किनारे लोटुनी सारे
प्रावाही शांत वाहताना
किती गर्दी तुझी आहे?
इथे एकांत असताना
मुका होईन मी जेव्हा
तुझ्या दे त्रास ओठांना
चुका मोजू नको माझ्या
सजा दे खास ओठांना
किती ओशाळले सारे
पुरावे न्याय होताना
तुझा आभास वावरवा
अशी दे स्मृति आठवांना
शब्द माझे मागती ती
तुझी दे चाल गीतान्ना
चन्द्र तू चांदणे मी
लाजवू या चांदण्याना
झोप माझी वाट पाही
अशी दे जाग स्वप्नांना
जाणीवा गोठल्या माझ्या
नवा दे घाव वेदनांना
माझी कविता ..मयुरेश साने..24-July-10