सिंगलौटिंग द मेल्स .. व्हाट द फ$

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
16 Dec 2010 - 11:31 am
गाभा: 

णमस्कार्स लोक्स ,

तसा आम्ही आमच्या बोळे क्लबात बर्‍याच विधायक,सामाजिक , भौगोलिक , अंतराष्ट्रिय , आर्थिक , वैद्यकिय , अभियांत्रिकी आणि इतर अनेक गोष्टींवर रात्ररात्रभर चर्चा आटवतो . काल चर्चेचा सुर लांबला तो पुरुषांना सिंगल आउट करण्याच्या प्रकरणावरुन. दोस्तांनो .. तुम्हाला तर माहित आहे , प्रेमभावना हा हार्मोन्स चा लादेन आहे . आणि ती इस्त्री-पुरुष दोघांनाही निसर्गाने समान दिलेली आहे. आय मीन दोघांच्या इंजिनाचे गियर - कॉम्बीनेशन वेगळे असतील आणि ते वेगवेगळ्या आर.पी.एम वर वेग॑वेगळी हॉर्सपावर देखिल निर्माण करत असतील , बट यु णो , दे बोथ आर बिल्ड फॉर स्पीड :) (बाऊंसर जातंय का ? #इन्क्लुड <बोळेक्लब या.एच> )

असो . सांगण्याचा मुद्दा असा , की ह्या प्रेमात जेंव्हा पुरुष इस्त्रिकडे प्रेमयाचना करतो तेंव्हा त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा जेंव्हा इस्त्री पुरुषाकडे याचना करते त्यापेक्षा किती वेगळा असतो नाही ? दर वेळी सॉफ्ट कॉर्णर कोणाला मिळतो ह्यावर भाष्य करण्याची गरज भासत नाही. ज्युनियर कॉलेजात असताना आमच्या वर्गातल्या झंप्याने चिंगीला प्रपोज केलं . चिंगी तशी सर्वसाधारण. पण तरीही चिंगीने नकार न देता झंप्याच्या श्रीमुखात एक भडकाऊनच दिली नाही तर तिच्या सुमो भावांना घेऊन येऊन झंप्याची पुर्ण वाट लावली. झंप्या ने कधीही चिंगी बद्दल घाणेरड्या कमेंट्स मारल्या नव्हत्या. झंप्या टपोरी कॅटॅगरितलाही नव्हता. पण चिंगीला थोडा भाव काय मिळाला ती तर माधुरी दिक्षित झाली :) पुढच्याच वर्षी ह्याच चिंगी ने वश्या ला प्रपोज केलं . आता वश्या पडला टॉपर पोरगा. त्याला असल्या भाणगडीत इंटरेस्ट नाही. वश्यानं फक्त नकार कळवुन प्रकरण मिटवतं घेतलं. मॅटर तिथेच फिनिश झाला.

कधीकाळी डिडि१ कृपेमुळे आम्हाला ॐ नमः शिवाय ह्या मालिकेथ्रु पौराणिक शिक्षण मिळाले. त्याच्या दाखल्यांअनुसार महिशासुर नामक असुर ( राक्षस म्हणने म्हणजे जातिय खिल्ली उडवणे आहे ) दुर्गा देवीच्या प्रेमात पडला . त्याला दुर्गेबरोबर लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट झालं होतं. टिव्ही वर दाखवल्या प्रमाणे दुर्गा एका झाडाखाली पेपर वाचत बसली असताना महिषासुर तिकडुन रथाची रेस (एकटाच) खेळता खेळता पास झाला. अचानक वॉयलिन चे सुर वाजु लागले "हम को हमी से चुरा लो .. " का काय ते .. गळालेल्या पानांवरुन हवेची झुळुक वाहिल्याने ते अगदी रोमँटिकली हवेत उडाले आणि तशीच महिशासुराची विकेट गेली. त्याने अस्सल खानदानी पण दाखवत दुर्गा देवीस लग्नाची मागणी घातली. ( कृपया लक्ष द्या , लग्नाची रितसर मागणी घातली ) पण दुर्गा देवीने नकार दिला. पण ह्या नकारामुळे महिशासुर खचुन गेला नाही. तो एव्हरी विकेंड लाँग ड्राइव्ह ला जाताना दुर्गा देवीला पिंग करुन जाई. ( कृपया लक्षात घ्या , पुराणात कुठेही महिशासुराने दुर्गेची छेड काढल्याचा , तिच्यावर कमेंट्स पास केल्याचा अथवा तिच्यासाठी शंख फुंकल्याचा किंवा शिट्टी मारल्याचा पुरावा नाही ) उलट देवी त्याला नेहमी वॉर्निंग द्यायची " दुर चला जा .. मेरा खयाल छोड दे हे दुष्ट पापी .. तु जल कर भस्म हो जायेगा " येथे म्हैशासुराला मुद्दाम आव्हान देऊन प्रोव्होक करण्यात आलं. पण शेवटी त्याचा ही संयम संपला आणि त्याने सांगुन ऐकत नाही म्हणुन बलप्रयोग केला , आणि त्याचा खेळ संपला. येथे देवीनेच नव्हे तर समाजानेही महिषासुराला व्हिलन घोषित केले हे इथे खास नमुद करावेसे वाटते.
आता दुसरा किस्सा. संत मिराबाई आपल्याला माहितीच असतील. त्या पडल्या श्रीकृष्णाच्या प्रेमात . मग त्याच्यावर अभंग वगैरे करणे , शांततेच्या मार्गाने कृष्णप्राप्ती करन्यासाठी मिराबाई आजन्म प्रयत्नशील राहिल्या. ह्या केस मधे कृष्णाने मिरेने आपल्यावर प्रेम केल्याबद्दल तिला धमकावन्याचे दाखले कुठे ऐकिवात नाहीत. किंवा "दुर चली जा , मेरा खयाल छोड दे .. तु भस्म हो जायेगी हे पापी मिरा बाई .. " अशा गर्जनाही कृष्णाने केलेल्या नाहीत . कृष्णाने मिरेचा वध ही केला नाही. लोकांनीही तिला व्हिलन ऐवजी संत च ठरवले.

