पीके - ३

वेदश्री's picture
वेदश्री in काथ्याकूट
25 Apr 2008 - 7:07 pm
गाभा: 

जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात?

दुसर्‍या भागातील योग्य उत्तरे न मिळालेले कोडे असे आहे -

१ आहे पण २ नाही.. सांगा काय? - मनस्वी

लगे रहो..

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 7:09 pm | इनोबा म्हणे

जे १ आहे ते २ कसे असेल....म्हणजे १ च
जास पकवू नका...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 7:10 pm | वेदश्री

>१ आहे पण २ नाही.. सांगा काय? - मनस्वी
१?

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 7:13 pm | मनस्वी

इनोबा आणि वेदश्री.. दोघांनीही बरोब्बर उत्तरे दिली आहेत.. त्यांचे अभिनंदन!

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 7:16 pm | इनोबा म्हणे

एकदाचं बरुब्बर उत्तर दिलं म्हणायचं.
ढाक्कीटिकी ढाक्कीटीकी ठा

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 7:25 pm | वेदश्री

http://vedashri.blogspot.com/2008/04/blog-post_4128.html याचे उत्तर जमतेय का?

इन्सर्ट/एडीट लिंक वापरायचा प्रयत्न केला. यश आले नाही. :-(

उदय ४२'s picture

27 Apr 2008 - 1:36 pm | उदय ४२

त्याने काव काव म्हणायला लावले!

-(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

धोंडोपंत's picture

25 Apr 2008 - 7:26 pm | धोंडोपंत

अरे वा,

आमची वेदुबाळ येथे आली वाटतं? छान. सुस्वागतम.

हे आपलं घर आहे हो. तिथल्या पलिकडल्या शिवारासारखं इथे नाही.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 1:46 pm | वेदश्री

>अरे वा,
>आमची वेदुबाळ येथे आली वाटतं?

न येऊन जातेय कुठे?

> छान. सुस्वागतम.

:) नो थॅंक्स.. ( अपनकी दोस्तीमे नो थँक्स और नो सॉरीज.. )

>हे आपलं घर आहे हो. तिथल्या पलिकडल्या शिवारासारखं इथे नाही.

सगळी घरं आपलीच आहेत हो. मनमुराद गप्पा ठोकायला मिळायला हव्यात.. बास्स. तुमच्यासारखे दिग्गज आहे म्हणता काही प्रश्न येऊ नये असे वाटते. बघूया...

आपली ( प्रथम दर्जाच्या राजयोगवाली ! ),
वेदूबाळ.

विद्याधर३१'s picture

25 Apr 2008 - 7:31 pm | विद्याधर३१

काव काव शिकवले कि झाले.

विद्याधर

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 7:32 pm | वेदश्री

:-) बरोबर आहे.

मन's picture

25 Apr 2008 - 10:59 pm | मन

एकदा एका माणसाच्या खांद्यावर पोपट बसला,
आणि काय सांगु दोस्तांनो, तो माणुस मेला!
आता सांगा हे असे कसे?

ब्रिटिश टिंग्या's picture

25 Apr 2008 - 11:00 pm | ब्रिटिश टिंग्या

हत्तीचं नाव पोपट होतं!

अनिकेत's picture

26 Apr 2008 - 1:35 am | अनिकेत

एक पोरगं कॉलेजला लेक्चरला चाललं असतं.....भुकेलेलं असतं, म्हणून वडापाव विकत घेतं.
काहितरी विचित्र वाटल्याने पाव ऊघडून बघतं, तर पावाखाली वड्याऐवजी स्वर्ग असतो.

तर त्या पोराच्या मास्तराचे नाव काय?

अनिकेत

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 1:40 am | इनोबा म्हणे

चंपक फातरफेकर.बरोबर ना!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

वरदा's picture

26 Apr 2008 - 1:44 am | वरदा

हो ना?

अनिकेत's picture

26 Apr 2008 - 1:56 am | अनिकेत

जिनके "सर" हों "इश्क की छाव " पाव के नीचे जन्नत होगी.

