इकडची गोची

रन्गराव's picture
रन्गराव in काथ्याकूट
10 Dec 2010 - 10:18 pm
गाभा: 

भारताने आपला BPO मधला प्रथम क्रमांक गमावला आहे, ती जागा फिलीपीन्सने बळकावली आहे.
http://www.rediff.com/business/slide-show/slide-show-1-philippines-beats...
स्वस्तात सेवा करून काय फायदा झालेला दिसत नाही.

भारत "information Superpower" आहे असं फार वर्षांपासून एकून आहे. पण अल्गोरिदम ऑलम्पिक्स ह्या स्पर्धेतली आपली कामगिरी आपल्या दाव्याला शोभनारी नाही.
http://www.wired.com/magazine/2010/11/mf_algorithmolympics/
प्रथम क्रमांकावर कोण आहे ते पहा, आपल सॉफ्टवर मधल स्थान टिकवण महाकठीण जाणार आहे.

आणि हे सगळ पूरेसा नव्हत म्हणून की काय अजून एक माहीती मिळाली. International Mathematical Olympiad मधील भारताची कामगिरीही फारसी उत्साह वर्धक नाही. नको नको ते देश आपल्या पुढं आहेत
http://www.imo-official.org/results_country.aspx
जिथ गणितच नीट जमत नाही तिथ संशोधनात काय होणार.
ह्या अधोगतीची कारण काय असतील? आणि वेळ निघून जायच्या आत काही करता येण्यासारखं आहे का?

प्रतिक्रिया

माहीत नाही.

वेळ निघून गेल्याणंतर काही करता येण्यासारखं आहे का?
हो, मिपा कशासाठी आहे ?

रन्गराव's picture

10 Dec 2010 - 10:24 pm | रन्गराव

आयला खरच बोंब झाली की! लई हुषार आहात. आवडल :)

नगरीनिरंजन's picture

10 Dec 2010 - 10:43 pm | नगरीनिरंजन

खरंच वाईट परिस्थिती येणार असं गृहीत धरलं तर वेळ निघून जायच्या आत पुणे-बंगलोरात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली असल्यास ती विकता येईल.

वाईट परिस्थिती येणार की नाही ते आपण काय पावलं उचलनार ह्यावर अवलंबून आहे. "आम्ही स्वस्तात मस्त सेवा देतो " अशी पाटी लावून काम चालवायचे दिवस संपत आले. स्वस्तात सेवा देण फार काळ परवडणार नाही. कारण रहाणीमान सुधारत चाललं आहे, मग खर्चही वाढणार. त्यामुळे कमी पैशात काम करन फार दिवस जमणार नाही. आता खरच काही मस्त करायचा विचार केला पाहिजे पण तसा विचार करणेच सोप आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. म्हणजे आज सुरुवात केली तर २० एक वर्षानी त्याचे परीणाम दिसायला लागतील. आता प्रश्न असा आहे, वीस वर्ष आपण तग धरणार का?

आवांतरः सही बाकी एकदम दिलखुलास आहे :)

चिरोटा's picture

10 Dec 2010 - 10:53 pm | चिरोटा

ही कसली ऑलिंपिके?ह्यावरुन असला निष्कर्ष काढणे चुकीचे वाटते.आणि बी.पी.ओ.चे जॉब्स गेले तर जावू द्या.ईकॉनॉमिक चेन मध्ये कायम 'वर' जायचे असते,'खाली' यायचे नसते असे मोठे लोक म्हणतात ना?मुंबईला धोका मनिलापासून असा धागा नाही ना येणार आता?

रन्गराव's picture

10 Dec 2010 - 11:10 pm | रन्गराव

>>ही कसली ऑलिंपिके?ह्यावरुन असला निष्कर्ष काढणे चुकीचे वाटते.
ही एक महत्वाची स्पर्धा आहे. त्यात भाग घेणार्या मुलांचे प्रोफाइल लक्षात घेतल तर त्याच महत्व कळेल.
निष्कर्ष काढता येत नाही हे काहीस बरोबर आहे तुमचं. पण ह्यातून चिनने संगण़क क्षेत्राला आता गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली आहे हे लक्षात येवू शकेल. त्यांच्याकड मनुष्यबळ आहे आणि योग्य ती तांत्रिक शिक्षण व्यवस्थाही. त्यांच आवाहन पेलण्यासाठी तयारी नको का करायला?

ईकॉनॉमिक चेन मध्ये कायम 'वर' जायचे असते,'खाली' यायचे नसते असे मोठे लोक म्हणतात ना?
आणि वरती जाण इतक सोपं नाही. वर निरंजन ना दिलेल उत्तर वाचा.

