ऑस्लोच्या उत्तरेला कोठलीशी एक टेकडी आहे असे माहीत होते. मागे अक्षय तिकडे जायचे म्हणून बसने आणि पायी बराच फिरला होता. पण खराब हवामानामुळे त्याला मधूनच मागे फिरायला लागले होते.
एकदा तिकडे जाऊनच येऊ या असे म्हणत आम्ही 'सोलेमस्कोगेन'ला जाणरी ५६ नंबरची बस पकडली. या मार्गावरचा सोलेमस्कोगेन हा सगळ्यात शेवटचा थांबा आहे. इथून बस मागे वळते आणि परत ऑस्लोला जाते. जाताना तुरळक घरे दिसतात. रस्ताही थोडा वळणावळणाचा.
सोलेमस्कोगेनला आम्ही बसमधून उतरलो आणि सगळीकडे पसरलेले, कापसासारखे पिंजून ठेवलेले हिम दिसू लागले.
खूप थंडीही वाजू लागली. तसे आम्ही बर्याच तयारीने गेलो होतो. जॅकेट, स्वेटर, मोजे, बूट. पण ती तयारीसुद्धा पुरेशी वाटत नव्हती.
आम्हाला सोडून आमची बस तर निघून गेली. पुढची बस बरोबर एका तासाने होती. म्हणजे एकंदरीत बराच वेळ होता. समोर वाट खुणावत होती. आम्ही चालायला सुरूवात केली.
इथून पुढे अर्धा तास आम्ही स्वर्गात होतो. दोन्ही बाजूला उंच सुरूची झाडे, त्यांच्या पानात अडकून राहिलेले मऊसूत हिम, वार्याच्या एखाद्या लहरी बरोबर ते खाली यायचे आणि वाटायचे हिमवर्षाव सुरु झाला की काय?
मग एखाद्या चित्रपटाला शोभावे असे 'लोकेशन' सापडले. इथे बसून फोटो काढण्याचा मोह अक्षयला आवरला नाही,
(अक्षय)
इथे 'स्किंग' करायला बरेच लोक येतात. मधूनच एखादा माणूस सूं सूं करत जायचा.
थोडे पुढे चालत गेल्यावर गोठलेला तलाव दिसला.
याच्यावर चालत जायची खूप इच्छा होती. पण आम्ही दोघेही इतके गारठलो होतो की जीभ जड झाल्याने नीट बोलताही येत नव्हते.
अप्रतिम निसर्गसौंदय आणि भयानक गारठा दोन्हीमुळे पाय हालत नव्हता. पण अंधार पडू लागला होता. मागे फिरलो, सुरुची झाडे हात हलवून निरोप देत होती.
बसस्टोपवर पोचलो तेव्हा दिवेलागण सुरू झाली होती. बस ठरल्यावेळी आली आणि आम्ही ऑस्लोला परत येऊ लागलो. आज आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षाही बरेच काही मिळाले होते. :)
प्रतिक्रिया
28 Nov 2010 - 4:18 pm | स्पंदना
हु हु हु हु हु हु हु उहु हुहुहुहुहुहूउहूउ !
28 Nov 2010 - 6:48 pm | विलासराव
दिसतय हे 'सोलेमस्कोगेन'.
मलाही त्या तळ्यावरुन (तळ्यातुन) चालण्याचा मोह झाला क्ष्णभर.
28 Nov 2010 - 7:19 pm | नगरीनिरंजन
फोटो सुंदर आहेत. अशा वातावरणात एखाद्याला वैराग्य येईल. साधू लोक तप करायला हिमालयात का जातात ते कळते हे फोटो पाहून.
29 Nov 2010 - 3:21 am | शिल्पा ब
मस्त फोटो..
30 Nov 2010 - 1:10 am | प्राजु
आणखी काही दिवसांनी आमच्या इकडेही असेच चित्र दिसू लागेल. बापरे! आतापासूनच हुडहुडी भरली.
2 Dec 2010 - 6:27 pm | गणेशा
अतिशय सुंदर वाटले ठिकान आवडले
2 Dec 2010 - 7:12 pm | धमाल मुलगा
फोटोतलं बर्फ पाहून पार गारठलो ना स्वानंदराव. :)
चांगले आहेत फोटो. इथे आम्हाला हे फोटो दाखवल्याबद्दल धन्यवाद.
आणि दादा, नुसतेच फोटो काय टाकता राव...त्यासोबत काहीतरी लिहा की एकदम झक्कास :)
13 Dec 2010 - 2:31 pm | पियुशा
वोव मस्त फोटो
16 Dec 2010 - 9:51 pm | पिंगू
आयला मी काय पाप केलयं.. मला एकपण फोटू दिसत नाय... :(
- पिंगू
16 Dec 2010 - 9:58 pm | पर्नल नेने मराठे
पिन्गे मी पण तुझ्या पापात सहभागी ग :(
18 Dec 2010 - 10:30 pm | स्वानंद मारुलकर
:)