प्रवास मी एकटीच करते... (गीत)

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
15 Dec 2010 - 5:39 pm

अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरतीमाते
जाणिव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते...

गुलाम जीवन खितपत मळले
नाव माझी धारेत डळमळे
कुठली नाही दिशाच ठावी
गांव कोठले मला न कळले

भाव भावनांचा बाजारी
एकटीच मी दारोदारी
विरक्त जीवन ईश्वर कोठे
भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी

अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरतीमाते
जाणिव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते...

- शब्दमेघ ... (स्त्री.. भावनांचा प्रवास मधुन )

हेल्प: चाल येथे सांगता येत नाहिये , तरीही राग थोडासा "दयाघना" गाण्यात वापरला आहे तसा आहे.
रागाचे काही कळत नाही मला, पण मित्राने बंदिश गाताना तसे सांगितले म्हणुन ..

करुणकविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

15 Dec 2010 - 5:51 pm | प्रकाश१११

अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरतीमाते
जाणिव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते...

छान नि छान लय. आवडली.!!