एकंदरीत मला हा पुरुषांना सिंगल आउट करण्याचा प्रकार वाटतो , जो मला खुप खटकत आहे. माझ्या ऑफिसातली झोप उडाली आहे . माझं डिनर नंतरच्या खाण्यात लक्ष लागत नाही. मला पोट भरल्यानंतर अण्ण पाणी गोड लागत नाही. कृपया आपले विचार प्रकट करावे.

क्षमस्व : लेखात आलेले दुर्गादेवीचे उल्लेख केवळ उदाहरणापुरते आहेत. देवी-देवतांची-संतांची कुचेष्टा हा त्यामागचा बिल्कुल हेतु नाही. तेंव्हा दुर्गादेवी,मिराबाई आणि महिषासुराच्या समर्थकांना कळकळीचे आवाहन आहे की त्यांनी संयमाने काम घ्यावे. त्यांची विनम्र पणे तरीसुद्धा क्षमा मागत आहे.

-( टोटली आउट ) टारझन खटके

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

16 Dec 2010 - 11:47 am | रन्गराव

ही लिंक पहा, पुरूष प्रधान संस्कृतीच्या नावाखाली पुरूषांवरच कसे अन्याय होतात हे आमच्या संत्यान छान मांडले आहे. पहा इथ.

http://www.youtube.com/watch?v=xEZqd8ddO0M

आज जग खुप पुढे गेले आहे. दोनभिन्न लिंगी व्यक्ती मधील मैत्री आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. नवीन जमान्यात अमेरिका सारख्या विकसित देश्यात समलिंगी मैत्री चालु आहे.त्यामुळे पुरुषानी एकमेकाबरोबर घट्ट मैत्री करुन स्त्री वर्चस्वाला धक्का द्यावा असे मला वाटते.
तसेच मला तुमच्या मालकाबद्दल देखिल आश्चर्य वाटते.कामधाम न करणार्‍या नुसत्या विचारजंताला कामावर ठेवुन त्याला कसे काय परवडते?

आपल्या भावना मी समजु शकतो.

-(फिनिक्स ची उम्मेद असलेला) टार्‍या.

विजुभाऊ's picture

16 Dec 2010 - 12:24 pm | विजुभाऊ

अरे व्वा.....
युयुत्सु काकांना एक णवा मुडदा अर्र.... ( कॅप्स लॉक प्रेस झाले वाटते) मुद्दा मिळाला.
आणखी काही उदाहरणे:
शूर्पणखेने लक्ष्मणाला प्रपोज केले म्हनून लक्ष्मणाने तीचे फक्त नाक कापले. बाकी काय नाय केले
रावणाने सीतेला अगोदरच प्रपोज केले होते. त्याने शूर्पणखेच्या नाक कान कापल्याचा बदला म्हणून सीतेला फक्त कीडनॅप केले. रामाने मारूतीभाय ला पाठवून त्याचे गाव च्या गाव पेटवून दिले.
( लक्षात घ्या रावणाने सीतेला टच्च सुदीक केल्ये नव्हते. कीडनॅप करताना झाले असेल तेवढेच . बाकी रावण झंटल्मॅण हुता)

एरवी गाडी पम्चर झाली की रस्त्यावरची माणसे मदत करतात्.पण दशरथाचा रथ एकदा पंचर झाला त्यावेळेस कैकयी ने त्याला मदत केली आणि त्याच्या कडून सौताच्या मुलासाठी आख्खे राज्य मागून घेतले.

