आंब्याची चव चाखून बघा
आबं माझ्या पाटीतलं पिकल्यात सारं
चवीला ते लागत्यात न्यारं
पिकलेला आंबा हाती घेवून बघा
एकदा त्याची चव चाखून बघा ||धृ||
कालपर्यंत कैरी होती पाडाची
फांदीनंफांदी लगडली झाडाची
आता दुसरीकडं नजर मारू नका
एकदा त्याची चव चाखून बघा ||१||
आंबेबन आहे लई मोठं माझं
गावामध्ये नाव आहे त्याचं
वाडीत कधी येता ते सांगून टाका
एकदा त्याची चव चाखून बघा ||२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/११/२०१०
प्रतिक्रिया
11 Dec 2010 - 1:07 pm | अवलिया
लै भारी !
आम्हाला पण आंबे लै आवडतात ब्वा !
11 Dec 2010 - 1:13 pm | अविनाशकुलकर्णी
ंंंंमस्त...रे मित्रा..आवडली.
11 Dec 2010 - 1:15 pm | दिपक
दफो,
जिंकलास मित्रा !!
11 Dec 2010 - 1:17 pm | परिकथेतील राजकुमार
क्या बात है !
आंबटगोड काव्य आवडले हो पाभे.