किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका
कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय
किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? ...!!
जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी
गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी
दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही
अनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही
चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय ...!!
राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली
भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!!
शंभर कोटी जनतेमध्ये, राष्ट्रनायक दिसत नाही
’ते’ घराणे सोडून अन्य, कुणीच लायक भासत नाही
असेच आमचे गणराज्य, अशीच आमची लोकशाही
भगत-बापुंना माहित नव्हते, अर्थ निघणार असाही
मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलईसाय ...!!
.
.
गंगाधर मुटे
......*.......*......*......*......*......*.......*......*......*......
इसम = व्यक्ती
प्रतिक्रिया
26 Nov 2010 - 7:48 pm | गणेशा
जबरदस्त ...
26 Nov 2010 - 7:52 pm | वेताळ
एकदम झक्कास........
26 Nov 2010 - 8:22 pm | यकु
=) ) =) ) =) ) =) ) =) )
कवि एकदा असा तापला की शब्दांची हजामतच!
भारी!
26 Nov 2010 - 8:59 pm | उल्हास
खणखणीत कविता
26 Nov 2010 - 9:01 pm | उल्हास
खणखणीत कविता
नागपुरी तड्का मस्तच
26 Nov 2010 - 9:09 pm | मदनबाण
शॉलिट्ट... :)
26 Nov 2010 - 9:18 pm | धमाल मुलगा
जळजळीत काव्य!
नागपुरी तडका कसलं, सावजी आहे राव हे.
26 Nov 2010 - 9:28 pm | नंदू
कविता आवडली.
26 Nov 2010 - 10:46 pm | गंगाधर मुटे
धन्यवाद सर्वांचे.
26 Nov 2010 - 10:48 pm | नगरीनिरंजन
धारदार सुरीसारखी थंड आणि चरचरीत सत्य मांडणारी मस्त कविता. अगदी आतून उमटल्यासारखी सहज आणि लयबद्ध आहे. अजून येऊ द्या असे कसे म्हणू?
27 Nov 2010 - 10:14 am | राघव
लय भारी. आवडेश! :)
27 Nov 2010 - 11:14 am | सुधीर काळे
गंगाधर-जी,
कविता हा आपला प्रांत नव्हे. क्वचितच मी कवितांच्या वाटेला जातो. पण यात Son of India चा ('भारतपुत्रा'चा) उल्लेख होता म्हणून कुतुहलाने ही कविता वाचली.
अगदी अस्सल 'सावजी' कविता आहे! सुंदर!! (नागपुरात अनेक नकली 'सावजी' आहेत असे माझे नागपूरचे सहकारी मला म्हणतात!)
उलटून गेल्या पिढ्या तरी, लाळ घोटणे सरत नाही
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलई-साय
वा, वा!
शेवटी एक प्रश्न पडतो: इथे 'पूतना'मावशी कोण?
27 Nov 2010 - 3:40 pm | नरेशकुमार
सावजी म्हन्जे काय ? आनि 'सावजी' कविता म्हन्जे काय ?
क्रुपया प्लिज. सान्गा.
29 Nov 2010 - 11:09 pm | गंगाधर मुटे
सावजी चिकन फ़ारच तेज आणि तडकेदार असते, अशी ऐकीव माहीती आहे.
तोच संदर्भ असावा बहूतेक. :)
जाणकारच यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.
27 Nov 2010 - 8:33 pm | गंगाधर मुटे
धन्यवाद सर्वांचे.
सुधिरजी लिंकबद्दल धन्यवाद.
27 Nov 2010 - 10:59 pm | प्राजु
झणझणीत!!! अतिशय रोखठोक आहे कविता!
मस्तच!
30 Nov 2010 - 11:44 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
30 Nov 2010 - 10:06 am | गवि
नेहमीप्रमाणेच, मनापासून लिहिलेली आणि एकदम परफेक्ट..
तुमच्या कवितांमधे ताकदवान शब्द तर असतातच पण ओळी म्हणतानाही यमके, वृत्ते वगैरे एकदम मस्त चपखल असतात.
ती वाघास दात नाही कविता अजून विसरलो नाही..
30 Nov 2010 - 10:42 am | daredevils99
राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली
भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!!
"मातोश्री"चे उत्तम वर्णन!
3 Dec 2010 - 2:38 pm | जयवी
व्वा.....!
एकदम दमदार काव्य......झणझणीत तडका.....जळजळीत वास्तव !!
3 Dec 2010 - 3:47 pm | Pearl
१दम आवडली.
7 Dec 2010 - 11:56 am | मयुर
वा गंगाधराव, सुन्दर कविता खरच,
एक नागपुरकर,
मयुर