भस्मासूर तसा कोणाच्या बाला सुदीक ऐकत नव्हता. सगळ्याना यकटाच भारी असायचा. शेवटी इश्णू ने बाइचे रूप घेतले तेंव्हा भस्मासुर एका बाई पाई आडवा झाला.

अगदी नवीन उदाहरणः अंतुले नामक सरदाराला दिल्लीने अभय दिले होते. वसंतदादा वगैरेनी त्या सरदाराचा पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडले. अंतुल्यानी वसंतदादांच्या पत्नी शालीनीताई पाटील नामक महिलेचा एकदा अनादर केला. अंतुले सरदार त्यांच्या सरकारासहीत बाराच्या भावात गेले.

शूर्पणखेने लक्ष्मणाला प्रपोज केले म्हनून लक्ष्मणाने तीचे फक्त नाक कापले.

लक्ष्मणाला "३ इडियट्स ची तिकीटे मिळाली नव्हती , काही अज्ञानामुळे त्याने असे केले असावे . चु.भु.द्या. घ्य.

अवलिया's picture

16 Dec 2010 - 12:35 pm | अवलिया

काही जणांचे डॉक्याचे क्येस गायब होतात.. ते का वगळले?

केस गायब होण्याचे बरेच फायदे आहेत .. जसे छोटा ,परका , उपरा ण वाटणे :) जाणकार णाणांना ठाऊक असेलंच :)

उत्तर दिले असते.. पण प्रतिसाद आक्षेपार्ह्य होण्याची भिती आहे.

सुहास..'s picture

16 Dec 2010 - 12:31 pm | सुहास..

अतिशय पिशवी ..आपलं हे...पाशवी लिखाण...

सविस्तर पंचनामा लवकरच....

सिंगलऔट , डेटेड बट नॉट ऑउट-डेटेड

शिल्पा ब's picture

16 Dec 2010 - 12:33 pm | शिल्पा ब

अरारा....पब्लिक काय वंगाळ वंगाळ बोलू रहिलं राव !! आन काह्याला पैजे स्वाफ्ट क्वार्नर? हाय ते बी जायाचं...

टारझन's picture

16 Dec 2010 - 12:36 pm | टारझन

शिल्पा मावशी , संयम ... ही तुमच्या सारख्या आदरणिय महिलांच्या संयमाची परिक्षा पहाणारी घडी आहे :) कृपया पेटु णका :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Dec 2010 - 12:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>शिल्पा मावशी , संयम ...
Oxymoron ला मराठीत काय म्हणतात हे कुणी सांगू शकेल काय? ;-)

शिल्पा ब's picture

16 Dec 2010 - 1:25 pm | शिल्पा ब

तुम्हाला खणखणीत प्रतिसाद दिलेला नाही यावरूनच आमचा संयम प्रतीत होतो...

oxymoron ला मराठीत विरोधाभास म्हणतात...चला, मराठी संस्थळावर येऊन थोडेतरी मराठी तुम्हाला शिकायला मिळते हेही नसे थोडके.. ;)

तुम्हाला खणखणीत प्रतिसाद दिलेला नाही यावरूनच आमचा संयम प्रतीत होतो...

ह्याला व्यक्तिगत जाणे म्हणतात :) संयमाच्या व्याख्येचा पुणर्पाठ करावा :) आमच्या लेखात आम्ही कोणालाही वैयक्तिक झोडपलेले दिसत नाही :) तुमच्या संयमाला उगाच ओढुन ताणुन ह्यात बसवु नये :)

बाकी खणखणित प्रतिसादांची आम्ही वाटंच पहात असतो :) तेवढाच विरंगुळा

चला, मराठी संस्थळावर येऊन थोडेतरी मराठी तुम्हाला शिकायला मिळते हेही नसे थोडके.

तर तर :) :) :) आम्हाला किमान शिकायला तरी मिळतं हे खरंच फार खुप आहे . बाकी कमनशिबी ;)

शिल्पा ब's picture

16 Dec 2010 - 11:25 pm | शिल्पा ब

अरे वा!! वकीलपत्र मिळाले का शेवटी...छान.. छान.

