[कोठल्याशा वृद्धाश्रमात गेलो. नि करून दृश्य बघून
त्यांच्या डोळ्यातील खिन्नपणा बघून मन उदास उदास झाले.
तेच शब्दात.....]
वृद्धाआश्रामातील कितीतरी डोळे लागलेले असतात
रविवारी संध्याकाळी मुलांच्या भेटीसाठी
आतुर झालेले असतात
किती कासावीस होतात ही म्हातारी माणसे ??
घशाला कोरड पडते
देव पाण्यात ठेवतात
[मनातल्या मनात ...]
प्रार्थना करतात ....!
त्यांनी यावे म्हणून
कुठे चळकण आवाज झाला
तर उत्तेजित होतात त्यांची मने ....
आले असतील..?
तरारतात त्यांची मने
नातवंडे सोबत असतील
हसत खेळत येतील
मी त्यांना काय खाऊ देणार ...?
मी घेईन मुका माझ्या बबडीचा
तिच्या उजव्या गालाचा ..!
शहारतात प्रचंड ..!!
कसे छान स्वप्ने बघतात....
वृद्धाश्रमातील आजोबा वाट बघत बसतात
खिडकीशी डोळे बांधून
शिणून ...शिणून जातात
आज रविवार ना ??
राशिभविष्य बघितलेय
मनोकामना पूर्ण होतील
असे लिहिलेय ना .[?]
मग कशी नाही येत ...अजूनही
संध्याकाळची पाखरे घराकडे जायची ...
कधीच थांबली आहेत......!
मग माझी पाखरे
आता कधी येणार...?
संध्याकाळ तर संपून गेलीय ...
अरे जाऊद्यारे आम्हाला आमच्या घरी
आमच्या मुलाबाळात
शेवटचा श्वास घ्यायला ..!!
वृद्धाश्रमातील ते खिन्न डोळे
वाट बघत बसतात
जातात थकून
नि हलकेच डोळे घेतात मिटून .....!!
प्रतिक्रिया
6 Dec 2010 - 4:27 pm | अब् क
:(
8 Dec 2010 - 8:17 am | प्रकाश१११
हे सर्व लिहिताना मलापण खरेच त्रास झाला .
.पण हे खूप खरे आहे.
वृद्धाश्रमात गेलेली माणसे कधी परत येतात का घरी ?
कोणी आणते का त्यांना परत घरी .?का त्यांना कोणी नसतात
मुले -मुली .आणि ही माणसे केविलवाणी स्वताला कोठेतरी हरवून बसतात मनाने,,!!
हल्ली हल्ली आपली वृद्धाश्रम भरून गेली आहेत !!
8 Dec 2010 - 9:11 am | मदनबाण
अत्यंत करुण कविता... :(
8 Dec 2010 - 9:33 am | नगरीनिरंजन
करूण पण अटळ असे वास्तव.
स्वगतः तरीही जास्त जगण्यासाठीचा हव्यास आणि त्यासाठी संशोधन का चालू असते कळत नाही.
8 Dec 2010 - 9:45 am | प्रकाश१११
नगरनिरंजन --हा मुद्दा खरेच विचार करण्यासारखा आहे.
मदनबाणाचे देखील आभार मनापासून !!
8 Dec 2010 - 1:49 pm | गवि
एकदम करुण..
कसेतरीच झाले.
8 Dec 2010 - 1:57 pm | गणेशा
कविता वाचताना डोळ्यात पाणी आले..
काही दिवसांपुर्वी वृद्धाश्रमात गेलो होतो .. तेंव्हाची ती दृष्ये डोळ्यासमोर झरकन येवुन गेल्याने आनखिन्च वाईट वाटले.
मी तेथे गेलो असताना.. एका आजोबांचा वाढदिवस होता, आम्ही ११ लाच तेथे गेलो होतो .. त्यांना केक आणला .. सगळ्यांनी साजरा केला वाढदिवस .. पण त्यांचे लक्ष जास्त नव्ह्ते तरीही सवय झाल्याने .. उगाच हास्य करत होते ...
५ वाजता त्यांची मुलगी/सुन आली सोबत त्यांची नात ही होती .. नातीने हात हात घेतला तसे ह्यांनी रडायला सुरुवात केली ..
खुप हेलावुन टाकणारे द्रुष्य होते ते ..
आता ही डोळे पाणवतात .. बाकीचे अनुभव तर लिहित नाही ..कारण तुमच्या कवितेतुन त्या वेदनेंचे असंख्य घाव टाहो फोडत आहेत ...
अतिशय ग्रेट शब्द असतात आपले .. खुप आवडतात .. मनात घर करुन जातात
8 Dec 2010 - 2:07 pm | गवि
या कवितेच्या करूण वातावरणाला इथेच छेद दिलाच पाहिजे असं नाही, पण असंही जाणवतं की पन्नास टक्के (नेमकी टक्केवारी काढणं खूपच कठीण, त्यामुळे इन्डिकेटिव्ह घ्यावी..) केसेसमधे वृद्ध लोकही आपल्या पुढच्या पिढीला त्यांची स्वत:ची लाईफ जगणं अवघड करुन सोडतात.
आपणही आपल्या ढळत्या वयात आपले काही क्रॉनिक हट्ट, घरातील अति लक्ष ऊर्फ ढवळा ढवळ, मुलगा सुनेला जराही प्रायव्हसी न मिळू देणे, ताकापासून वरणापर्यंतच्या सवयींचा हट्ट कायम ठेवणे आणि पूर्तता न झाल्यास मुळूमुळू रडणे किंवा कुरकुर हे सर्व सोडून थोडे अलिप्त राहिलो आणि मागितला तरच उपदेश करू अन्यथा तुम्ही मोकळेपणाने जगा असं वागणुकीतून दाखवलं तर खूपसे वृद्ध घरीच राहतील.
नुकत्याच पाहिलेल्या काही घटस्फोटांमधे वृद्धांची घरातील अतिचिकित्सक ढवळाढवळ सुनेला असह्य झाल्याचे दिसले.
9 Dec 2010 - 2:36 pm | गणेशा
हे ही बरोबर बोलत आहात तुम्ही ...
परंतु हे जे घडत आहे, तेथे स्पष्ट पणे मुलांनी सांगितले पाहिजे.
चुक दाखवली म्हणुन वाईट वाटुन घेवु नये , त्याचा फायदा नक्कीच होयीन ..
पण प्रायव्सी हवी म्हणुन, ह्यांच्ये पटले नाहीतर लांब टाका हे नक्कीच योग्य नाही ..
जेंव्हा त्यांच्या अंगात रग होती तोपर्यंत त्यांचे जीवन जर मुलांच्या सुखासाठी असेल तर त्यांच्या मनाचा कोठे तरी आपण विचार करण्यास हवा.
मान्य ते चुकत असतील ..पण ती चुक येव्हदी जीव्हारी नाही लागु दिली पाहिजे.. यापेक्षा त्यांना मरण आलेले चांगले ...
पण आपल्या नातवांच्या एका प्रेमळ हाके साठी महिनोन्महिने तरसणारे लोक पाहिले की खुप हेलावुन येते ...
असो ...
(वरील लिखान आपल्या रिप्लायला आहे .. वयक्तीक घेवु नये ही विनंती)
---
तरीही बागबान हा माझा आवडता सिनेमा आहे, तसे स्वावलंबी झाले पाहिजे सर्वांनी ..
कधीतरी आपण ही म्हतारे होउच .. तेंव्हा नकी कळेल की काय असते हे सगळे ...
8 Dec 2010 - 2:25 pm | जागु
वास्तव.