आसवे तो हुंदका टाळुन गेली
पापणीला सारखी जाळुन गेली
जागली जी रात्र माझ्या लोचनी ती
फसवीण्याचा वायदा पाळुन गेली
मी जरा केला उभा माणूस मनीचा
"जात" आली आडवी चाळुन गेली
स्वप्न माझे कागदी हळुवार इतके
कातरिची धार ओशाळुन गेली
फासले असेल ही काळे - त्या माणसांनी
"ती" तरी कधी- हा चेहरा कुरवाळुन गेली ?
रंगला तो सावळा भजनात ऐसा
मृदुंगाला थाप गोंजारून गेली
उपोषणाने ही जीव जात नाही
सिध्धिच तपला कंटाळुन गेली
तो गुन्हा होता जरासा लाघवी
"चूक" ती...... पुन्हा वावरून गेली
आठवांचा मोगरा आता कुशीला
जिंदगानी अशी गंधाळुन गेली
टाळलेस माझे गीत तरीही
ओळ ओठांवरी रेंगाळुन गेली
का दाविले दुःख मयुरेश तू
सावलीही उन्हें माळुन गेली
माझी कविता ... मयुरेश साने.. दि. १२-सितम्बर-१०
प्रतिक्रिया
12 Dec 2010 - 8:01 pm | धनेष नंबियार०७
छान कविता
12 Dec 2010 - 8:54 pm | स्पा
कडक.................
मयुरेषा असाच लिहित जा... एकदम मस्त....
परत परत वाचतोय.....
13 Dec 2010 - 1:47 pm | पियुशा
मस्त मस्त