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 2:02 am | इनोबा म्हणे

जिनके "सर" हों "इश्क की छाव " पाव के नीचे जन्नत होगी.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

>>हत्तीचं नाव पोपट होतं!

छोटी टिंगी ताईं चे उत्तर अचुक हाये.

ईथे तर सगळेच तर्बेज दिसताहेत....
आता असा एखादा प्रश्न टाकण्यापेक्षा हि मालिकाच बरी.
पाहुया किति सोडवता येतात ते.

आता आणखी काही........

१.विद्या बालन आणि ब्रॅड पिट ह्यांच होतं एकदा लगीन(अँजेलिनाच्या नाकावर टिच्चुन!)

आणि एका एकी त्यांच्या घरि अफाट मुले-मुली जमण्यास सुरुवात होते.

आता सांगा ,का?????

२.एक आटपाट नगर होतं.त्यात होती एक नदि.

नदिवर व्हता येक पूल्.पुलावर व्ह्त्या गावातल्या छान छान पोरी.

त्या सगळ्या च्या सग्ळ्या येकाच पोरासाठी वेड्यापिश्या होत्या.

आता बोला...

त्या पोराचे नाव काय?

३.येकदा (मा.?)राहुलशेठ गांधी वैतागुन त्यच्या आईला म्हन्तोय,

"आये, तुझ्या मुळं माझं लगीन होउन न्हाय र्‍हायलं"

हे कसं काय ?

४. एकदा रावण जातो डिस्को मध्ये.

आणि दानकण चक्कर येउनच पडतो.

कसा काय?

५. GANESH चा ANESH कोणामूळं बनतो?कसा?

६. "शाह रूख खान" चे अनेक वचन म्हणजे आय सी आय सी आय बँक .
पण कसे?

७. "कांदा " चा विरुद्धर्थी "लोणचे".
कसा काय?

८. (रामायणातील) सुग्रीव आणि वाली ह्यांनी एकत्र येउन फिल्म प्रोदुच्तिओन चोम्पन्य सुरु केलि तर
त्याला काय नाव द्याल?

वेदश्री's picture

26 Apr 2008 - 4:45 pm | वेदश्री

५. GANESH चा ANESH कोणामूळं बनतो?कसा?

खोडरबराने 'G' खोडून ?

आता खरी मजा येईल मला कारण मला माहिती नसलेले पीके कळायला सुरूवात झाली ना... :-) लगे रहो, ऋषिकेश !

तात्या विंचू's picture

26 Apr 2008 - 7:19 pm | तात्या विंचू

विद्या.......
लग्न झाल्यावर विद्या बालन चे नाव होत.......
विद्या पीट...(विद्यापीठ)
म्हणुन सगळे पोर जमतात.....

रावण.....
कारण डिस्कोच्या दारावर पाटी असते.....

पर हेड रु ३०० /-........

B) :/ :O) ~X( :D 8} :P =)) :)] <:P

--तो मी नव्हेच (रावण)

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 5:38 pm | वेदश्री

२, ७ आणि ८ साठी काहितरी हिंट द्या ना.. काही सुचेना झालंय..

एक अवघड प्रश्न येत नाही म्हटलं की त्यावर विचार करायचे सोडून पुढचा प्रश्न सोपा आहे का बघायला जातं मन.. सगळेच प्रश्न अवघड असले की परीक्षेची वेळ संपून जाते पण एकही उत्तर येत नाही. अवघड पीकेंची मालिका देण्यामागे असा तर काही कट नव्हता ना? नाही हो.. हा पीके नाहीये.. नॉर्मल प्रश्न आहे ! :))

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 11:16 am | इनोबा म्हणे

३. कारण सोनिया सगळिकडे बोंब मारत असते की,"मुझे बहूमत दो" (मुझे बहू मत दो)
आपल्याला तर येवढंच कळलं भौ...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Apr 2008 - 5:04 pm | ब्रिटिश टिंग्या

>> छोटी टिंगी ताईं चे उत्तर अचुक हाये.
'ऋषिकेश ताई' आम्ही तुमचा झाहीर निषेध करतो X-(

आपला,
टिंग्याभौ

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 5:13 pm | इनोबा म्हणे

छोटी टिंगी ताईं चे उत्तर अचुक हाये.
पण ऋषीकेशा, तूझंच उत्तर चूकलं की रे! टिंगी 'ताई' न्हाय 'दादा' हाये भौ...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

प्रशांतकवळे's picture

26 Apr 2008 - 5:45 pm | प्रशांतकवळे

"शाह रूख खान" चे अनेक वचन म्हणजे आय सी आय सी आय बँक .
पण कसे?