बापरे !! कसला बेक्कार सणसणीत प्रतिसाद होता .. घाबरलो मी :)

- सुल भ

शिल्पा ब's picture

17 Dec 2010 - 12:15 am | शिल्पा ब

वर लिहिल्याप्रमाणे आम्ही संयमित प्रतिक्रिया दिलेली आहे...तुम्ही इतके घाबरला असाल तर एखादा कराटे क्लास करा :)

कटकन

च्यायलेंज ? च्यायलेंज ? ? ? आता द्याच तुम्ही सणसणित प्रतिक्रीया ... बोलबच्चन नका टाकु :)
बाकी कराटे बिरुटे बघुन घेऊ ... :)

- बच्च न

टारु , महिषा सुराला पण असे प्रोव्होक केले होते दुर्गेने... पुढे काय झाले ते तुच लिहले आहे... :D

आत्मशून्य's picture

18 Dec 2010 - 6:36 pm | आत्मशून्य

जो शीशेसे पत्थर को तोडना जानता हूं

फटकन

माझी सहानुभुती आहे तुम्हाला!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Dec 2010 - 10:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"टुटुत्सु" अशी सही राहिली का?

नगरीनिरंजन's picture

16 Dec 2010 - 12:47 pm | नगरीनिरंजन

कर्णांगुली न्यायाने अत्यानंदप्राप्ती असूनही अदंतसर्पकुंभ योगामुळे व असाध्यकटपात्रदल कल्पनेमुळे आलेल्या भयातून असा अतिप्रत्याचार केला जात असावा असे आमचे मत आहे.

कॄपया सोदाहरण स्पष्ट करावे. :) म्हणजे हृदयपरिवर्तण होण्यास मदत होईल :)
नुसते दिलखुलास प्रतिसाद देऊन $$ काहि होत नाही :)

-आगरीहरिजन

नगरीनिरंजन's picture

16 Dec 2010 - 1:06 pm | नगरीनिरंजन

सोदाहरण आणि सचित्र स्पष्ट केल्यास हृदयपरिवर्तन होईल की नाही हे अज्ञात असले तरी धागानिवर्तन होईल हे तार्किकदृष्ट्या अनिवार्य वाटते. :-)
तस्मात आहे त्या व आहे तितक्या दिलखुलास प्रतिसादापेक्षा जास्त अनावरण करणे शक्य नाही. :-)
$$ होते की नाही याबद्दल आम्हाला किंचितही पर्वा नाही याची नोंद घ्यावी.
क्षमस्व.

- बारखण

अगागागागा...

कर्णांगुलीचा तो भलताच फेमस जोक आठवला ! जियो !!

ह्या प्रेमात जेंव्हा पुरुष इस्त्रिकडे प्रेमयाचना करतो तेंव्हा त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा जेंव्हा इस्त्री पुरुषाकडे याचना करते त्यापेक्षा किती वेगळा असतो नाही ?

याला कारण असे असू शकते की,
पुरुष स्त्रिकडे प्रेमयाचना करतो त्यानंतर समजा त्याला नकार मिळाला, तर तो ठीक आहे बॉ म्हणतो आणि विषय तेथेच संपतो असे होत नाही बर्‍याचदा. त्यानंतरही प्रयत्न करत रहाणे(हा ही त्या स्त्री ला १ मानसिक त्रासच असतो), इगो दुखावला जाणे, यातून त्या स्त्री ला त्रास देणे, पाठलाग करणे असे प्रकार चालू होतात आणि चालू रहातात. यातून काही वाईट प्रकार/घटना घडण्याचा संभव असतो. आणि बर्‍याचदा तसे होते.

याउलट,
स्त्री पुरुषाकडे याचना करते त्यानंतर समजा तिला नकार मिळाला, तर मला नाही वाटत की कोणतीही स्त्री वरीलपैकी काही त्या पुरुषाच्या बाबतीत करत असेल. उलट तिला मिळालेल्या नकाराचा परिणाम तिच्यावरच जास्त नकारात्मक होत असावा.

तस्मात वरवर हा प्रश्न जितका साधा वाटतो तितका तो साधा नाही, हे लक्षात घ्यावे.

-----------------------------------------------------------------------------

>>>ज्युनियर कॉलेजात असताना आमच्या वर्गातल्या झंप्याने चिंगीला प्रपोज केलं . चिंगी तशी सर्वसाधरण.
...
पण चिंगीला थोडा भाव काय मिळाला ती तर माधुरी दिक्षित झाली.
>>

प्रपोज करणारे सर्वजण काही मदनाचे पुतळे नसतात.

लेखाच्या हेडिंग वरुनंच लेख अतिशयोक्तीने भरलेला आणि तद्दन भास णिर्माण करणारा आहे ह्याची कल्पणा सुज्ञ वाचकांना यायला हवी होती.
आमच्या धाग्यावर लोकांनी उगाच शिरियस होऊ णये . लोकांन्ना षिरियस करने आमचा प्रांत नाही ;)
बाकी बर्‍याच रोचक प्रतिक्रीयांची अपेक्षा वर "काही प्रमाणात " सार्थ झाली .. खॅखॅखॅ

Pearl's picture

16 Dec 2010 - 2:00 pm | Pearl

मग चालू दे :-)

तुमच्या खेळीमेळीच्या चर्चेत व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व.

