आज ओंजळित... फुले अचानक पडली.......
पडताच ओंळित... हलकेच मग रडली
विचारण्या आधिच... मिट्ल्या पाकळया त्यांनी..
कोमेजली तरीही ... गंध देऊन नीजलि..........
आज चंदनाचे.... खोड मज दिसले....
मज पाहुनिया उगाच... मनी अलगद ह्सले.....
विचारण्या आधिच... झिजुन गेले सारे....
झिजता झिजता... त्याने... दिले सुगंध सारे......
आज पावसाचे.... थेंब मजला भेट्ले..
वाटेत चालताना... डोळ्यात सारे दाटले....
विचारण्या आधिच... भिजवले डोळे त्यांनी....
पण,,,,,, भिजल्या डोळ्यांनि तेव्हा काहिच नाहि वाट्ले...........
प्रतिक्रिया
14 Dec 2010 - 1:23 pm | गणेशा
अप्रतिम ..
मिटल्या पाकळया .. झिजलेला चंदन .. आणि भिजलेले डोळे यातुन जो गर्भीत अर्थ दाखवयाचा आहे तो दिसत आहे.
खुप आवडली कविता ..
लिहित रहा .. वाचत आहे ..
जाता जाता एक रिप्लाय लिहावासा वाटत आहे, देतो ...
--------------------
भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले
गालावर अमुर्त दु:ख ओघळले कोवळे
ना दिशा, ना आकार ना झंकार माहित
घुंगुरपाण्यात विसावले ते बंद ओठांकाठी
------ शब्दमेघ
14 Dec 2010 - 10:02 am | आंसमा शख्स
दुसर्यासाठी काही करण्यातच मजा आहे. चांगली कविता. ते टिंब कमी करण्याचे काही पाहा जमले तर
14 Dec 2010 - 8:59 pm | संजयशिवाजीरावगडगे
आज पावसाचे.... थेंब मजला भेट्ले..
वाटेत चालताना... डोळ्यात सारे दाटले....
विचारण्या आधिच... भिजवले डोळे त्यांनी....
पण,,,,,, भिजल्या डोळ्यांनि तेव्हा काहिच नाहि वाट्ले..........
हे कडवे सुरेख आहे !@!
21 Dec 2010 - 12:44 pm | निवेदिता-ताई
मस्त आहे, आवडली