काढला संग्रह कवितांचा -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
17 Nov 2010 - 1:29 pm

(चाल: ’ कानडा राजा पंढरीचा ’)

कोणालाही नाही कळला, खर्च फार याचा
काढला संग्रह कवितांचा ।१।

मेजावर तो विक्रीस सत्वर
कसा पकडला असा ढीग वर
कुपन ठेविले खास प्रतींवर
खप ना चार प्रतींचा ।२।

परमभाग्य हे नात्यांसाठी
उभे ठाकले फुकटे पाठी
उभा राहिला जमाव सावध
जणु की शोकसभेचा ।३।

हा गझलेचा शेर वाचतो
तो चारोळ्यासवे हायकुतो‌
अभंगोविचा हा रसिकात्मा
वाली ना कवितांचा ।४।
---------------
(टीप:
हायकुतो=हायकू लिहितो,
अभंगोविचा=अभंग नि ओवीचा)

मुक्तक

प्रतिक्रिया

गणेशा's picture

17 Nov 2010 - 1:48 pm | गणेशा

बरोबर वर्णन आहे एक्दम

मिसळभोक्ता's picture

17 Nov 2010 - 1:51 pm | मिसळभोक्ता

शेवटच्या कडव्यात जरा खेचाखेची झाली, पण तरीही स्तुत्य प्रयत्न. जारी रख्खो !

(कोणालाही नाही पडल.. असे जास्त सुस्पष्ट वाटते. खर्च कळत नाही, खर्च पडतो.)

वारकरि रशियात's picture

18 Nov 2010 - 12:57 pm | वारकरि रशियात

+१

स्वगतः ( मिभोकाका ती पूर्वीची फॅक़्टर वगैरे लावून मार्क देण्याची पद्धत अजून का दिसत नाही असे वाटत राहते )!

बेसनलाडू's picture

18 Nov 2010 - 12:59 pm | बेसनलाडू

छान झालंय. आणखी लिहीत रहा, विडंबन करत रहा!
(वाचक)बेसनलाडू