आपण आजवर जे मिळवल त्याचा आत्मविश्वास आणि अजून कुठे कमी पडतो ह्याची जाण ह्या दोन्ही गोष्टी यशस्वी वाटचालीसाठी गरजेच्या असतात.

गांधीवादी's picture

11 Dec 2010 - 7:59 am | गांधीवादी

>>चिनने संगण़क क्षेत्राला आता गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली आहे हे लक्षात येवू शकेल.
असे देखील ऐकून आहे कि महाकाय चीन लवकरच एक महाकाय सायबर सिटी चालू करत आहे.
यावर कदाचित मिपावरील माननीय चंद्रशेखर काही प्रकाश टाकू शकतील.
पण चिन संगण़क क्षेत्राला आता गंभीरपणे घेत आहे हे मात्र १०० टक्के सत्य.

अवांतर : महाकाय चीनने अजून काही विशाल मोठे प्रकल्प हातही घेतलेले आहेत, त्याचा परिणाम येत्या ५-१० वर्षात दिसून येईल. आणि इथे आम्ही (सरकार) गेली २० दिवस कामधाम (संसद) बंद करून बसलेलो आहोत.

शुचि's picture

11 Dec 2010 - 12:15 am | शुचि

बीपी ओ चं चिंतजनक वाटत आहे.
कारण काय आपला प्रथम क्रमांक जायचं?

रविंद्र प्रधान's picture

14 Dec 2010 - 12:06 pm | रविंद्र प्रधान

भारत IMO गेली २० वर्षे भाग घेत आहे. आतापर्यंत त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणजे ७ वा क्रमांक.
चीन मात्र सातत्याने १ ला ते ३ रा क्रमांक राखून आहे. काही वर्षांपुर्वी ही स्पर्धा मुंबईत झाली असतांना चिनी प्रशिक्षकांशी बोलण्याचा योग आला होता. त्या देशात IMO साठी जरूर असणारे गणित ४थी पासून शाळेत शिकवले जाते. आपल्या देशात हे गणित शाळेतच काय, पण कॉलेजेस मध्येही शिकवले जात नाही. ज्यांना उत्साह असतो ते खाजगी वर्गांत जाऊन शिकतात.
वेदीक गणिताचा अभ्यास झाला असल्यास हे गणित सोपे जाते. वेदीक गणित जगातील १४० देशांत साधारणपणे इयत्ता ४ थी पासून शिकवले जाते. आपल्या देशात मात्र वेदीक गणित सरकारमान्य शाळांत शिकवण्यास मनाई आहे कारण काहिही वेदीक शिकवणे म्हणजे भारताचे केसरीकरण करणे होय अस आपल्या राज्यकर्त्यांचा समज आहे.
वेदीक गणित शिकवणारे खाजगी वर्ग याला Smart Math किंवा Majic Math असे नाव देऊन हे वर्ग चालवतात.

रोचक धागा. प्रतिसाद वाचत आहे.

विंजिनेर's picture

14 Dec 2010 - 4:50 pm | विंजिनेर

BPO चालविणे , इन्फर्मेशन सुपर पावर आणि गणितातील संशोधन ह्या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध कसा काय जोडला बुवा? शिवाय ऑलिंपियाडमधली काही भारतीय मुलांची कामगिरी = भारतातल्या लाखो मुलांची गणिती कुवत => अती सामान्यीकरण नाही होत काय?

बाकी,

जिथ गणितच नीट जमत नाही तिथ संशोधनात काय होणार.

भारतात गणित सोडून अनेक विषयांत संशोधनात (मूलभूत आणि अप्लाईड) औदासि न्य आहे. त्यात नविन काहीच नाही.

रन्गराव's picture

14 Dec 2010 - 8:04 pm | रन्गराव

एक क्षणभर अस समजूया की काही संबध नाही! तरीही एकही गोष्ट धड जमत नाही हे काळजी करण्यासारखं नाही का?

