प्रेरणा : http://www.misalpav.com/node/15843#comment-267071
बरेच दिवस लिखन बंद आहे, येथील अनेक कविंच्या कविता वाचुन मन प्रसन्न होते.. त्यांचे पाहुनच जुन्या कविता देत होतो..
स्पुर्ती ती त्यांचीच, विशेष करुन प्रकाशजींच्या कविता आणि प्रतिसाद कायम लिखानाला खुणावत होत्या.
आज "ज्ञानराम" यांच्या कवितेमुळे खुप दिवसानी काही तरी लिहिले आहे .. आपल्याला आवडल्यास आनंद द्विगुनीत होयील्च ..
-----
भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले
गालावर अमुर्त दु:ख ओघळले कोवळे
ना दिशा, ना आकार ना झंकार माहित
घुंगुपाणी विसावलेले मिटलेल्या ओठांत
सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे
मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे
आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे
हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे
कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष
ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त
ना दिशा, ना आकार ना झंकार माहित
भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले
------ शब्दमेघ
प्रतिक्रिया
13 Dec 2010 - 11:57 pm | गणेशा
घुंगुपाणी विसावलेले मिटलेल्या ओठांत
हि ओळ
घुंगुरपाणी विसावले मिटलेल्या ओठांत
अशी वाचावी ही विनती
14 Dec 2010 - 7:23 am | प्रकाश१११
मित्रा -शुभ सकाळ .
सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे
मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे
आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे
हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे
खूप छान आणि मस्त . मन लावून लिहिलेस .आवडले.
माझी छान सकाळ तुझ्या कवितेत हरवून गेली.
धन्यवाद नि आभार.!!
14 Dec 2010 - 9:47 am | ज्ञानराम
"कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष
ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त"
.......... मनाला भावले.....शब्द रचना छान आहे.... लिहित राहा...
14 Dec 2010 - 8:06 pm | संजयशिवाजीरावगडगे
आवडली मनापासुन............!
14 Dec 2010 - 8:09 pm | स्पा
अतिशय हळुवार काव्य..
मझा आ गया