आय सी आय सी आय बँक म्हणते "हम है ना" शाहरूख बोलतो "मै हू ना"

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 4:25 pm | वेदश्री

प्च.. ऋषिकेशच्या पीकेंची उत्तरे काही केल्या गावेना बॉ.. नाही.. नाही.. हार पत्करलेली नाही मी अजून. शोध 'चालू' आहे !

तोवर एक मल्टिउत्तर पीके विचारावा म्हटलं.. बघुया किती उत्तरं शोधू शकतायत मिपावासी. तर ते कोडे असे आहे -

विचार करा की तुम्ही एका बोटीमध्ये बसलेले आहात.. अगदी एकटे. बोट आहे समुद्राच्या मधोमध. तुमच्या बोटीवर आग उत्पन्न करण्यासाठी उपयुक्त होईल असे कुठलेच साधन उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे उरलेल्या दोन सिगारेटींपैकी एक तुम्हाला पेटवायची आहे.. तर काय कराल?

डिस्क्लेमर : धुम्रपानास माझा सक्त विरोध आहे, केवळ करमणुकीचा भाग म्हणून कोड्यात सिगारेट आलेली आहे. कळाले असेलच की सिगारेट केवळ पेटवण्याची कामगिरी दिली आहे.. पेटवून ओढायची नाही ! ;) कळावे.

देवदत्त's picture

27 Apr 2008 - 4:46 pm | देवदत्त

मी सांगू? मी सांगू?

इनोबा म्हणे's picture

27 Apr 2008 - 4:52 pm | इनोबा म्हणे

सांग ना भौ....च्यामारी येवढ्या सिगरेटी फूकल्या पण असला इचार कधी केला नव्हता राव!

ओ वेदश्रीताई जरा क्लू द्या की...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 5:10 pm | वेदश्री

>ओ वेदश्रीताई जरा क्लू द्या की...

अम्म.. ठीके. एक उत्तर मीच सांगते.. आप भी क्या याद रख्खोगे की किससे पाला पडा था !

तुमच्याकडे असलेल्या दोन सिगारेट्सपैकी एक पाण्यात टाकून द्या. यामुळे होईल काय की 'युअर बोट विल बिकम लायटर' जिने तुम्ही तुमची दुसरी सिगारेट पेटवू शकाल ! समजलें? आता बाकीची उत्तरे शोधा पाहू.

नारदाचार्य's picture

27 Apr 2008 - 5:16 pm | नारदाचार्य

शरणागती!!! यवढा क्ल्यू गावूनही आज डोकंच चालंना झालंया.

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 5:28 pm | वेदश्री

हिंदी पिक्चरची गाणी येत नाहीतसे दिसते तुम्हाला.. कसे होणार तुमचे अशाने? जे तुमच्याकडे आहे ते बघा, वापरा आणि पेटवा एक सिगारेट.. आहे काय आणि नाही काय? तुमच्याकडे कायकाय आहे? दोन सिगारेटी, स्वतः तुम्ही, बोट आणि समुद्राचे पाणी.. काही लागतेय का लिंक? :))

नारदाचार्य's picture

27 Apr 2008 - 5:42 pm | नारदाचार्य

पेटती आहे आणि दुसरी तिच्यावरूनच पेटवू म्हणता? चेन स्मोकिंग इज व्हेरी इन्जुरिअस टू हेल्थ! पण कोडं सुटलं असेल तर ಪರ್ವಾ ಇಲ್ಲೇ!!!

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 5:57 pm | वेदश्री

>पेटती आहे आणि दुसरी तिच्यावरूनच पेटवू म्हणता?

नाई हो !

