जागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर मी करीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो
जागर करीतो
देवी अंबेचा गोंधळ मी घालीतो ||धृ||
आई तू ग माझी गुणी
नउवारी पातळ नेसूनी
कपाळी मळवट लाल लेवूनी
आई बसली सिंहावरी
देवी अंबेमातेला वंदन करीतो
वंदन करीतो
तुळजाभवानीच्या पायी नमीतो
पायी नमीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||१||
सुरू होई अश्विन महिना
मनी आनंद काही मावेना
नवरात्राच्या ग सोहळी
नऊ दिवस आरती ओवाळी
नऊ दिवसांचे उपास मी करीतो
उपास करीतो
सप्तश्रूंगीची मी ओटी भरीतो
ओटी भरीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||२||
साडीचोळी खणा नारळाची
ओटी भरली मी अंबिकेची
दिवा रातंदिस तेवतो
घट मातीचा मी पुजीतो
पंचपक्वांनाचा नैव्येद्य दावितो
नैव्येद्य दावितो
रेणूका मातेला तांबूल मी देतो
तांबूल देतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/११/२०१०
प्रतिक्रिया
9 Dec 2010 - 2:46 pm | अवलिया
मस्त रे पाभे !!
9 Dec 2010 - 2:49 pm | मेघवेडा
मस्त गाणं आहे रे पाभे! दणदणावत म्हणायला मजा येईल!
9 Dec 2010 - 3:35 pm | गणेशा
अप्रतिम ...
अतिशय मस्त .. म्हणताना ही खुप छान वाट्ले
9 Dec 2010 - 6:12 pm | स्पंदना
आवडली, अगदी डोळ्यासमोर आली आई भवानी!
खुप दिवसांनी आलात पाभे? कुठे होतात?
9 Dec 2010 - 8:39 pm | शुचि
सुंदरच