कदाचित आम्ही अजून मि.पा. चे सराईत वाचक नाही झालो आहोत ;-)

Pearl's picture

16 Dec 2010 - 2:03 pm | Pearl

(प्रतिक्रिया रिपीट झाली आहे. डिलीट करता येते का?)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

16 Dec 2010 - 2:24 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

:)
:)

लिखान जबरी केलेय की भावा ...

हाश्यसम्राट मध्ये एका भागात कोल्हापुरातला शिंदेने लय भारी बोलला आहे असा पुरुषमुक्ती साठी ..
ऐका मिळाल्यावर नक्की ..
---

बाकी ..
पुरुष स्त्री च्या प्रेमात पडला तर तो टुकार असतो ...
स्त्री पुरुषाच्या प्रेमात पडली की ती हुशार असते ...

पुरुषाने स्त्रीचा अपमान केला तर तो अन्याय असतो
स्त्री ने पुरुषाचा अपमान केला की तो समज असतो ...

पुरुष स्री कडे पाहुन हसला की दात विचकत असतो ..
स्त्री पुरुषाकडे पाहुन हसली की ती दाद देत असते ...

पुरुषाने ग्रुप मध्ये बोलताना तो चाटर बॉक्स असतो
स्त्री ग्रूप मध्ये बोलताना ती बोलकी भावली असते ..

कुठल्यापण पुरुषाने गाडी जोरात चालवली की तो माज असतो
स्त्री ने गाडि जोरात चालवली तरी ती शान असते ..

पुरुषाने कपडे कमी घातले की तो जोकर वाटतो
स्त्री ने कपदे कमी घातले की ती हिरॉइन असते ..
भले तेच तेच कपडे घातले तरी तशीच फॅशन असते बाबा ..

........

भले तेच तेच कपडे घातले तरी तशीच फॅशन असते बाबा ..

हा हा हा .. हा पंच मस्त होता ..

मराठी भाषेने सुद्धा पुरुषावर अन्याय केला आहे
सगळे चांगले शब्द स्त्रीलिंगी आहेत आणि सगळे वैट्ट शब्द पिल्लिंगी आहेत
उदा : ती माया , ती ममता , ती टापटीप , ती ठेवण , ती मिशी , ती हुशारी
तो राग , तो घोटाळा , तो आळस , तो गाढवपणा

शिल्पा ब's picture

21 Dec 2010 - 1:55 am | शिल्पा ब

पिल्लिंगी म्हंजे काय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2013 - 3:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

भले तेच तेच कपडे घातले तरी तशीच फॅशन असते बाबा .. एवढच नाही... तर

भलतेच तेच कपडे घातले तरी तशीच फॅशन असते बाबा ..

हे ही खरं आहे ;)

टारझण भाई तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है!!!!!
सिंगलौटिंग बन्द्द करो!!!!!

ए टार्‍या, कधी रे मेल्या तुला कोणी सिंगल आउट केलय?
बाकि लेख वाचताना हसत होते हे सांगणे न लगे.
कसं तुला लिहिणं जमतं ते एक महिषासूरच जाणे!

गणेशा's picture

16 Dec 2010 - 9:29 pm | गणेशा

तुमचे म्हणने बरोबर आहे..
टारझनला येव्हडे लिहीणं कस जमतं ते फक्त टारझनच जाणे ...

नितिन थत्ते's picture

16 Dec 2010 - 10:00 pm | नितिन थत्ते

अशेच म्हणतो.

प्राजु's picture

16 Dec 2010 - 11:45 pm | प्राजु

टार्‍या... बरा होतास की रे!
१८५६ सालातल्या ५६ मजली बिल्डिंग च्या टेरेस वरून पडला आहेस की काय??
;)
तुझा लेख आणि तू! अहो रूपम अहो ध्वनीम!!

टारझन's picture

16 Dec 2010 - 11:58 pm | टारझन

१८५६ सालातल्या ५६ मजली बिल्डिंग च्या टेरेस वरून पडला आहेस की काय??

