प्रतिभावंत !!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
26 Nov 2010 - 11:48 am

तो एक प्रतिभावंत कवी होता
त्याच्या मनाच्या तळाशी
झुळझुळनार्या प्रतिभेचा एक झरा होता
कुणास ठाऊक कोणी काय केले ?
कसे केले ?
कशासाठी केले??
त्याच्या प्रतिभेचा झरा कसा गेला आटून ?
अचानक !.नकळत!! अकस्मात !!!
कोणाची तरी नजर लागली ?
नि मन राख राख झाले ...
वाळवटासारखे रखरखीत
नि शुष्क होऊन गेले
सगळे हिरवे रान करपून गेले
वाढलेली दाढी नि खोल खोल डोळे
भूतकाळ गेला तो विसरून !!
कोठे कसा बुडाला ,हरवून गेला !
नि गेला कंगाल बनून !!
कोठे गेली त्याची स्वप्नातली पाखरे ?
कुणास ठाऊक ?
गेली दूर उडून ....!!

कवी पुरा उद्वस्त झाला
नि गेले सारे हरवून
देवा याला वाचव रे !
बहरू दे ह्याचे हिरवे रान
नि उमलू दे कळ्यांना !
फळांना ,फुलांना !!

त्याच्या मनात जे हिरवे हिरवे रान होते
हिरव्या झाडांनी गच्च नि गच्च होते
आभाळ कसे निळे निळे मस्त होते
नि एकदम अचानक
कसे ढग आले भरून ?
विजा कडाडतील कधीपण
झाडावर पडली तर पाखरे भस्म होतील
झाडासकट !!
पाखरे घाबरली ,चिडीचुप्प झाली
बसली झाडावर शांत,निमूट घाबरून !
वीज कोसळेल रे बाबा ....
सेंतानी हवा सुटली आहे ....
कोसळून पडतील सगळी झाडे
नि संपून जाईल गाणे !!

त्याच हिरवे हिरवे रान कसे गेले हरवून ?
ते देईल का कोणी शोधून ?
कसा लागला वणवा त्याला
नि मन कसे गेले विझून ...??

कोणी टाकली ठिणगी ?
नि कशी लागली आग
कोण विझवणार तिला
म्हणूनच ढग आलेत का भरून ?

देवा वाचव रे त्याला
खूप लिहायचे आहे त्याला अजून ...?
आता आताशी कोठे सनईने धरला होता सूर
कशा वेलांट्या घेत घेत
होत होत्या मधुर ...

करुणकविता

प्रतिक्रिया

जागु's picture

26 Nov 2010 - 12:00 pm | जागु

हा कोण कवी ?

गणेशा's picture

26 Nov 2010 - 12:47 pm | गणेशा

छान आहे ..
कवी .. प्रश्न.. आणि निसर्ग यांचे छान मिश्रण आहे ..