कशी मस्त सकाळ उगवत असते
हलक्याफुलक्या पिसासारखी .....!!
अंगावर कसा गोड काटा फुलवीत बसते ही थंडीची सकाळ
बिस्स्मिल्लाखांच्या सनई सारखी
कशी वेलांटत येतेय ही सकाळ ....
खिडकीच्या गजावर बसते चिमणी
तेव्हा किती सुरेख नि मस्त वाटते सकाळ ...
ह्या SS लव ह्या SS लव म्हणत
कशी चिव चिव करत असते ही सकाळ
कशी गाभुळलेली वाटत असते ही सुंदर सकाळ
झाडापानातून कशी फुलून येत असते ही सकाळ
कोवळ्या कणसासारखे पिवळे पिवळे उन
कशी गोंजारत असते मनाला ही सकाळ ...
नि ही सकाळ जेह्वा तारुण्यात पदार्पण करते
तेव्हा ही सकाळची होते दुपार [?]
तेव्हा तिचा तोराच निराळा
ती कशी बदलून जाते
कसे जाते तिचे कोवळेपण बदलून
अचानक ..न कळत
नि मग ती कशी वाटते उद्दाम मग्रूर
खतरनाक ....!!!
पायातल्या बुटाने सारी दुनिया चिरडणारी
सगळीकडे परीक्षेचा माहोल
असे वातावरण.....!!
आणि त्यात गणिताचा पेपर
भलता अवघड ..!!
ही दुपार खरेच सकाळ होती का ...??
ईतकी कशी बदलून जाते ती ....??
माणसासारखी ....!!
प्रतिक्रिया
27 Nov 2010 - 12:30 pm | परिकथेतील राजकुमार
गाभुळलेली सकाळ एकदम छान.
29 Nov 2010 - 3:21 pm | गणेशा
जबरदस्त कविता पुन्हा एकदा .. निसर्गवर्णन खुप छान करता तुम्ही ..
लिहित रहा .. वाचत आहे
..कशी गाभुळलेली वाटत असते ही सुंदर सकाळ
झाडापानातून कशी फुलून येत असते ही सकाळ
कोवळ्या कणसासारखे पिवळे पिवळे उन
कशी गोंजारत असते मनाला ही सकाळ ....
हे सर्वात जास्त आवडले
29 Nov 2010 - 3:54 pm | अवलिया
मस्त कविता
अवलिया