येथे "गुडघ्यावर" हा शब्द राहिला आहे . बाकी १८५६ साली ५६ मजल्यांचा एफ.एस.आय. कोणात्या चव्हाणांनी पास केला ,ही रोचक माहिती आहे . कॄपया ह्यावर प्राजु ने प्रकाश टाकावा. (कवितारुपी प्रकाश टाकला तरी चालेल )

@र्‍एवती : इट्स णॉट अबाऊट मी ,,, इट्स अबाऊट व्होल पुरुष ... दे आर अल्वेज सिण्गल्ड आउट बाय समाज ( णॉट बाय बायका )

बाकी हा काथ्याकुट आहे रे लोकांनो ललित लेख नव्हे .. प्रिय वाचक ह्यातही "छाण लिहीलंय " "खराब लिहीलंय "करताहेत =)) =))

रेवती's picture

17 Dec 2010 - 12:17 am | रेवती

ए बाबा तुझं ते विंग्रजी, त्यातून ण म्हणजे काही समजत नाही.
हा काथ्याकूटच आहे का नक्की?
मला तर नृत्य, औषधोपचार , प्रवास असं सगळच दिसतय.

टारझन's picture

17 Dec 2010 - 12:35 am | टारझन

ए बाबा तुझं ते विंग्रजी, त्यातून ण म्हणजे काही समजत नाही.

अगं .. मला फक्त एवढं सांगायचंय ... की पुरुषांना सिंगल आउट केलंत ते समाजाने ... म्हैलांनी नव्हे. म्हैला दिल पे णा ले :) आणि जो ले .. वो सणसणित प्रतिक्रीया दे :)

हा काथ्याकूटच आहे का नक्की? मला तर नृत्य, औषधोपचार , प्रवास असं सगळच दिसतय.

कोण बोल्या के ण्रुत्य , औषधोपचार आणि प्रवासात आपण काथ्याकुट करु शकत नाही म्हणुन :)

मला सद्भावना, आहार विहार.. हे सुद्धा दिसतंय! ;)

पिवळा डांबिस's picture

17 Dec 2010 - 1:07 am | पिवळा डांबिस

टारझनराव,
आपले काथ्यनर्तन पाहून आणंद जहाला. बाकी आम्ही काय बोलणार. आपलं या विषयावरचं आलोकन सखोल आहे. आपण उदाहरणं चपखल दिलेली आहेत. आपल्या अंतःकरणातून "सिंगल आऊट" केलेल्या पुरुषांविषयीचा कळवळा घळघळा वहातो आहे!! प्रत्यक्ष सरस्वतीला वीणा टाकून देऊन ताशा वाजवावासा वाटेल अशी भाषा आहे....
आपली तर टोपी निघाली (मराठीत "हॅटस ऑफ" म्हंत्यात तेला!!)
:)
आता कण्हून-कुंथून काथ्या कुटायचाच असेल तर हा एक नगण्य मुद्दा..
समाजात पुरुष आणि स्त्रिया हे दोनच प्रमुख घटक असतांना (तिसर्‍या संप्रदायाचे अनुयायी अत्यल्प परसेंटेजमधे असतील असं मानलं तर) एकटे पुरुषच कसे सिंगल आऊट केले गेले?
नाय म्हणजे जर सगळे पुरुष "सिंगल आऊट" केले गेले तर सगळ्या स्त्रिया आपसूकच "सिंगल इन" होणार नाहीत का? :)
(मला माहिती आहे की साल्या तोच तुझा ही & हि डाव आहे!!)
:)
असो. आमच्या दुर्गेला आम्ही 'पिंग" केल्यानंतर तिने "दुर चला जा .. मेरा खयाल छोड दे हे दुष्ट पापी .. तु जल कर भस्म हो जायेगा" वगैरे डायव्लॉक न बोलल्याबद्दल आम्ही तिचे अनंत आभारी आहोत!!!
तुमच्या जेनबाय काय बोलल्या व्हत्या? का अजून 'पिंग" केलं न्हाय? ;)

प्रत्यक्ष सरस्वतीला वीणा टाकून देऊन ताशा वाजवावासा वाटेल अशी भाषा आहे....
एवढ्या मोठ्याणे हसतोय की शेजारच्यांच्या घरातले दिवे लागले ( आहो खरंच माझ्या हसण्याचा आवाजा मुळे लागले असणार .. खरंच :) )

नाय म्हणजे जर सगळे पुरुष "सिंगल आऊट" केले गेले तर सगळ्या स्त्रिया आपसूकच "सिंगल इन" होणार नाहीत का?

सगळ्यांबाबत विधाण केलेले नसुन बहुतांशी तसाच दृष्टीकोण असतो असे लेखकास नमुद करावेसे वाटते. प्रेमयाचणा करणार्‍या म्हैलेचा अपमान झाला आहे , तिचा वध झाला आहे किंवा व्हिक्टीम ने तिला बुकलुन काढले आहे , अश्या संदर्भाचं एक जरी उदाहरण आपल्या कडे असल्यास मी माझा काथ्याकुट मागे घेतो ;)

बाकी जेणबाय ला पटवायला लै पापट भाजले होते ... ती ष्टोरी णिवांत कधीतरी .. खाजगीत ;)

- पिवळा बलक

आमच्या ओळखीतील एका काकांनी त्यांच्या भावाच्या मागे लागलेल्या(अर्थात प्रेम याचना करणार्‍या) महिलेस आपल्या अजून एका भावास बरोबर नेऊन खूप दमदाटी केली होती. मारहांण करायची वेळ आली नाही कारण महिला दमदाटी नंतर घाबरली असावी.

