशाच कविता लिहिली आहे
बघा वाचून .
22 Dec 2010 - 4:09 am | शुचि
असं कसं आपली "प्राईम" (उमेदीची) वर्षं आपण मुलांना देतो, तेव्हा मुलांनी देखभाल केली तर ते उपकार समजायची गरज नाही. त्यांचं ते कर्तव्यच आहे.
:( कविता वाचून वाईट वाटले.