> चेन स्मोकिंग इज व्हेरी इन्जुरिअस टू हेल्थ!

गुड गुड.. माहितेय म्हणायचं. छान. ये बहोत आवड्या...

> पण कोडं सुटलं असेल तर

नाही सुटलंय ना पण अजून कोडं..

>ಪರ್ವಾ ಇಲ್ಲೇ!!!

=)) गडबडा लोळायचीच पाळी आली माझ्यावर हसूनहसून. लॅप्टॉपवर मोठ्याने लावलेल्या गाण्याच्या आवाजाहून जास्त आवाजात माझे गडगडाटी हसणे ऐकून खालच्या मजल्यावर राहणार्‍या काकू धावत येऊन 'काय गं काय झालं?' विचारायला आल्या.

नारदाचार्य's picture

27 Apr 2008 - 6:06 pm | नारदाचार्य

कोडं सुटलेलं नाहीच. लिपी बदलून तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न केला, तोही फसलेला दिसतोय.

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 6:13 pm | वेदश्री

>लिपी बदलून तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न केला, तोही फसलेला दिसतोय.
ही लिपी आंतरजालावर लिहिण्यासाठी कुठची सोय वापरता तुम्ही? पब्लिकला पिडण्याची नामी युक्ती सुचतेय मला आता. :-)

तात्या विंचू's picture

28 Apr 2008 - 4:09 pm | तात्या विंचू

बीडी (सिगारेट) जलायले जिगर से पिया...
जिगरमे बडी आग है....

-तो मी नव्हेच ~X( :D :)) <:P B) <):) :O)

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 4:23 pm | वेदश्री

:)).. बरोबरे !

देवदत्त's picture

28 Apr 2008 - 8:29 pm | देवदत्त

काल उत्तर देणार तेवढ्यात वीज गेली. (भारनियमन आणखी काय?)
मग राहून गेले :(

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 4:52 pm | वेदश्री

नेकी और पूछ पूछ?!

नारदाचार्य's picture

27 Apr 2008 - 4:59 pm | नारदाचार्य

आपला तर पास!

त्या सिगरेटी घेउन क्याच क्याच खेळ्णे सुरु करा........
का?
अहो "क्याचेस विन म्याचेस" न्हाइ का?
मग ह्या "म्याचेस" (मर्‍हाटी मधली "माचिस" रे भौ.) घेउन पेटवा खुशाल हवे ते हवे तेवढे!

नाही पटत म्हण्ताय?
मग हा घ्य आणखी एक जालिम उपाय....
समुद्रतील पाणि घेउन थेम्ब थेम्ब ओतणे चालु करा.(नावे बाहेर बरं का, नाहीए तर सिगरेट पेत्वाय्ला जाल आणि नाव (आणि स्वतः ला) बुडवुन याल!)
म्हण्जे पाण्याचा होइल आवाज "टिप टिप" ............

"टिप टिप बरसा पानी..
पानी ने अगन लगाइ!!" :-) :-)

एवढा हेड्याक पुरे नाही म्हणताय? मग हे घ्या शेवटचे:-

एक सिगरेट्ची दुसरि समोर स्तुति करा.....
दुसरी सिगरेट "पहली सिगारेट पे जलने लगेगी......."

आता ह्ये सर्व वाचुन आपल्या डोक्याचे भजे झाल्यास लिहिणारे आम्ही जबाब्दार नसुन वाचनारे तुम्हि जबाब्दार आहात्.तरिहि समाधान होत नसल्यास आपल्या डोक्याचे भजे आम्हास पाठ्वुन देणे.
भजे ही आमची फेवरिट डिश हाये.(जाता जाता आन्खी येक पी जे मारावा म्हटला..)

बाकी, प्रशांत भौ आनि इनोबा म्हणे ह्याची उत्तरे अचुक आहेत.

छोटी टिंगी भौ अक्शी सोर्रि तुम्हासनि.
नाव बघुन आपल्याला काय गावलाच न्हाय्,पर आता ठिविन म्हन्तोय ध्यानात.