वाटाड्या...'s picture

17 Dec 2010 - 1:31 am | वाटाड्या...

खास टार्‍यासाठी...२ ओळी...

बहुतेक जेण गेली म्हायेरी...
आता टार्या आणि पितांबरी...

म्हूण टार्याला प्रश्न पडलाय त्याला शिंगल आउट केला काय जेणणं....

- (रामा गडी) वाट्या...

लेख खूप विनोदी झाला आहे. स्पेशली दुर्गा-महीषासूराचे वर्णन :-D
विनोदाचा भाग सोडता - महीषासूराचे समर्थन पटत नाही.
_______

चिंगीच्या भावांनी झंप्याला सडकून काढले ना? मग यात स्त्रीचा एकटीचा दोष कसा बरे? ते भाऊ स्त्री होते म्हणायचे आहे काय आपल्याला?

टारझन's picture

17 Dec 2010 - 8:36 am | टारझन

http://www.misalpav.com/node/15884#comment-268092
अगं .. मला फक्त एवढं सांगायचंय ... की पुरुषांना सिंगल आउट केलंत ते समाजाने ... म्हैलांनी नव्हे. म्हैला दिल पे णा ले

बाकी आपण काय इस्त्रीद्वेष्टा नाही . आजही आम्ही इस्त्री बनवल्याबद्दल निसर्गाचे आभारी आहोत. एक डोकं खायचा भाग सोडला तर स्त्रीयांपासुन बरेच शिकण्यासारखे असते.
एखाद्या सुंदर पोरीला पाहिलं की कशी सगळी टेंशन पळतात , :) म्हणुन आम्ही स्त्रीद्वेष्टे नसुन स्त्रीपेमी आहोत . एफ.सी.रोड ला किंवा एमजी रोड ला बाईक पार्क करुन चालत चालत खार्‍या शेंगदाण्यांचा आस्वाद घेत पोरी न्याहाळण्यासारखा आनंद दुसरा नाही ;)

बाकी महिशासुराचं समर्थन का करु नये ह्यावर आपण प्रकाश टाकल्यास आवडेल ;) त्याच्या प्रेमाला असा काय * लागला होता ? मिरेचा वध का नाही झाला ह्यावअही थोडं टाका

अरे महीषासूरने सेनापती मग १० सैनिक मग सैनिकांचा ताफा असा दुर्गेवर सोडला. ती नाही म्हणाली ते तो ऐकतच नव्हता.

___

मीरा मात्र मनोमन कृष्णावर प्रेम करत होती. मनोमन. ती सैनिक मागे लावत नव्हती.

असहमत. महिषासुराने सोडलेले सैणिक हे प्रेमापोटीच सोडले होते. त्याने आधी शांततेत देवीला प्रपोज केलं होतं. देवीने भाव खाल्ला हे कोणीच का मान्य करत नाही ? बाकी मिरेकडे सैन्य नव्हतं , जर असतं तर मिरेने कृष्णाच्या डोक्यावर मिर्‍या वाटायला कमी केल्या नसत्या असं मनोमन सांगावसं वाटतं.
महिषासुराला लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट झालेलं असताना त्याच्या भावना कोणीच का समजुन घेतल्या नाहीत ? प्रेमात सगळं माफ असतं हा रुल इथे आबाच्या ढाब्यावर का बसवल्या गेला ?
अर्थात देवादिकांचे सगळे खेळ स्क्रिप्टेड असंत असं चक्क पुराण सांगते. जसे रामाला श्राप मिळणे , हणुमानाला श्राप मिळणे , किंवा आणखिन काही. हे लोक स्वतःला असे श्राप मुद्दाम देऊन घेत. जेणेकरुन भविष्यात एखादी सेटिंग लागेल.

बाकी मिसळपाव वरच्या एक दोघी दुर्गा बणायला तयार असतील तर आम्ही तात्पुरते म्हैषासुर बणायला तयार आहोत . ( पर्‍या ही म्हणत होता . .. मिपावरची कोणीतरी मोहीनी बणायला तयार असेल तर तो भस्मासुर व्हायला तयार आहे . :) काय ठेवलंय साला लाईफ मधे :) ज्युस पिवानु मज्जानी लाईफ )

- आतंकासुर

सविता's picture

21 Dec 2010 - 11:25 am | सविता

वध करूण घ्यायची हौस का आलीये?

