६: पाउलखुणा

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
10 Dec 2010 - 2:23 pm

५ : मी ..एक स्त्री

प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत..
सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा
आणि मागोवा कशाचा ?.. कश्यासाठी ... ?
बहुदा तो आहे एक अखंड प्रवास
एका प्रश्नमालिकेतून, दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्याचा

माझ्यासारखीच गुरफ़टलेली ही रात्र आहे ..
उद्यास्ताच्या रंगात न्हाऊनही
काळवंडली आहे बिच्चारी
माझे काय आहे मग त्यापुढे ?..

माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर
माझ अस्तित्वच संपत चाललय ..
पण तरिही या रात्रीच्या सोबतीनेच
मी जगते आहे.. एकटीच
हे चक्रव्युव्ह नाही तोडता यायचे कदाचीत मला
पण नक्कीच अस्तित्वाच्या पाउलखुणा मागे ठेवून मी लढेन ...
अभिमन्यु प्रमाने अडकले ही आहे व्युव्हामध्ये
पण तशीच अमर ही होयील ..
पण जाता जाता पुन्हा मागोवा घेते आहे मी थोडासा ..
त्या विस्कटलेल्या पाउलखुणांचा..
अन पहाते आहे वलयांकित काही खुणा मागे आहेत का
की त्यांचे ही अस्तित्व संपले आहे .. ?

--- शब्दमेघ (स्त्री.. भावनांचा प्रवास मधुन)

कविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

10 Dec 2010 - 3:44 pm | प्रकाश१११

माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर
माझ अस्तित्वच संपत चाललय ..
पण तरिही या रात्रीच्या सोबतीनेच
मी जगते आहे.. एकटीच
हे चक्रव्युव्ह नाही तोडता यायचे कदाचीत मला
पण नक्कीच अस्तित्वाच्या पाउलखुणा मागे ठेवून मी लढेन ...
अभिमन्यु प्रमाने अडकले ही आहे व्युव्हामध्ये
पण तशीच अमर ही होयील ..
पण जाता जाता पुन्हा मागोवा घेते आहे मी थोडासा ..
त्या विस्कटलेल्या पाउलखुणांचा..

हे खरेच छान लिहिले आहे. चंगली लय आहे शब्दांना !