भाग ७ : http://www.misalpav.com/node/15457
पार्श्वभुमी : लहानपणी आई बरोबर शेता मध्ये येणारा नायक, बांधावर बसुन हरबरा खाताना समोरच्या पाखरांना आवाज देवुन उडवुन लावतानाचा नायक आणि नंतर आई नसताना पुन्हा शेतात आल्यावर व्याकुळणारा नायक .. बस्स
शेतात बसलो असता
बांधावर भासांची टोळी
आठवणींच्या दाण्यांची
फाटकी माझी झोळी
मन होउन पाखरु
मायेचा शोधते घास
नभी थकलेला चांद
केविलवाणा विराण प्रवास
आठवांच्या धुळसर वाटेवर
मनपक्षी माखले सारे
शेतात बसता आठवे
मायेचे तुटलेले धागेदोरे
-------- शब्दमेघ
प्रतिक्रिया
22 Nov 2010 - 3:41 pm | प्रकाश१११
आई -मित्रा चांगली लय सापडली आहे .
मस्त लिहित राहा ..आवडली .
22 Nov 2010 - 3:45 pm | गणेशा
धन्यवाद मित्रा ..
पण या कविता मी आधी लिहिलेल्या आहेत .. सध्या लिखान खुप कमी झालेले आहे .. बोअर चालले आहे सगळे म्हणुन जुन्या काही कविता ज्या माझ्याकडे आहेत ते देतोय येथे ..
आपल्या शुभेच्छा अश्याच कायम राहोत .. नक्कीच पुनः लेखन सुरु करीन लवकर
22 Nov 2010 - 7:26 pm | नगरीनिरंजन
सुंदर, भावस्पर्शी कविता!