बाकी टारझनमर्दिनी कशी अशेल ही उत्सुकता आहे!!!

विजुभाऊ's picture

20 Dec 2010 - 5:20 pm | विजुभाऊ

एफ.सी.रोड ला किंवा एमजी रोड ला बाईक पार्क करुन चालत चालत खार्‍या शेंगदाण्यांचा आस्वाद घेत पोरी न्याहाळण्यासारखा आनंद दुसरा नाही
एक तौलनीक अभ्यास होउन जौद्या टार्झनशेठ

उल्हास's picture

18 Dec 2010 - 10:24 am | उल्हास

सगळीकडेच असे प्रकार चालू आहेत

साधे उदाहरण
एखादा पुरुष गाडीवरुन पड्ला तर त्याच्याकडे कोणी ढुन्कुनही पाहत नाही पण तेच जर कुणी स्त्री गाडीवरुन पडली तर सर्वजण आपापले कामधन्दे सोडून तीला मदत करायला धावतात तीला उठायला मदत करतात. ती जरी म्हणाली मी आता उभी आहे तरी आपुलकीने सांगतात मी अजुन कुठे तुम्हाला उभे केलेय दुसर्‍याने केलेय मी सुध्दा मदत करतो.
खरे की नाही ?

शिल्पा ब's picture

18 Dec 2010 - 1:02 pm | शिल्पा ब

:D :-D :lol:

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2010 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार

टार्‍या तुला एक काय काय सुचेल ना ! धन्य आहेस.

पण च्यायला लेखन वाचताना मला सारखे सारखे महिशसुराच्या जागी तुच दिसत होतास आणि दुर्गेच्या जागी ..... ;)

असो...

लेखन नेहमीप्रमाणेच मस्त.

इंटरनेटस्नेही's picture

18 Dec 2010 - 1:53 pm | इंटरनेटस्नेही

उत्तम लेख! :) पण सहसा स्त्रीयांच्या पाँईट ऑफ व्ह्यु ने कोणतीही बाब पाहिल्यास आपल्याला सिंगल आउट केले जाण्याचा चान्स कमी असतो.

-
(समजुतदार) इंट्या.

स्पा's picture

6 Mar 2013 - 2:45 pm | स्पा

हॅ हॅ

मेलोच

माझं डिनर नंतरच्या खाण्यात लक्ष लागत नाही. मला पोट भरल्यानंतर अण्ण पाणी गोड लागत नाही.

=)) =))

टार्याला बोलवा रे परत

+११११११११११११११११११११११.

जोर्दार *अणुमोदण!!!

* म्हंजे अणुइतके लहाण णव्हे हां कै! अच्रत बव्लतांणी आदीच समजूण घ्यावे.

अग्निकोल्हा's picture

6 Mar 2013 - 3:08 pm | अग्निकोल्हा

कहर.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2013 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा

टार्याला बोलवा रे परत >>> आंमचाही हात वर......... =))

जोशी &#039;ले&#039;'s picture

6 Mar 2013 - 4:31 pm | जोशी 'ले'

++++++
बोलवा परत टारोबांणा

+११११११११११११११११११११११११११११११११
टार्याला बोलवा रे परत

+११११११११११११११११११११११ टू स्पा & बॅटमॅन

तर्री's picture

6 Mar 2013 - 3:37 pm | तर्री

मस्त . धागा वर आला आणि वाचनात आला. पूर्वी वाचायचा राहून गेला.
विधवा स्रीकडे सहानभूतीपूर्वक पाहिले जाते - विधुराकडे "उपाशी" प्राण्यासारखे.

मी-सौरभ's picture

6 Mar 2013 - 7:28 pm | मी-सौरभ

मस्त . धागा वर आला आणि वाचनात आला. पूर्वी वाचायचा राहून गेला.

+१

विधवा स्रीकडे सहानभूतीपूर्वक पाहिले जाते - विधुराकडे "उपाशी" प्राण्यासारखे

तुलना डोक्यावरुन गेली थोड विस्कटून सांगा...

अद्द्या's picture

9 Mar 2013 - 5:51 pm | अद्द्या

बोलवाच . . जर आला तर
"पास्ट टेन्स" मधले लेख आणि प्रतिसाद तरी किती वाचायचे

चिगो's picture

16 Mar 2013 - 11:49 pm | चिगो

काय भन्नाट लिवलंय, टारबा.. प्रतिक्रीयापण लै भारी, विजुभाऊंचीतर जबराटच.. =)) टार्याला परत बोलवायला पाहीजेच..