एक बायको करावी म्हणतोय

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
14 Dec 2010 - 10:06 pm

एक बायको करावी म्हणतोय
सुंदर .. सालस .. सावरी ..
तिचे शब्द असावे तिळगुळ
अन ओठांवरी काळसर तिळ

नाजुक नक्षीदार ...
असावे डोळे पाणीदार
नजर धारदार ..
असावी मराठी बाणेदार

एक बायको करावी म्हणतोय
सुंदर .. सालस .. सावरी ..
भोळ्या या राजाची बाकी
इच्छा नाहि दूसरी ...

----- शब्दमेघ ( १४ डिसेंबर २०१०)

नोट : ऑफिसटाईम संपला आहे ,हणुन एक-दोन कडवी राहिली आहेत .. तरी अपुर्ण का असेना द्यावी म्हंटले कविता .. तेव्हद्याच्या अपुर्ण असलेल्या इच्छेस अर्पण म्हणता येइल ( असेच लिहिले आहे .. मजेने ह.घ्या)

कविता

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

14 Dec 2010 - 10:10 pm | अविनाशकुलकर्णी

काय गणेशा लग्नाचे वेध लागलेले दिसत आहेत....
टाका उडवुन बार......थंडी पण मस्त पडलीय पुण्याला

प्रकाश१११'s picture

15 Dec 2010 - 7:39 am | प्रकाश१११

एक बायको करावी म्हणतोय
सुंदर .. सालस .. सावरी ..
तिचे शब्द असावे तिळगुळ
अन ओठांवरी काळसर तिळ

छान नि सुंदर .मन हे कल्पवृक्षाचे झाड आहे
मागेल ते मिळेल .मागून तर बघा .
खूप आणि मनापासून शुभेच्छा !!

एक बायको करावी म्हणतोय
सुंदर .. सालस .. सावरी ..
तिचे शब्द असावे तिळगुळ
अन ओठांवरी काळसर तिळ

मार डाला... ;)

अब मै समझा तेरे रुखसार पे तील का मतलब
दौलत ए हुस्न पे दरबान बिछा रख्खा है

बिछा नाय हो.. बिठा रख्खा है. ;)

राघव

गांधीवादी's picture

15 Dec 2010 - 8:45 am | गांधीवादी

>>तिचे शब्द असावे तिळगुळ
पहा, पहा, स्वप्न पाहायला काही हरकत नाही.

टारझन's picture

15 Dec 2010 - 11:15 am | टारझन

ऑफिसटाईम संपला आहे ,हणुन एक-दोन कडवी राहिली आहेत

मला वाटलं कडवी एकंच आहे म्हणुन :) तुमच्याकडे एक - दोन अजुन दिसतात .. तुम्हाला शुभेच्छा :)

पाषाणभेद's picture

15 Dec 2010 - 12:31 pm | पाषाणभेद

आयटी की नॉन आयटी?

योगप्रभू's picture

15 Dec 2010 - 12:39 pm | योगप्रभू

भक्ताच्या खडतर तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव म्हणाला, ' वत्सा! काय वर देऊ तुला?'
त्यावर भक्त म्हणाला, 'वर कुणाला हवाय देवा? मला वधू पाहिजे.'
..

प्रश्न : लग्नात नवरा मुलगा घोड्यावर का बसतो?
उत्तर : कारण पुढील आयुष्यात घोडा त्याच्या अंगावर बसणार असतो.

..

प्रश्न : मोबाईल आणि बायको यांच्यात साम्य काय?
उत्तर : काही काळानंतर वाटायला लागतं 'थोडं थांबलो असतो तर आणखी चांगलं मॉडेल मिळालं असतं'

..

प्रश्न : मोबाईल आणि बायको यात फरक काय?
उत्तर : मोबाईलचा आवाज इच्छेनुसार बंद करता येतो.

..

प्रश्न : ब्रह्मचारी आणि विवाहित पुरुषांत फरक काय?
उत्तर : ब्रह्मचारी आयुष्यात राजासारखा जगतो, पण अखेरीस कुत्र्यासारखा मरतो. विवाहितांचे नेमके उलटे.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Dec 2010 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या विषयानुरुप प्रतिक्रीयेने तर 'निकम्मा तात्या' ला देखील मागे टाकले.

टारझन's picture

15 Dec 2010 - 1:00 pm | टारझन

परा जी , आपल्याला तम्मा तात्या अभिप्रेत आहे काय ? :)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Dec 2010 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार

निकम्मा तम्मा तात्या रे ;)

अवलिया's picture

15 Dec 2010 - 3:24 pm | अवलिया

हा कोण निकम्मा तात्या... आम्हाला एक चुम्माचाटी तात्या माहित आहे..

चिंतामणी's picture

15 Dec 2010 - 1:11 pm | चिंतामणी

=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))

(खुलासा- सुंदर विनोद वाचून. संभाषण वाचुन नव्हे.)

ज्ञानराम's picture

15 Dec 2010 - 3:21 pm | ज्ञानराम

हि कविता वाचून... पु लं च्या.. विनोदाली सुबक ठेंगणि आठवली..

वाटाड्या...'s picture

16 Dec 2010 - 1:08 am | वाटाड्या...

हात दाखवुन अवलक्षणाचा कंटाळा आला वाटतं...