का शब्द मी निघालो खोडून वाचलेला?....

मयुरेश साने's picture
मयुरेश साने in जे न देखे रवी...
28 Nov 2010 - 1:17 pm

वाहून काल गेला राहून साचलेला
का शब्द मी निघालो खोडून वाचलेला?

वारुळ हे जगाचे - नाते जपा विषारी
का डंख हा मिळाला आतून डाचलेला

काळोख ही विजेचा अंगार होत आहे
अंधार ही विजांनी पोळून टाकलेला

सारे तुला दिले मी माझी न राहिली तू
तो चोरटा निघाला माझाच वाटलेला

गाणे कसे म्हणू ती आता कुठे दिसेना
प्रत्येक हुन्दक्याला हा कंठ दाटलेला

यात्रेत त्या फुलांच्या "गंधाळल्या" दिशा का ?
कोमेजल्या फुलाने संदेश धाडलेला

मी हासतो सुखाने दुःखात नांदतो मी
तो चेहरा सुखाचा मी रोज फाडलेला

मयुरेश साने ....दि ०९ ओक्ट-10

गझल

प्रतिक्रिया

कमाल कमाल आणि फक्त कमाल .......................

प्रसाद_डी's picture

29 Nov 2010 - 3:18 pm | प्रसाद_डी

सारे तुला दिले मी माझी न राहिली तू
तो चोरटा निघाला माझाच वाटलेला
**********************

साने साहेब...... हे जरा जोराच अन जवळुन टोचल बर का....