येक विन्ती सर्वास्नि:-
पी के च्या शब्दोद्यानात "व्याकरणासारखी आणि शुद्धलेखनासारखी फडतुस एरंडेल शोधु नये."

आपलाच,
पी के चा निस्सिम भक्त,
(जनतेची मागणी असल्यास सर्व उत्तरे प्रकशित करण्यास तयार असलेला)
साठ्यांचा (नाठाळ)कार्टा ऋषिकेश.

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 6:20 pm | वेदश्री

अहो साहेब, डायरेक्ट उत्तरे नको. जरा डोके ठिकाणावर आणायला पाहिजे आहे त्यामुळे वाईच हिंट द्याचं बघा की..

एक आटपाट नगर होतं.त्यात होती एक नदि.

नदिवर व्हता येक पूल्.पुलावर व्ह्त्या गावातल्या छान छान पोरी.

त्या सगळ्या च्या सग्ळ्या येकाच पोरासाठी वेड्यापिश्या होत्या.

आता बोला...

त्या पोराचे नाव काय?
(नुसतं त्या छान छान पोरिंकडे पाहण्यापेक्षा)त्या पोरी कशावर उभ्या हायेत ह्ये बघा की राव......

GANESH चा ANESH कोणामूळं बनतो?कसा?

मी नावं मर्‍हाटीत न लिवता विन्ग्रजी स्पेलिंग कहुन लिवला असेल, त्ये बघा.
म्हन्जे त्यांच्या स्पेलिंग मधी असला कुठला फरक हाये?

"कांदा " चा विरुद्धर्थी "लोणचे".
कसा काय?
"कांदा " आणि "लोणचे". ह्यांच्या इन्ग्ल्लिश नावांचा विचार करावा.

(रामायणातील) सुग्रीव आणि वाली ह्यांनी एकत्र येउन फिल्म प्रोडक्शन कम्पनी सुरु केलि तर
त्याला काय नाव द्याल?
सौग्रीव आणि वाली हे दोघे कोन होते? ह्याचा विचार करा.
त्यांचे दोन शब्दात वर्णन काय कराल?

पी के म्हण्जे डोक्याचा व्यायाम आहे असे मानणारा,
साठ्यांचा नाठाळ कार्टा.

नारदाचार्य's picture

27 Apr 2008 - 6:40 pm | नारदाचार्य

एक तरी आलं बहुदा.

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 8:04 pm | वेदश्री

अम्ह्म.. काही झेपेना बॉ अजुनही. देऊन टाका झालं उत्तरं..

मन's picture

27 Apr 2008 - 9:05 pm | मन

एक आटपाट नगर होतं.त्यात होती एक नदि.
नदिवर व्हता येक पूल्.पुलावर व्ह्त्या गावातल्या छान छान पोरी.
त्या सगळ्या च्या सग्ळ्या येकाच पोरासाठी वेड्यापिश्या होत्या.
आता बोला...

पूल्=ब्रिज ,bridge
त्या पोराचे नाव काय?
(नुसतं त्या छान छान पोरिंकडे पाहण्यापेक्षा)त्या पोरी कशावर उभ्या हायेत ह्ये बघा की राव......
आठवा घई सयेबाचा येक फ्लोप सिनुमा........
"जो है अल्बेला म्रुग नयनो वाला....
जिस्की दिवानि है ब्रिज की हर बाला...
वोह किस्ना है ...वोह किसना है.."

GANESH चा ANESH कोणामूळं बनतो?कसा?
आपला गायक के के महितिये?
कैलाश खेर हो...
त्यो म्हन्तो
"तेरे नाम से G लुं ..
तेरे नाम पे मर जावुं" !!

"कांदा " चा विरुद्धर्थी "लोणचे".
लोणचे= PICKLE म्हंजे पी-कल
कांदा म्हन्जे "प्याज " ="पिआज"=पी आज ("पी कल नही,आज हि पी.")

