आमची प्रेरणा चैत्रेचैत यांची एक नवीकविता सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका...
केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...
विश्वजालावर कधीतरी केश्याने एक विडंबन पाडले...
नंतर दुसरे, नंतर तिसरे...
असे करत करत सर्व कविता फाडून संपल्या. एकही कविता फाडायला शिल्लक राहिली नाही...
मग त्याने विचार केला की ह्या पाडलेल्या विडंबनांचे परत विडंबन करूयात.
तेवढ्यात त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर'
म्हणून तो जांभई देत ऑफिसचे काम करायला निघून गेला...
प्रतिक्रिया
24 Apr 2008 - 7:42 pm | स्वाती राजेश
त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर'
सही......:)))))
24 Apr 2008 - 9:18 pm | वरदा
मग तो स्वतःच कविता करुन त्याचं विडंबन करायला लागला... ही ही ही:))))))
24 Apr 2008 - 10:50 pm | पिवळा डांबिस
असे करत करत सर्व कविता फाडून संपल्या. एकही कविता फाडायला शिल्लक राहिली नाही...
असं होणंच शक्य नाही. आंतरजालावर सध्या दीडएक लाख कविता लिहून तयार आहे....
आणि त्यातली बहुतेक विडंबनालाच योग्य आहे! :))))
मराठी कवी (आणि म्हणून त्यांची कविता!) कधीच संपणार नाही...
कारण, पुलंनी म्हटल्याप्रमाणे, "वीण मोठी!!":)))
-डांबिसकाका
24 Apr 2008 - 11:34 pm | चतुरंग
एकदम चोक्कस विडंबन!
पण केसु तुमचा कविता संपली हा आरोप कधीही खपवून घेतला जाणार नाही - पहा शीघ्र काव्य;)
कविता संपली?
करु नको तू चिंता 'केश्या' अक्षय रे कविता
समर्थ सगळे कवी पहा हे पाडतीच त्या विता
स्वस्थ रहा तू जालावरती काव्य किती साजरे
वाजताच ती पुंगी असते नाहितरी गाजरे
इतकी सारी कविता भरुनी वाही जालावरी
तुलाच बघ तरि जमेल कारे विडंबण्या ती खरी;)
हेच पहा तू काव्य कसे मी लगेच रे पाडले
दु:ख नसे ह्या'चतुरंगा' तू विडंबनी फाडले!
चतुरंग
25 Apr 2008 - 12:06 am | वरदा
चतुरंग इतक्या पटकन कविता..सह्हीच...
25 Apr 2008 - 1:51 am | इनोबा म्हणे
केश्या.... अरे तू मनात आणलेस तर अगदी कशाचेही विडंबन करु शकतोस रे!
आवडले हे. सां. न. ल. :)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
25 Apr 2008 - 1:56 am | केशवसुमार
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा:)))))))))))) धन्य आहेस रे इनोबा..
केशवसुमार
(स्वगतः- अशाने तुमचा चौकाचौकात पाट्या लावायचा धंदा कसा चालायचा)
25 Apr 2008 - 2:04 am | इनोबा म्हणे
(स्वगतः- अशाने तुमचा चौकाचौकात पाट्या लावायचा धंदा कसा चालायचा)
अरे,पाट्या लावायचा धंदा बंद झाला तरी, 'पाट्या टाकण्या'चा उद्योग चालूच राहणार ना!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
25 Apr 2008 - 6:02 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
30 Apr 2008 - 9:22 am | विसोबा खेचर
तेवढ्यात त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर'
म्हणून तो जांभई देत ऑफिसचे काम करायला निघून गेला...
हा हा हा!
बाकी दुसरी 'ढ' मस्तच रे केश्या! :)
तात्या.