इन्फर्मेशन सुपर पावर आणि गणितातील संशोधन !
काही संगणक शास्त्रातले विषय आणि त्यासाठी लागणार गणित ह्यांची यादी देतो
१. Information retrieval ( data mining, machine learning etc) - Stats, linear algebra, optimization( optimization needs calculus, linear algebra)
2. Systems ( os, architecture, compilers) and communication networks - queuing theory
3. e-commerce - Game theory- topology, optimization, probability
4. graph theory - combinatorics, linear algebra, topology
5. Information Security - Number theory, algebra
6. Algorithms - combinatorics

भारतात गणित सोडून अनेक विषयांत संशोधनात (मूलभूत आणि अप्लाईड) औदासि न्य आहे. त्यात नविन काहीच नाही.
हा झाला सिंप्टम. पण त्याचं खर कारण गणिताकड झालेलं दुर्लक्ष आहे. गणिताला पर्याय म्हणून जे जीवशास्त्र निवडल जात. त्यातही स्टॅट्स शिवाय काम चालत नाही. मग आत ठरवा बाकीचे विषयातील संशोधन गणितावर किती अवलंबून असेल ते. म्हणजे एखाद्याला जर कुठल्या विषयात संशोधन करायच असेल, तर गणित नीट न शिकल्यामुळं प्रगती करता येत नाही.

>>शिवाय ऑलिंपियाडमधली काही भारतीय मुलांची कामगिरी = भारतातल्या लाखो मुलांची गणिती कुवत => अती सामान्यीकरण नाही होत काय?

फक्त हुशारी मोजायची असेल तर तुमच बरोबर आहे. पण कामगिरी जितकी हुशारीवर अवलंबून असते तितकीच ट्रेनिंगवर. मुल हुशार नाहीत अस म्हंटलेलं नाही. वर प्रधानांची प्रतिकिया वाचा. त्यांनी भारत आणी चिन ह्यातील शिक्षणातला फरक सांगितला आहे.

विंजिनेर's picture

14 Dec 2010 - 9:13 pm | विंजिनेर

BPO चा यात आपण संबंध जोडलात तो कसा हे अजून कळाले नाही मला.

तरीही एकही गोष्ट धड जमत नाही हे काळजी करण्यासारखं नाही का?

साहेब तसं आपण म्हटलं नाहीये. हा मुद्दा वेगळा आहे - खाली पहा.

आत ठरवा बाकीचे विषयातील संशोधन गणितावर किती अवलंबून असेल ते.

खुद्द गणितातील संशोधन आणि इतर विषयांमधे गणिती पद्धतींचा वापर करून केलेले संशोधन यात फरक आहे. असो.

मूळ मुद्दा
भारत ऑलंपियाड मधे मागे पडतो/असतो => भारतीयांचे गणित कच्चे आहे => देश संशोधनात मागे पडतो असा आहे. शिवाय नवे BPO फिलिपाईन्स मधे उघडलेत म्हणून चिंता वाटते.
असा काहीतरी विचित्र वाटतो आहे.

ह्याच न्यायाने असंही म्हणता येऊ शकेल की:
विश्ववनाथन आनंद सातत्याने बुद्धीबळात विश्वविजेता ठरतो => सगळे भारतीय बुद्धीबळाच्या खेळात हुशार आहेत => भारत सर्व खेळांत प्रचंड प्रगती करतो आहे. शिवाय ट्वेण्टी-ट्वेण्टी मधल्या नव्या चिअर-गर्लस् "स्टीलर्स" चं चीअर लिडींग सोडून इथे आल्या आहेत.
तथापी सर्वत्र आनंदी आनंद आहे.

असो हे अर्थात माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Dec 2010 - 10:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खगोलशास्त्र ऑलिंपियाडमधली भारताची कामगिरी नेहेमीच सरस ठरलेली आहे. (इच्छुकांनी विदा तपासून पहाणे. खगोलशास्त्र ऑलिंपियाडसाठी प्रशिक्षण देणार्‍या दोघांशी चांगली मैत्री असणारे** माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडून नेहेमीच अपडेट्स मिळत रहातात.)

हे पदकविजेते आता (काही वर्षांनंतर) कुठे आहेत, भारतातल्या खगोलशास्रज्ञांकडून वर्षाला किती पेपर्स प्रकाशित होतात हे प्रश्न वेगळे आहेत! :-)

**क्षीण प्रयत्न! ;-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Dec 2010 - 8:34 pm | निनाद मुक्काम प...

चेतन भगत ह्यांचे १ नाईट कॉल सेंटर मध्ये कॉल सेंटर बी पी ओ मधील तरुणांचे मनोगत मांडले आहे .त्यांना आयुष्यात ज्या शेत्रात करियर करायचे आहे .त्यात कमी पैश्यात मौल्यवान अनुभव पदरात पडायचे सोडून भरपूर पैसा व रात्रीचे आयुष्य ह्यात काही वर्ष बरबाद करण्यापेक्षा जे होतंय ते चांगल्याच साठी होतेय असे म्हणावे लागेल
.
ज्याला पैशाची नोकरीची खरच गरज आहे .त्यांनी हा पर्याय काही काळा पुरता नक्कीच चांगला आहे .