(रामायणातील) सुग्रीव आणि वाली ह्यांनी एकत्र येउन फिल्म प्रोडक्शन कम्पनी सुरु केलि तर
त्याला काय नाव द्याल?
सौग्रीव आणि वाली हे दोघे कोन होते? ह्याचा विचार करा.
वानर ब्रदर्स ह्ये आधिच आलं हाये बरुबर उत्तर वरती.(नारदाचार्यांकडुन.)
अवांतरः-बाकी,ह्या "नारदा"ला चुक म्हणायची काय टाप लगलिये आमच्या सार्ख्या गरिबाची.
चुकुन माकुन ह्यांना म्हणायचो चुक, आणि तेवढं धरुन ह्यानी दिली कळ लावुन तर सगळे देव अन दानव ह्यांच्या पायी बदड्णार नाहित का आम्हाला?

पी के ची खीर सुरेख लागत असताना त्यात
अनावश्यक भाषा बंधनाचे मीठ नसावे असे मानणारा,
साठ्यांचा नाठाळ कार्टा.

नारदाचार्य's picture

27 Apr 2008 - 9:14 pm | नारदाचार्य

म्या नारदाचार्य. नारद नव्हं. त्यो कळ लावायचा. आमास्नी कळ काढता येती. कळ लावता येत न्हाई.

मन's picture

27 Apr 2008 - 9:35 pm | मन

ठीक आहे.....
नारद राव....
म्हणेन आता "नारदाचार्य"....

वेदश्री's picture

27 Apr 2008 - 9:47 pm | वेदश्री

अरे रामा !!!!!

किस्नावाला पीके एकदम आवडला.
पीकल लक्षात आले होते.. पण मी ओनिअनशी संबंध लावत होते. :( नॉट बॅड..
गणेशवाला आणि सुग्रीव/वालीचा ओकेओके वाटला. असो. मजा आली.

पुढचा एपिसोड कधी आता?

प्रशांतकवळे's picture

27 Apr 2008 - 7:02 pm | प्रशांतकवळे

एका तळ्यात १० हत्ती पोहत असतात. खाली एक पाणबुडा आहे, त्याला ३६च पाय दिसतात. तो वर येउन बघतो तर हत्ती १०. हे कसे काय?

स्वाती दिनेश's picture

27 Apr 2008 - 7:16 pm | स्वाती दिनेश

एक हत्ती बॅक स्ट्रोकने पोहत असतो..

प्रशांतकवळे's picture

27 Apr 2008 - 7:24 pm | प्रशांतकवळे

अगदी बरोबर!

प्रशांत

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Apr 2008 - 9:34 pm | ब्रिटिश टिंग्या

हा सही होता :)

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 11:34 am | वेदश्री

यहां इतना सन्नाटा क्यौं है भै?

चेतन's picture

28 Apr 2008 - 6:00 pm | चेतन

""

ओळखा पाहू

हे कोणाचं घर आहे

चेतन

मनस्वी's picture

28 Apr 2008 - 6:02 pm | मनस्वी

कसलं सोप्पय!

चेतन's picture

28 Apr 2008 - 6:05 pm | चेतन

बरोबर आहे पणं कसं...?

चेतन's picture

28 Apr 2008 - 6:09 pm | चेतन

BRUCE LEE was a great man

But after his sister gave birth to a baby he became an ordinary man...

का ...?

मनस्वी's picture

28 Apr 2008 - 6:13 pm | मनस्वी

मामु-ली

चेतन's picture

28 Apr 2008 - 6:17 pm | चेतन

Why are Indian husbands called "MADE OF SILVER"

And

Why are American husbands called "MADE OF GOLD"

चेतन's picture

28 Apr 2008 - 6:20 pm | चेतन

one day a man calls his wife from his IDEA mobile his call gets cross connected to some other lady.They still keep on talking..they start liking each other..and finally they get married.

what MORAL do u get???

भाग्यश्री's picture

29 Apr 2008 - 1:57 am | भाग्यश्री

idea can change your life(wife?)

चेतन's picture

28 Apr 2008 - 6:21 pm | चेतन

whats difference between a man jumping from 1st floor and man jumping from 10th floor?

१ ल्या मजल्यावरुन पडलं कोणी तर आवाज होतो:-
धप्..आ

१०व्या मजल्यावरुन पडलं कोणी तर आवाज होतो:-
आ ............................................धप.